उरण : वार्ताहर सागरी सुरक्षा कवच अभियानांतर्गत नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हे अभियान बुधवारी (दि. 20) सकाळी 6 वाजता ते गुरुवारी (दि. 21) सायंकाळी 6 …
Read More »Yearly Archives: 2019
कळंबोली बॉम्ब प्रकरण : पोलिसांच्या तपास कौशल्याचे महासंचालकांकडून कौतुक
पनवेल : वार्ताहर कळंबोली सुधागड हायस्कूलसमोर ठेवण्यात आलेल्या बॉम्ब प्रकरणाचा नवी मुंबईच्या विशेष तपास पथकाने सलग 17 दिवस अथक परिश्रम घेऊन जुलै महिन्यात छडा लावला. या गुन्ह्यात क्लिष्टतेत बारकावे शोधत पोलिसांनी अतिशय शिताफीने या गुन्ह्याची उकल केली. या कामगिरीची पोलीस महासंचालकांनी दखल घेतली आहे. एकूण तीन पथकांना सहा लाख रुपयांचे …
Read More »अर्बन हाटमध्ये हातमाग व हस्तकला महोत्सव
नवी मुंबई : सिडको वृत्त सिडको अर्बन हाट येथे दि. 22 नोव्हेंबर ते 08 डिसेंबर, 2019 या कालावधीत सकाळी 11.00 ते रात्री 09.00 या वेळेत हातमाग व हस्तकला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये विविध राज्यातल्या कारागिरांनी निर्मिलेल्या हातमागावरील पारंपरिक पद्धतीची वस्त्रप्रावरणे, तसेच विविध हस्तकला वस्तू प्रदर्शनार्थ आणि विक्रीकरिता …
Read More »वयोवृद्धांना फसवणारा गजाआड
पनवेल : बातमीदार वयोवृद्ध महिला व पुरुषांना एकटे असल्याचे पाहून व त्यांना बोलण्यात गुंतवून फसवणूक करणार्या आरोपींपैकी एका आरोपीला खांदेश्वर पोलिसांनी उत्तराखंड येथून अटक केली आहे. त्याच्यावर तब्बल दीडशेहुन अधिक गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपी कडून तीन लाख 61 हजार रुपयांचे 12 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत …
Read More »अॅड. मनोज भुजबळ यांची फुटपाथ दुरुस्तीची मागणी
पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल सेक्टर 15 मधील गार्डनजवळील शौचालयासमोरील फुटपाथवरील तुटलेले पेव्हर ब्लॉक आणि गटारावरील तुटलेली झाकणे त्वरित बदलण्यात यावीत, अशी मागणी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी केली आहे. नवीन पनवेल सेक्टर 15 मधील रेल्वे स्टेशन समोरील गार्डनजवळील शौचालयासमोरील फुटपाथवरील पेव्हर ब्लॉक तुटलेले आहेत. याशिवाय तेथील गटारावरील झाकणे तुटलेली …
Read More »वेश्याव्यवसाय करणार्या महिलांवर कारवाई, नगरसेविका दर्शना भोईर यांच्या प्रयत्नांना यश
पनवेल : बातमीदार पनवेल शहरातील शिवाजी चौक ते आंबेडकर चौक, तसेच बसस्थानकाबाहेर वेश्याव्यवसाय करणार्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असल्याच्या तक्रारी पनवेल पोलिसांकडे आल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सरिता मुसळे यांनी गुरुवारी (ता. 21) या महिलांची धरपकड केली. या कारवाईत सहा महिलांना ताब्यात घेण्यात …
Read More »डेंग्यू रोखण्यासाठी जनजागृतीची गरज, -डॉ. तुषार गावंड यांचे आवाहन
पेण : प्रतिनिधी रायगडमध्ये डेंग्यूने थैमान घातले आहे. मुख्यत्वे पावसाची अखेर व हिवाळयाची सुरूवात या काळात फैलावणार्या या आजारावर मात करण्यासाठी स्वच्छता आणि त्यासाठी लोकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असून जनतेने आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा. ग्रामपंचायतींनी ‘स्वच्छतेतून आरोग्यम धनसंपदे‘ कडे वाटचाल करण्यासाठी लोकांमध्ये जागृती करावी, असे आवाहन डॉ.तुषार गावंड …
Read More »आजपासून वरसोलीची जत्रा
अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील वरसोली येथील आंग्रेकालीन विठोबाची जत्रा उत्पत्ती एकादशीपासून म्हणजे शुक्रवारपासून 22 ते 26 नोव्हेंबर अशी पाच दिवस भरणार आहे. संबंधित देवस्थान विश्वस्त समिती, नगर परिषद, ग्रामपंचायत, देवस्थानचे सेवेकरी, विविध व्यवस्थेसाठी व तयारीसाठी जोरदारपणे कामाला लागले आहेत. या जत्रेसाठी केवळ परिसरातीलच नव्हे तर राज्याच्या अनेक भागातून भाविक मोठया …
Read More »खेळाच्या माध्यमातून जीवनात यश मिळवता येते -आरेकर
मुरूड : प्रतिनिधी शरीर ही आपली महत्त्वाची संपत्ती असून, खेळ हे शरीर सुदृढ करण्याचे साधन आहे. जीवनात यश मिळवायचे असेल तर खेळ महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन मुरूड नगर परिषदेचे पर्यटन सभापती पी. के. आरेकर यांनी येथे केले. सर एस. ए. हायस्कूल व स्व. म. ल. दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा …
Read More »विस्तार शिक्षण संचालकांची कृषी विज्ञान केंद्राला भेट
रोहे : प्रतिनिधी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांनी नुकताच किल्ला-रोहा येथील कृषि विज्ञान केंद्राला भेट देऊन तेथील कार्याची पहाणी केली. कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. मनोज तलाठी यांनी डॉ. संजय भावे यांचे स्वागत केले व प्रक्षेत्रावर कार्यरत असलेल्या व कृषि …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper