Breaking News

Monthly Archives: May 2020

रायगडात पाणीटंचाईच्या वाढत्या झळा

74 गावे, 239 वाड्यांना टँकरद्वारे जलपुरवठा अलिबाग : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असताना दुसरीकडे पाणीटंचाईच्या झळाही तीव्र होऊ लागल्यात आहेत. जिल्ह्यात 74 गावे आणि 239 वाड्यांना जिल्हा प्रशासनाकडून टँकर्स, बैलगाडी तसेच अधिग्रहीत विहिरींद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. उरण तालुक्यातील पाच वाड्यांमधील 998 नागरिकांना दोन खाजगी टँकरद्वारे …

Read More »

कुशेडे तर्फे गोवेले येथील परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित

अलिबाग : प्रतिनिधी – माणगाव तालुक्यातील कुशेडे तर्फे गोवेले येथे सहा व्यक्ती कोरोना विषाणूबाधित आढळून आल्याने या हद्दीतील कोरोना रुग्ण राहात असलेला कुशेडे तर्फे गोवेले मूळगाव परिसर कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात राहणार्‍या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व …

Read More »

मं कीहिल ग्रामस्थांना करावी लागतेय पायपीट

अमृतांजन ब्रिज पाडल्याने गावचा रस्ता झाला बंद खोपोली, खालापूर : प्रतिनिधी – मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील  खंडाळा घाटातील अमृतांजन पूल मागील महिन्यात एमएमआरडीएने पाडला, मात्र या ब्रिजवरून मं कीहिल गावाकडे जाणारा रस्ताच बंद झाल्याने व पर्यायी रस्त्याची सुविधा न झाल्याने ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खोपोली नगर परिषदहद्दीतील …

Read More »

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्यांचा आजपासून कोकण दौरा

मुंबई : कोकणातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेणे, तेथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी करणे व त्या जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय यंत्रणांना मदत करण्याच्या दृष्टीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील भाजपचे आमदार मंगळवार (दि. 19)पासून रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे आमदार सर्वश्री …

Read More »

बहुआयामी व्यक्तिमत्त्व रत्नाकर मतकरी यांचे कोरोनामुळे निधन

मुंबई ः प्रतिनिधीज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे. मतकरी यांना गेले काही दिवस थकवा जाणवत असल्याने मुंबईतील गोदरेज रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. तेथे त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती …

Read More »

पनवेलमध्ये दोन रुग्णांचा मृत्यू

पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिका क्षेत्रात सोमवारी (दि. 18) कोरोनामुळे दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, 12 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रात 271 रुग्ण झाले असून, 125 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल ग्रामीणमध्ये सात नवीन रुग्ण आढळले. त्यात पाली देवद  (सुकापूर) येथील एकाच कुटुंबातील दोन लहान मुलांसह एका व्यक्तीचा …

Read More »

नऊ बिनविरोध सदस्यांनी घेतली आमदारकीची शपथ

मुंबई : प्रतिनिधीराज्य विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ जणांनी सोमवारी (दि. 18) आमदारकीची शपथ घेतली. यात भाजपच्या चार, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन आणि काँग्रेसच्या एका सदस्याचा समावेश आहे. कोरोनाचे संकट असल्याने विधिमंडळात साधेपणाने हा शपथविधी झाला.भाजपचे प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, …

Read More »

माणगावजवळ कारला अपघात; एक ठार, एक जखमी

माणगाव : प्रतिनिधीमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावजवळील लाखपाले गावच्या हद्दीत वॅगनर कारवरील चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या साईडपट्टीवरून उलटली. या अपघातात एक जण ठार झाला असून, एक जखमी झाला. हा अपघात सोमवारी (दि. 18) सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघाताची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.अपघाताची फिर्याद मयताचा मुलगा …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रोगप्रतिकारक औषधांचे कोविड योद्ध्यांना वाटप

पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिकेचे सभागृह नेते आणि भाजपचे युवा नेते परेश ठाकूर यांचा वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 18) पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि सफाई कामगार या कोविड योद्ध्यांना अर्सेनिक अल्बम 30 आणि व्हिटॅमिन सी या रोगप्रतिकारकशक्ती वाढविणार्‍या औषधाचे वाटप करून आरोग्यदायी स्वरूपात साजरा करण्यात आला.पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे अनेक …

Read More »

…केला होता अट्टाहास!

‘अखेर गंगेत घोडे न्हाले’ अशीच सामान्य प्रतिक्रिया राज्यातील ताज्या राजकीय घडामोडींनंतर सर्वत्र ऐकावयास मिळते आहे. असो, झाले गेले गंगेला मिळाले. कुटील राजकारणाची उठाठेव सोडून ठाकरे सरकार आतातरी कोरोनाच्या लढाईत पूर्ण ताकदीनिशी उतरेल अशी आशा आहे. प्रचंड आटापिटा आणि उलटेसुलटे राजकारण करून, सारा विधिनिषेध गुंडाळून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तीन चाकी …

Read More »