Breaking News

Monthly Archives: May 2020

माणगावात कोविड 19 रूग्णालय सज्ज

35 दिवसांत केले नूतनीकरण; रुग्णांना दिलासा माणगाव ः प्रतिनिधी जगभरात थैमान घातलेल्या कोरोनोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याचबरोबर कोरोनाग्रस्त रुग्णांंचे निदान करणारी यंत्रणा शासन तातडीने उभारत आहे. याचाच एक भाग म्हणून माणगाव उपजिल्हा रुग्णालय कोविड 19करिता सुसज्ज करण्यासाठी एक महिन्यापूर्वी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सूचना केली होती. या रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यासाठी …

Read More »

दिलासादायक! देशाचा रिकव्हरी रेट वाढला

नवी दिल्ली : देशात आतापर्यंत एक लाख 45 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. असे असले तरी देशात कोरोनावर मात करून ठणठणीत होणार्‍या रुग्णांचा टक्काही वाढत आहे. जगातील इतर काही महत्त्वाच्या देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाबाधितांची संख्या व मृत्यूदर कमी आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी …

Read More »

कोरोनामुळे पालीत कडकडीत बंद

सुधागड : रामप्रहर वृत्तसुधागड तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळळल्याने खबरदारी म्हणून पाली बाजारपेठ तीन दिवस बंद ठेवण्याचा ग्रामपंचायत आणि व्यापारी असोसिएशनने घेतला आहे. या बंदला मंगळवारी (दि. 26) पहिल्याच दिवशी शंभर टक्के प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले.रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुका सुरक्षित होता, मात्र दोनच दिवसांपूर्वी तालुक्यातील नागशेत येथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह …

Read More »

रायगडात दोघांचा मृत्यू; 39 नवे रुग्ण

पनवेल : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून, 39 रुग्ण आढळले आहेत. मुरूड व अलिबागमधील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर अलिबाग नऊ, पनवेल महापालिका व रोहा प्रत्येकी आठ, माणगाव तीन, खालापूर, मुरूड, श्रीवर्धन व पोलादपूर प्रत्येकी दोन, पनवेल ग्रामीण, पेण व तळा प्रत्येकी एक असे नवे …

Read More »

कोरोनाशी लढणे हेच आमचे लक्ष्य

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार मुंबई : प्रतिनिधीकोरोनाच्या परिस्थितीतही राजभवन आणि मातोश्रीवर बैठकांचे सत्र सुरु आहे. या बैठका कोरोनाच्या उपाययोजना संदर्भात आहेत की राजकीय खलबतांसाठी हे येत्या काळात स्पष्ट होईल. या परिस्थितीत कोरोना या विषयाला प्राधान्य असायला हवे. भाजपमध्ये सरकार अस्थिर करण्याची कुठलीही हालचाल सुरू नाही. कोरोनाशी लढा देणे …

Read More »

गरज धाडसी निर्णयांची

देशात कोरोना विषाणूने शिरकाव केला आणि अल्पावधीतच महाराष्ट्र हे सर्वाधिक कोरोना केसेसचे राज्य बनले. गेल्या दोन महिन्यांच्या काळात तर राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चाललेली दिसते आहे. अशा परिस्थितीत धाडसी निर्णय घेण्याऐवजी केंद्राकडून मदत मिळत नसल्याची खोटी ओरड करून आघाडी सरकार काय साधणार आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने …

Read More »

ईदनिमित्त सलमानचा म्युझिक व्हिडीओ

पनवेल ः वार्ताहर बॉलीवूडचा भाईजान सलमान खान दरवर्षी ईदला त्याचा चित्रपट प्रदर्शित करतो. दशकभरापासून सलमानने ईदच्या मुहूर्तावर अनेक चित्रपट प्रदर्शित केले आहेत. या वर्षीही सलमानचा ‘राधे’ हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार होता, मात्र सध्या कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. तसेच अनेक चित्रपटांचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले. त्यामुळे …

Read More »

कर्नाटकला रवाना झालेले 200 मजूर पुन्हा नवी मुंबईत परतले

पनवेल : बातमीदार नवी मुंबईतून कर्नाटकात एसटी बसेसने गेलेल्या 200 मजुरांना नियमानुसार सीमेवर रोखण्यात आले. त्यामुळे पुढे जाण्याऐवजी या मजुरांनी नवी मुंबईत परत येणे पसंत केले. नवी मुंबई, मुंबई, ठाणे परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात टाळेबंदीत दोन महिन्यांपासून हाताला काम नसल्याने मजुरांची परवड सुरू होती. त्यामुळे परप्रांतीय मजुरांनी आपल्या …

Read More »

रोगप्रतिकारक गोळ्या वाटपाचा उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यातील पडघे गावचे माजी सरपंच कृष्णाशेठ पाटील यांच्यामार्फत आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. कृष्णाशेठ पाटील सामाजिक विकास मंडळाच्या वतीने हा उपक्रम पडघे गावात राबविण्यात येणार आहे. आयुष मंत्रालयाच्या शिफारशीनुसार दिल्या जाणार्‍या या गोळ्यांमुळे …

Read More »

रसायनीत कोरोनाचा शिरकाव; सहा जणांना लागण

मोहोपाडा ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांपर्यंत सुरक्षित असलेल्या रसायनीत अखेर कोरोनाने शिरकाव केला आहे. वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील शिवनगरवाडी येथील तीन, दुर्गामाता कॉलनी दोन, तर वावेघर ग्रामपंचायत हद्दीतील दापिवली येथील एकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. रसायनीत एकूण सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून. परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. …

Read More »