Breaking News

Monthly Archives: May 2020

नवीन पनवेलमध्ये भाजी खरेदीसाठी नियम पाळून रांग

पनवेल : प्रतिनिधी – रविवार सकाळ म्हणजे सर्वसामान्य माणूस मटणाच्या रांगेत उभा असलेला दिसतो. पण नवीन पनवेलमधील दृश्य मात्र वेगळेच होते. येथील शांतिवन सोसायटीत जुन्नरच्या शेतकर्‍याच्या शेतातील ताजी भाजी खरेदी करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे  नियम पाळून रांग लागली होती. पनवेल महापालिका आयुक्तांनी सोसायट्यांना दिलेल्या आदेशाचे पालन करीत पदाधिकार्यांनी सदस्यांना शेतकर्‍याच्या शेतातील …

Read More »

‘ओएनजीसी’कडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

उरण : वार्ताहर – ओएनजीसी प्लांट उरण द्रोणागिरी भवन यांच्या वतीने रोजंदारीवर काम करणारे असंघटित मजूर असणार्‍या निवासी झोपडपट्टी, अज्ञानी असंघटित कामगारांना जीवनावश्यक वस्तू आणि अन्न धान्याचे वाटप करण्यात आले. कामगार, कष्ठकरी वर्ग, गरीब वर्ग या लॉक डाउनमुळे आर्थिक परिणाम झालेला आहे. जे कामगार दिवसाच्या वेतनावर उपजीविका करीत होते, त्यांचे …

Read More »

नेरळमधील महिला कोरोना पॉझिटिव्ह

कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यातील नेरळ-कळंब रस्त्यावर धामोते गावाच्या हद्दीत परंतु दहिवली पुलाजवळ असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये राहणार्‍या 63 वर्षीय महिलेचे कोरोना टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. गेली काही दिवस ही महिला बदलापूरमधील एका खासगी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी दाखल होती. दरम्यान, आता त्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर कोविड रुग्णालयात उपचार …

Read More »

रायगडातील 175 आदिवासींची घरवापसी

अलिबाग : प्रतिनिधी – कोळसा भट्टीवर कामासाठी परराज्यांमध्ये गेलेले आणि तेथे अडकून पडलेले 175 आदिवासी बांधव रायगड जिल्ह्यातील आपल्या घरी सुखरूप पोहोचले आहेत. सर्वाहारा जन आंदोलनाच्या प्रयत्नांमुळे या आदिवासींची घरवापसी झाली आहे. उर्वरित आदिवासींना घरी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रायगड जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कातकरी आदिवासी महाराष्ट्राच्या बीड, सोलापूर जळगांव …

Read More »

पक्ष्यांकडूनही पावसाळ्याची तयारी; घरटे बांधण्यात व्यस्त

नवी मुंबई : बातमीदार – सर्व पक्षांतील चतुर पक्षी म्हणजे कावळा. मानवी वस्तीत राहून तो जास्तच हुशार झालेला दिसतो. सध्या उन्हाळा सुरू आहे. मनुष्यवस्तीत राहणार्‍या व मनुष्याशी एकरूप झालेल्या पक्षाचा विणीचा हंगाम सुरू झाला आहे. पावसाळ्या आधी या कावळ्यांचा विणीचा हंगाम त्यामुळे कावळ्यांची सध्या सर्वत्र चोचीतून घरटी बांधण्याची लगबग सुरू …

Read More »

नवी मुंबई महापालिकेकडून रुग्णवाहिकांचे सुयोग्य व्यवस्थापन

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुसार उपलब्ध रूग्णवाहिकांचे विभाग निहाय सुयोग्य नियोजन करण्याकडे विशेष लक्ष दिलेले आहे. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेकडे स्वत:च्या 12 रूग्णवाहिका असून पाच रूग्णवाहिका जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आरटीओच्या सहयोगाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. …

Read More »

उलवे, करंजाडे, देवद, सुकापूर परिसरात कंटेन्मेंट झोन घोषित

पनवेल : बातमीदार – पनवेल तालुक्यातील उलवे, करंजाडे, देवद, सुकापूर येथील परिसरामध्ये प्रत्येकी एक एक कोरोना विषाणूबाधित रुग्ण राहत असलेल्या इमारती कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन)म्हणून घोषित केल्या आहेत. यामध्ये उलवे येथील सेक्टर-19, प्लॉट नं.101,  भाग्यश्री को.ऑ.हौ.सो., करंजाडे येथील सेक्टर-2, प्लॉट नं.26, जय शिवम …

Read More »

‘जीवनज्योत’ने भागवली वृद्धाश्रमाची तहान

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुका निसर्गाने समृद्ध असला तरी उन्हाळ्यात येथे पाण्याचे भीषण संकट उभे राहते. आदिवासीबहुल भाग असलेल्या तालुक्याच्या अनेक भागांत पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. शिलार गावाजवळ असलेल्या वृद्धाश्रमात बोअरिंगची भूजल पातळी आटल्याने येथील वृद्धांना जल संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या तहानलेल्या वृद्धांच्या मदतीला जीवनज्योत सामाजिक संघटना …

Read More »

इनोव्हेशन कार्निव्हलची धूम; मुलांच्या कल्पकतेला चालना

माणगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लहान मुलांना खेळता, बागडता येत नाही. त्यामुळे ही मुले घरीच आपल्या परिवारासोबत वेळ घालवताना दिसत आहेत. अशातच अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन संस्थेद्वारे सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन समर कॅम्प उपक्रमात आता अशा मुलांचा वेळ सार्थकी लागणार आहे. कारण या माध्यमातून इनोव्हेशन कार्णीवल हा …

Read More »

घणसोलीतील विजेचा लपंडाव थांबवा

आमदार गणेश नाईक यांचे महावितरणला पत्र नवी मुंबई : बातमीदार – घणसोलीतील विजेचा लपंडाव थांबवा अशा सुचनेचे पत्र आमदार गणेश नाईक यांनी विद्युत विभागाला दिले आहे. जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्या, सर्व धोके तत्काळ लक्षात घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी त्यांनी पत्रात केली आहे. घणसोली परिसरांमध्ये हल्ली वीज खंडित होण्याचे …

Read More »