शेकापचे ज्येष्ठ नेते व परिवर्तनवादी चळवळीचे मार्गदर्शक आदरणीय नानासाहेब पाटील यांच्या निधनाची बातमी समजली तेव्हा खूप दुःख झाले. त्यांच्या निधनाने समाजाविषयी आत्मियता असणारा, परंतु समाजातील जुन्या अनिष्ट रुढी, परंपरा झुगारून देऊन नव्या विकासात्मक विचारांची गुढी उभारणारा नेता आपल्यातून हरपला आहे. नानासाहेब पाटील यांनी आयुष्यभर सामाजिक सुधारणांचाच विचार केला. नुसता विचार …
Read More »Monthly Archives: May 2020
उलवे, कोप्रोली परिसर कंटेन्मेंट झोन घोषित
पनवेल : बातमीदार – पनवेल तालुक्यातील उलवे व कोप्रोली येथे एक एक व्यक्ती कोरोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील कोरोना बाधित रुग्ण राहत असलेल्या उलवे येथील निल सिध्दी जोया सोसायटी, बी विंग, ही इमारत व कोप्रोली येथील फॉरच्यून गार्डन गृहनिर्माण संस्था, ई विंग, ही इमारत कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी …
Read More »फुटपाथ, हातगाड्यांवरील फेरीवाले हटविण्यात यावे
नगरसेविका वृषाली वाघमारे यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त – नवीन पनवेल येथील हातगाडी आणि फुटपाथवर अनेक भाजी व फळ विक्रेते उभे राहत असल्याने तेथे गर्दी होत आहे, कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता तेथे काही नागरीक खरेदीसाठी येतात. म्हणून हे फुटपाथवर बसणारे तसेच हातगाड्यांवर विकणार्या फेरीवाल्यांना हटविण्यात यावे, …
Read More »डॉ. अमित दवे यांची शासनाच्या कोविड टास्क फोर्स समितीवर नियुक्ती
पनवेल : प्रतिनिधी – डॉ. अमित भक्तीकुमार दवे यांची राज्य शासनाने कोविडच्या रुग्णांवरील उपचारासाठी आयुष अंतर्गत असलेल्या आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी व योगचिकित्सा पद्धतीचा अवलंब करण्याकरिता टास्क फोर्स ऑन आयुष समितीवर नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश शासनाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी काढले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर …
Read More »चौक येथून मजूर पनवेलकडे रवाना
मोहोपाडा : प्रतिनिधी – लॉकडाऊन व संचारबंदीत शिथिलता दिल्याने चौक परिसरातून उत्तरप्रदेशला जाण्यासाठी पनवेल रेल्वेस्टेशनला 12 बसेसमधून 286 मजूर रवाना झाले. आपापल्या गावाला जाण्याची मुभा मिळाल्यावर चौक परिसरातून अनेक उत्तरप्रदेशमधील कामगार कुटुंबातील सदस्यांसह गावी जाण्यासाठी चौक येथील स्वराज हॉटेल जवळ शेकडोंच्या संख्येने जमा झाले होते. खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार यांच्या …
Read More »नवी मुंबईत भाजपतर्फे सफाई कामगारांना धान्याचे वाटप
नवी मुंबई : प्रतिनिधी – संपूर्ण जगात कोरोना व्हायरस आजाराने थैमान घातले असताना आपल्या मतदारसंघात कोरोनामुळे आलेल्या संकटावर मात करण्यासाठी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी अत्यंत गरजवंतांना मोफत धान्य वितरणाचा धडाका सुरूच ठेवला आहे. अनेक ठिकाणी धान्याची चणचण भासत असताना तसेच बेलापूर विधानसभा क्षेत्रातील सफाई कर्मचार्यांची आवश्यकता ओळखून …
Read More »पनवेल तालुक्यात 27 नवे कोरोनाबाधित
पनवेल : प्रतिनिधीपनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 15) महापालिका क्षेत्रात 15 आणि ग्रामीणमध्ये 12 असे मिळून 27 नवे रुग्ण आढळले. आता महापालिका क्षेत्रात 234 रुग्ण झाले असून, तालुक्यात 324 रुग्ण आहेत, तर जिल्ह्यातील एकूण आकडा 459 झाला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे येथे आठ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी संकल्प सोसायटीत एकाच …
Read More »आषाढी वारीबाबत 30 मेनंतर अंतिम निर्णय
पुणे : कोरोनाची स्थिती पाहून 30 मेच्या नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, अधिकारीवर्ग आणि वारकरी प्रतिनिधी यांच्यात शुक्रवारी (दि. 15) पुणे येथील बैठकीत चर्चा झाली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाची नियमावली, लॉकडाऊन स्थिती, …
Read More »मुरूडच्या मच्छीमार नौका पावसाळ्याआधीच किनारी
मुरूड : प्रतिनिधीसर्वसाधारणपणे 1 जूनपासून मासेमारी बंद होते, मात्र यंदा कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे मुरूडमधील मच्छीमारांनी नौका महिनाभर आधीच किनारी आणून शाकारण्यास सुरुवात केली आहे.चालू वर्षी नैसर्गिक संकटांच्या मालिकांमुळे मासेमारी न झाल्याने आधीच मच्छीमार बांधवांना खूप नुकसान सहन करावे लागले आहे. अनेक मच्छीमार कर्जबाजारी झाले आहेत. अशातच कोरोना व त्यामुळे …
Read More »केंद्राकडून बळीराजाला दिलासा
कृषी क्षेत्रासाठी एक लाख कोटींचे पॅकेज नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाभिमानी भारताच्या मोहिमेची घोषणा करून त्यासाठी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. यातील दोन टप्प्यांची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली, तर शुक्रवारी (दि. 15) शेती, अन्न प्रक्रिया उद्योग, पशूपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसायाबाबत पॅकेज …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper