Breaking News

Monthly Archives: June 2020

सिलिंडर टाक्या चोरणार्या टोळीचा खालापूर पोलिसांनी लावला छडा

सात जण अटकेत खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील पौध गावाच्या हद्दीत असलेल्या कारखान्यातून सिलिंडर टाक्यांची चोरी करणार्‍या टोळीचा छडा खालापूर पोलिसांनी लावला आहे. या प्रकरणी महादेव वामन वाघमारे (वय 42, रा. खानाववाडी), चंद्रकांत मारुती पवार (37, वरोसेवाडी), संतोष बबन अहिरे (23), रामदास बबन अहिरे (25, दोघेही रा. लाखरन, तिवरे, …

Read More »

आला पावसाळा, तब्येत सांभाळा!

आरोग्य प्रहर दरवर्षी पावसाळा सुरू झाला की वेगवेगळे आजार मान वर काढायला सुरुवात करतात. कारण वातावरणात झालेल्या बदलांचा प्रकृतीवर परिणाम होत असतो. सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे अशा समस्या नेहमी उद्भवतात. त्यातच या वर्षी कोरोनाची माहामारी असल्यामुळे सगळ्याच लोकांना आजारी पडण्याची जास्त भीती वाटत आहे. आज आम्ही तुम्हाला कोरोनाच्या माहामारीत …

Read More »

अहो आश्चर्यम्! नेरळमध्ये रस्त्याची चोरी

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील सगळ्यात मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीमध्ये चक्रावून सोडणारे एक प्रकरण समोर आले आहे. या ग्रामपंचायत हद्दीत ग्रामनिधीमधून केलेला एक रस्ताच चोरीला गेला आहे. एप्रिल 2019मध्ये नेरळ  हेटकरआळी भागात एका काँक्रीट रस्त्याचे काम करून बिल काढण्यात आले होते, मात्र आता तो रस्ताच त्या ठिकाणी नसल्याने …

Read More »

पनवेल ः जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त पनवेल तालुका आणि शहर भाजपच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

Read More »

विद्यार्थिनीची आत्महत्या

पनवेल ः शहरातील राहत्या इमारतीच्या टेरेसवरून खाली उडी मारून 16 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली. श्रेया म्हात्रे असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. दहावीची परीक्षा दिलेल्या श्रेयाने बाहेर जाऊन येते, असे आईला सांगितले. त्यानंतर तिने सनराईज बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली. यानंतर तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी …

Read More »

रस्त्यांवरील विक्रेत्यांची आरोग्य तपासणी गरजेची -तेजस कांडपिळे

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात अनेक भाजी आणि फळविक्रेते रस्त्यावर किंवा फुटपाथवर बसून आपल्या मालाची विक्री करीत आहेत. यापैकी अनेकांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसत असतानाही ते दवाखान्यात जाऊन उपचार घेत नसल्याचे निदर्शनास येत आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे घातक असल्याने अशा विक्रेत्यांची नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे …

Read More »

निसर्ग चक्रीवादळात पनवेल तालुक्यातील 84 शाळांचे नुकसान

पनवेल ः बातमीदार साधारणतः दोन आठवड्यांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे पनवेल तालुक्यातील 84 शाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शाळांचे कौले, पत्रे उडाले असून भिंतीदेखील पडल्या आहेत. त्यामुळे या शाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.   निसर्ग चक्रीवादळामुळे तालुक्यातील शैक्षणिक दालनांची वाताहत झाली. अनेक घरे, शाळा उद्ध्वस्त झाल्या. या वादळात शाळांच्या इमारतींची …

Read More »

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी झालेली नाही

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आरोप कोल्हापूर : प्रतिनिधीशेतकर्‍यांच्या कर्जमाफीबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही. सरकारच्या अव्यवहार्य निर्णयांमुळेच शेतकर्‍यांना खरिपाच्या हंगामासाठी बँकांकडून कर्ज मिळत नाही,’ असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. खरिप हंगामाकरिता शेतकर्‍यांना तातडीने कर्जपुरवठा व्हावा, या मागणीसाठी त्यांनी सोमवारी (दि. 22) कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी दौलत …

Read More »

मंत्री धनंजय मुंडेंना वेगळा न्याय का? किरीट सोमय्यांचा सवाल

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना रुग्णालयातून घरी पाठविताना त्यांची पुन्हा चाचणी करण्यात आली. इतर रुग्णांना घरी पाठविताना मात्र त्यांची पुन्हा चाचणी केली जात नाही. मग मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंसाठी वेगळा न्याय का, असा खडा सवाल माजी खासदार व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांनी या …

Read More »

रायगडात 102 नवे पॉझिटिव्ह रुग्ण; तिघांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 22) सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येने शंभरी पार केली. जिल्ह्यात 102 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, तीन जण मृत्युमुखी पडले आहेत. दिवसभरात पनवेल महापालिका हद्दीत 53, पनवेल ग्रामीण आणि कर्जत तालुक्यात प्रत्येकी 20, उरण तालुक्यात तीन, पेण व महाड तालुक्यात प्रत्येकी दोन, तर …

Read More »