Breaking News

Monthly Archives: February 2020

हवा बदलते आहे…

देशातील हवा हळूहळू बदलू लागली आहे. सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसी याच्या विरोधात देशभर रान उठवण्यात आले होते. सुधारित नागरिकत्व कायदा कोणाचे नागरिकत्व काढून घेणारा नाही तर नागरिकत्व देणारा आहे असे वारंवार सांगून देखील मतांच्या धु्रवीकरणासाठी विरोधाचे एक षडयंत्र रचले गेले. त्याची परिणती देशव्यापी आंदोलनांमध्ये झाल्याचे आभासी चित्र दिसत होेते. …

Read More »

नेरळमध्ये शौचालयाच्या टाकीत गुदमरून कामगाराचा मृत्यू

कर्जत : बातमीदार नेरळ येथील शिंदेवाडी भागात शौचालयाची टाकी साफ करण्यासाठी उतरलेल्या कामगाराचा गुदमरून मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू तसेच गुन्ह्याची नोंद केली आहे. धनीराम नामक कामगार 28 जानेवारी रोजी शौचालयाच्या टाकीत स्वच्छता करण्यासाठी उतरला होता. काम होऊनही मलमूत्राची दुर्गंधी बाहेर येतच असल्याने …

Read More »

मिस-मिसेस रायगड क्विन स्पर्धेस उदंड प्रतिसाद

महाड : प्रतिनिधी        वेदा जनजागृती मंच आयोजित मिस, मिसेस रायगड आणि मिस, मिसेस महाड क्विन स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला.  महाडच्या इतिहासात प्रथमच झालेल्या स्पर्धेत महाडकर, तरुण तसेच ज्येष्ठ नागरिक महिलांनीही रॅमवॉक अनुभवला. मिसेस इंडिया राखी सोनार यांची उपस्थिती कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. वेदा जनजागृती मंचच्या वतीने महिलांतील सुप्तगुणांना वाव मिळावा …

Read More »

माणगावजवळ दोन ट्रेलरची धडक; चालक जखमी

माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील विळे गावाच्या हद्दीत बुधवारी (दि. 5) सकाळी दोन ट्रेलरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एक ट्रेलरचालक जखमी झाला आहे. मुंबईकडून पॉस्को कंपनीकडे निघालेला ट्रेलर (एमएच-46, एएफ-1719) आणि कंपनीतून मुंबईकडे निघालेला ट्रेलर (आरजे-51, जीए-1560) या दोन गाड्यांमध्ये विळे पेट्रोलपंपासमोर बुधवारी सकाळी आठ वाजता समोरासमोर जोरदार धडक …

Read More »

पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला; दोन मुले जखमी

श्रीवर्धन ़: तालुक्यातील भरडखोल ग्रामपंचायत हद्दीमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला आहे. या कुत्र्याने मंगळवारी (दि. 4) दुपारी केलेल्या हल्ल्यात दोन लहान मुले जखमी झाली असून, सुदैवाने त्यांचे प्राण वाचले आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल गावात पिसाळलेल्या कुत्र्याने दहशत निर्माण केली असून, त्याने आजतागायत पाच ते सहा व्यक्तींवर हल्ला …

Read More »

वाळू वाहतूकदारांवर दंडात्मक कारवाई

महाड : प्रतिनिधी तालुक्यात टोळ फाटा ते बंदर यादरम्यान मंगळवारी (दि. 4) वाळू वाहतूक करणार्‍या पाच वाहनांवर महाड तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी कारवाई केली आहे. या कारवाईत लाखो रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे या परिसरात अनधिकृत वाळू व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. महाड खाडीपट्टा विभागातील टोळ …

Read More »

विविध मागण्यांना मध्य रेल्वेकडून हिरवा कंदील; महाव्यवस्थापकांना काळे झेंडे न दाखविण्याचा नेरळ प्रवासी संघटनेचा निर्णय

कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या नेरळ रेल्वेस्थानकातील विविध समस्यांबाबत नेरळ प्रवासी संघटना आक्रमक झाली होती, मात्र त्यांच्या अनेक मागण्या मध्य रेल्वे प्रशासनाने मान्य केल्या आहेत. दरम्यान, मागण्या मान्य झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना काळे झेंडे दाखविणार नाही, असे प्रवासी संघटनेने जाहीर केले आहे. नेरळ रेल्वेस्थानकातील विविध समस्यांबाबत नेरळ प्रवासी संघटना गेली …

Read More »

वणवे उठताहेत वनसंपदेच्या मुळावर; पशुपक्षी, ऐतिहासिक वारसेदेखील धोक्यात; ठोस उपाययोजना करण्याची गरज

पाली : प्रतिनिधी पावसाळ्यात माळरान, गडकिल्ले, जंगल भागात मोठ्या प्रमाणात छोटी झुडपे व गवत उगवते, मात्र ऑक्टोबरनंतर ही झाडीझुडपे व गवत सुकते आणि कळतब नकळत डोंगराला वणवा लागतो. रायगड जिल्ह्यात दरवर्षी हजारो हेक्टर क्षेत्रावर असे वणवे लागतात. या वणव्यात झाडेझुडपे, पशुपक्षी, सूक्ष्म जीव तसेच सरपटणारे प्राणी यांचा जळून मृत्यू होतो. …

Read More »

रामवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन उत्साहात

पेण ़: प्रतिनिधी रामवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचा सहावा वर्धापन दिन संघाचे अध्यक्ष स. रा. म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच पेण येथील आगरी समाज हॉलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त काढण्यात आलेल्या संघाच्या वटवृक्ष या स्मरणिकेचे प्रकाशन सोबती संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब नेने यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी वंदे मातरम् शाळेच्या विद्यार्थ्यांनी …

Read More »

शेतकरी-शास्त्रज्ञ मंचची खालापूर येथे बैठक

कर्जत : प्रतिनिधी कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातर्फे स्थापन झालेल्या शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची बैठक नुकतीच सहयोगी संशोधन संचालक डॉ. एस. बी. भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत खालापूर येथील प्रगतशील शेतकरी नारायण बाळकृष्ण जगताप यांच्या शेतावर घेण्यात आली. प्रत्येक तालुका कृषी कार्यालयात स्थापन झालेल्या मार्गदर्शन केंद्राचा लाभ शेतकर्‍यांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. …

Read More »