Breaking News

Monthly Archives: April 2020

आदिवासी कुटुंबांना मदतीचा हात

श्रद्धा फाऊंडेशनचा उपक्रम; जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कडाव ः वार्ताहर रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून जगभरातील मनोरुग्णांची मनोभावे सेवा करून त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार करण्याचे काम डॉ. भरत वाटवाणी यांचे श्रद्धा फाऊंडेशन करीत आहे. त्या अनुषंगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जतमधील वेणगाव आदिवासी वाडीमध्ये डॉ. भरत वाटवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा …

Read More »

कर्जतमध्येही चार दिवस स्वेच्छेने कडकडीत बंद

कर्जत : प्रतिनिधी – नेरळमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर संपूर्ण नेरळ हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशाने सील करण्यात आले आहे. नेरळपाठोपाठ कर्जत शहरातही खबरदारी म्हणून चार दिवस कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. कर्जत तालुक्यातील पहिला रुग्ण नेरळमध्ये आढळला. त्यामुळे नेरळ सील करण्यात येऊन सर्व व्यवहार चार दिवसांसाठी बंद ठेवण्यात …

Read More »

होम क्वारंटाइन व्यक्तींवर जिल्हा प्रशासनाची नजर

सिक्युएमएस अ‍ॅपचा वापर अलिबाग : प्रतिनिधी – कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी प्रशासनाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. रायगड जिल्हा प्रशासनाची वॉर रूमही दिवस-रात्र काम करीत असून तिथून होम क्वारंटाइन असलेल्या व्यक्तींवर नजर ठेवली जात आहे. त्यासाठी सिक्युएमएस या अ‍ॅपचा वापर केला जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात, देशात वाढू लागल्याने नोकरी-धंद्यानिमित्त …

Read More »

कोरोनाच्या शिरकावामुळे नेरळमध्ये शुकशुकाट

सर्व व्यवहार बंद कर्जत : बातमीदार – नेरळ येथील एक तरुण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने हे गाव सील करण्यात आले आहे, तर बाजारपेठ ग्रामपंचायतीने पुढील चार दिवस बंद ठेवली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. या बंदच्या मंगळवार (दि. 21)च्या पहिल्याच दिवशी नेरळमध्ये शुकशुकाट दिसून आला. नेरळमध्ये आढळलेला …

Read More »

खालापूर तहसील कार्यालयात सोशल डिस्टन्सिंगला हरताळ

खालापूर : प्रतिनिधी – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन व संचारबंदीची मुदत 3 मेपर्यंत वाढविल्यानंतर खालापूर तहसील कार्यालयात विविध कामांसाठी भाऊगर्दी होत आहे. या वेळी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक असणार्‍या सामाजिक अंतराचा (सोशल डिस्टन्सिंग)नियम धाब्यावर बसविला जात आहे. तहसील कार्यालयात गाड्यांना पासेस मिळण्यासाठी तसेच शेतीची देवाण-घेवाण करणार्‍यांची संख्या जास्त असून तहसीलदारांच्या …

Read More »

पनवेलच्या सीकेटी महाविद्यालयाचा भारतातील पहिल्या शंभरात समावेश

‘एज्युकेशन वर्ल्ड’ची टॉप रँकिंग यादी जाहीर पनवेल : रामप्रहर वृत्त – राष्ट्रीय स्तरावरील एज्युकेशन वर्ल्ड या मासिकाने एप्रिल 2020च्या विशेषांकामध्ये सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील भारतातील खासगी स्वायत्त महाविद्यालयांमध्ये अव्वल स्थान मिळवलेल्या महाविद्यालयांची यादी जाहीर केली आहे. या यादीत दर्जेदार शिक्षणासोबत कला, क्रीडा, सामजिक क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या नामवंत अशा …

Read More »

खारघरच्या पोलिसाला कोरोना

रायगडात तीन नवे रुग्ण; दोन पनवेलमधील, तर एक पोलादपूरचा; जिल्ह्यात एकूण 57 कोरोनाग्रस्त पनवेल, पोलादपूर : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 21) कोरोनाचे एकूण तीन नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात पनवेल तालुक्यातील दोन, तर पोलादपूरमधील एकाचा समावेश आहे. पनवेलमधील दोन रुग्णांपैकी एक पोलीस आहे. या नव्या तीन रुग्णांमुळे …

Read More »

खोपोलीत वाहतूक बदल

खोपोली : प्रतिनिधी – येथील नगर परिषद आणि पोलीस ठाणे यांच्या वतीने लॉकडाऊन कालावधीत पालिका हद्दीतील काही ठिकाणी रस्त्यावर बॅरिकेट्स लावून वाहतूक नियंत्रित करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी याबाबत सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावे. त्याचप्रमाणे लॉकडाऊन काळात विनाकारण रस्त्यावर येऊ नये, असे आवाहन …

Read More »

‘टाटा स्टील’कडून खोपोलीत मदत

खोपोली : प्रतिनिधी – आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवरील कोविड-19चा प्रभाव भारतातील छोट्या शहरांमध्ये आणि गावांमध्येही पसरत आहे. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील खोपोलीतील टाटा स्टील बीएसएल प्लांटच्या हौसिंग कॉलनीतील स्वयंसेवक आजूबाजूच्या स्थानिक समुदायातील गरीब आणि स्थलांतरित कामगारांच्या अत्यावश्यक गरजापूर्ण करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. कंपनीच्या हौसिंग कॉलनीतील क्रिएटिव्ह सोल्स लेडीज क्लबच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवकांनी …

Read More »

खबरदारीला पर्याय नाही

आपल्या देशातील सरकारी यंत्रणा जगभरातील सार्‍या कोरोनासंबंधी घडामोडींचा अंदाज घेत सावधपणे पावले टाकत आहे. जोवर या घातक विषाणूवर प्रभावी औषध वा लस हातात येत नाही तोवर जगभरात सगळ्याच देशांना सुयोग्य खबरदारी राखत टप्प्याटप्प्यानेच जनजीवन खुले करता येणार आहे. कोरोना संकटाच्या संदर्भातली कुठलीच परिस्थिती ही आजच्या घडीला तरी ठामपणे अंतिम निष्कर्ष …

Read More »