Breaking News

Monthly Archives: February 2020

‘कोरोना‘च्या अफवेमुळे कुक्कटपालन व्यवसाय आला अडचणीत; सायबर सेलकडे तक्रार

पुणे ः प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात पसरलेल्या अफवेमुळे कुक्कटपालन व्यवसाय संकटात सापडला आहे. मागील 15 दिवसांत बॉयलर कोंबडीच्या विक्रीत तिपटीहून अधिक घट झाली आहे. महाराष्ट्रातही मागील 10 दिवसांत 1100 मेट्रीक टनाने विक्रीत घट झाल्याने या व्यवसायाला दिनांक 4 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत सुमारे 150 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. …

Read More »

‘नाणार’वरून शिवसेनेत दुफळी

सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी कोकणातील नाणार रिफायनरीवरून शिवसेनेत दुफळी निर्माण झाली आहे. रिफायनरीला समर्थन करणार्‍या विभागप्रमुखावर शिवसेनेने कारवाई केली आहे. या कारवाईच्या निषेधार्थ कोकणातील सागवेसह विभागातील तब्बल 22 शाखाप्रमुख, उपविभाग प्रमुख आणि पदाधिकार्‍यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. सागवे आणि इतर गावांतील शिवसैनिकांच्या बैठकीत शिवसेनेच्या 22 शाखाप्रमुखांसह पदाधिकार्‍यांनी राजीनामे देण्याचा निर्णय …

Read More »

ताम्हीणी घाटातील भीषण अपघातात पुण्याचे तिघे ठार

माणगाव ः प्रतिनिधी मित्राचा वाढदिवस व कोकणातील दिवेआगार येथे पर्यटनासाठी निघालेल्या आळंदी रोडजवळील पाच तरुणांच्या एर्टिगा कारचा गुरुवारी (दि. 20) पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास ताम्हीणी घाटात भीषण अपघात झाला. अपघातात कारमधील तीन तरुण जागीच ठार, तर दोन जण जखमी झाले. अपघाताची माहिती समजताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास इंगावले …

Read More »

मराठा आरक्षणाबाबत ठाकरे सरकार संवेदनाहीन -दरेकर

मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार संवेदनाहीन आहे, अशी टीका भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. आझाद मैदानात 24 दिवसांपासून आंदोलक आंदोलन करीत असूनही त्यांना न्याय मिळत नाही. भाजपची सत्ता असताना राज्यात कुठेही आंदोलन झाल्यास त्याची त्वरित दखल घेऊन मार्ग काढला जात …

Read More »

भाजप खारघर मंडल कार्यकारिणी जाहीर

पनवेल ः प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी खारघर मंडलाची कार्यकारिणी मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी जाहीर केली आहे. भाजपच्या संघटनात्मक निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यामध्ये बुथ अध्यक्षांपासून राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. भाजपच्या संघटनात्मक द़ृष्टीने रायगडचे दोन जिल्हे झाल्यावर खारघरला मंडलाचा दर्जा देण्यात आला असून मंडल अध्यक्ष म्हणून ब्रिजेश पटेल …

Read More »

पवारांनी आयुष्यभर मतांच्या तुष्टीकरणाचे काम केले; सुधीर मुनगंटीवार यांचा घणाघात

मुंबई : प्रतिनिधी अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. आयुष्यभर शरद पवार यांनी मतांचे तुष्टीकरण करण्याचे काम केले. खुर्चीसाठी पक्ष फोडले, अशी घणाघाती टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली. तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीने …

Read More »

नागोठणे मीरानगरातील अतिक्रमणे वनखात्याकडून जमीनदोस्त

नागोठणे : प्रतिनिधी येथील मिरानगर भागातील वन खात्याच्या जागेत करण्यात आलेले अतिक्रमण संबंधित विभागाच्या पथकाने गुरूवारी (दि. 20) सकाळी जमीनदोस्त केली.  कोकण रेल्वे मार्गाच्या पलिकडे नागोठणे ग्रामपंचायत अंतर्गत मिरानगर वसले आहे. येथील बहुतांशी जागा वन विभागाच्या मालकीची असली तरी, मागील तीस चाळीस वर्षांपासून काही भू माफियांच्या आशीर्वादाने याठिकाणी अतिक्रमणे फोफावली …

Read More »

रायगडमध्ये गुटखाविक्री तेजीत

हरिश बेकावडे यांचा पत्रकार परिषदेत आरोप पेण : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यामध्ये गुटखा विक्रीचा धंदा तेजीत असून, तो  पुर्णत: नष्ट करण्यास प्रशासन कमी पडत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते हरिश बेकावडे यांनी पेणमधील शासकीय विश्रामगृहात घतलेल्या पत्रकार परिषदेत केला. जिल्ह्यात ठिकठिकाणी भाड्याने जागा घेवून मुंबईतील एक व्यक्ती तेथे गुटख्याचा पुरवठा करीत असल्याची …

Read More »

वृक्षतोडीत 14 पोपटांचा मृत्यू

खोपोलीतील पक्षीप्रेमींची कारवाईची मागणी खालापूर : प्रतिनिधी रस्ता रुंदीकरणासाठी वृक्षतोड करीत असताना गुरुवारी (दि. 20) खोपोलीतील हनुमान मंदिरासमोरील जांभळाच्या झाडावरील पोपटांच्या घरट्यांचे नुकसान झाले. या घटनेत पोपटांच्या 14 पिल्लांचा मृत्यू, तर आठ पिल्ले जखमी झाली. या पोपटांच्या मृत्यूस कारणीभूत असणारा ठेकेदार व वृक्षतोड करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी …

Read More »

कर्जत फार्मसी महाविद्यालयात शिवजयंती

कर्जत : प्रतिनिधी कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बुधवारी शिवजयंती उत्साहात साजरी केली. यावेळी शिवज्योत व पालखी मिरवणूक, शिवजन्म आणि सांस्कृतिक असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. रायगड किल्ल्याची प्रतिकृतीही तयार केली होती. विशेष म्हणजे सुटी असूनही विद्यार्थ्यांनी महाविद्यालय सुरू ठेवण्याची विंनती करून शिवजयंती साजरी केली.  बुधवारी …

Read More »