पेण : प्रतिनिधी व्यापारी, भाजी विक्रेते, दुकानदारांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत आपला व्यवसाय करावा अशी सूचना नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी पेण बाजारपेठेतील व्यापारी वर्गाला दिल्या. पेण शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये या करीत गुरुवारी पेणमधील मुख्य बाजारपेठेत नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत उपनगराध्यक्षा वैशाली कडू, …
Read More »Monthly Archives: May 2020
‘सचिन सावंत खोटे बोलण्याची फॅक्टरी’
मुंबई : मजुरांचे 85 टक्के रेल्वेभाडे केंद्र सरकार भरते, हा भाजपचा खोटारडेपणा उघडकीस आला, असा दावा करणारे एक प्रसिद्धीपत्रक काँग्रेसचे उपेक्षित प्रवक्ते सचिन सावंत यांनी काढले. यावर कुठल्याही अभ्यासाअभावी केवळ प्रेसनोटच्या भरोशावर जीवंत असलेल्या सचिन सावंत यांचे नाव सर्वाधिक खोटारडी प्रेसनोट काढणार्या यादीत आता अव्वल क्रमांकावर येत आहे. खोटे बोलण्याची …
Read More »पनवेलमध्ये कोरोनाचे 28 नवे रुग्ण; तिघांचा मृत्यू
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात शुक्रवारी 25 व ग्रामीण भागात तीन असे एकुण 28 नवे रुग्ण आढळले आहे. तर महापालिका क्षेत्रात खांदा कॉलनी, ग्रामीणमध्ये चिखले आणि उलवे येथील प्रत्येकी एक अशा तिघांचा मृत्यू झाला आहे. तर नऊ जणांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल ग्रामीणमध्ये विचुंबे, उलवे आणि पळस्पे येथील …
Read More »स्वामी नारायण ध्यान केंद्राद्वारे गरजूंसाठी जेवणाची व्यवस्था
पनवेल : वार्ताहर पनवेलमधील बावन्न बंगला या विभागात असलेल्या स्वामी नारायण ध्यान केंद्राद्वारे पनवेल परिसरातील जवळपास 28 हजार नागरिकांची गेल्या 42 दिवसांमध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे मजूर, गरीब, तसेच ज्यांचा हातावर पोट आहे. अशा लोकांची दुर्दशा झाली आहे. त्या अनुषंगाने स्वामीनारायण ध्यान केंद्र पनवेलने गरजू लोकांना …
Read More »शिरढोण गावात आयुष क्वाथ गोळ्यांचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिरढोण ग्रामस्थांच्या आरोग्याचा विचार करून प्रितेश मुकादम यांनी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून शिरढोण गावातील नागरिकांना आयुष क्वाथ या रोगप्रतिकारशक्ती वाढविणार्या गोळ्यांचे मोफत वाटप केले. कोरोनावर अजूनपर्यंत कोणतीही प्रभावी लस सापडली नसल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे शिरढोण …
Read More »बांधावरच बियाणे उपलब्ध झाल्याने उरणमधील शेतकरी पेरणीसाठी सज्ज
चिरनेर : रामप्रहर वृत्त शेतकरी राजा मशागतीची कामे आटपून, पेरणीसाठी सज्ज झाला आहे. पावसाची चाहूल लागताच शेतकर्यांची आप-आपल्या शेतात पेरणी करण्यासाठी लगबग होणार आहे. उरण तालुक्यातील दोन हजार चारशे हेक्टर क्षेत्र हे लागवडीखालील क्षेत्र असून, यात भातरोपांसाठी 240 हेक्टर जमिनीच्या क्षेत्रावर भातपेरणी होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शेतकर्यांना शेताच्या …
Read More »खारघरमधील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
नगरसेविका नेत्रा पाटील यांचे महावितरणला पत्र खारघर : रामप्रहर वृत्त खारघरमधील सेक्टर 20 व 21 मधील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी भाजप नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. नगरसेेविका नेत्रा पाटील यांनी दिलेल्या पत्रामध्ये …
Read More »आईच्या पुण्यतिथीनिमित्त वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तूंची दिली भेट
भाजप नेते राजेंद्र पाटील यांची सामाजिक बांधिलकी पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील यांनी त्यांच्या मातोश्री अनुसया हरिचंद्र पाटील यांच्या 13व्या पुण्यतिथीनिमित्त भानघर येथील करुणेश्वर वृद्धश्रमाला अन्नधान्य, फळे, सॅनिटायझर, रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याची औषधे आदी वस्तू सामाजिक बांधिलकी म्हणून भेट दिली. …
Read More »नेरुळच्या एसटीपी प्लांटमधील चोकअप काढण्यास सुरुवात
भाजपच्या सुहासिनी नायडू यांनी केली होती मागणी नेरुळ : रामप्रहर वृत्त नेरुळ येथील एसटीपी प्लांटमधील चोकअप काढण्यास सुरुवात झाली आहे. या संदर्भात भाजप युवती अध्यक्षा सुहासिनी नायडू यांनी मागणी केली होती. नेरुळ सेक्टर 2 येथे पालिकेचा एसटीपी प्लांट आहे. हा प्लांटमधून दररोज दुर्गंधी येत असून प्लांट चोक अप झालेला असल्याने …
Read More »पमपा हद्दीत 147 इमारती सील
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पनवेल महापालिकाकडून आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या नागरिकांच्या 147 इमारती सील करण्यात आल्या आहेत. इमारत परिसरात नियमाचे पालन करून 28 दिवसांचा कोरोना विषाणू बाधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन)म्हणून जाहीर करण्यात येत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांचा …
Read More »