Breaking News

Monthly Archives: June 2020

कोरोनाबळींचा आकडा लपवला जातोय

आमदार प्रशांत ठाकूर यांचा आरोप अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या जास्त आहे. प्रशासन कोरोनामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांचा आकडा लपवत आहे. याचा त्रास रायगड जिल्ह्यातील लोकांना सहन करावा लागत आहे, असा आरोप भाजप उत्तर रायगड अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 22) येथे केला.रायगड जिल्ह्यातील कोरोनासंदर्भातील माहिती घेण्यासाठी …

Read More »

नेरळमधील सोसायटीचा बळीराजाला हात

साडेतीन कोटींचे कर्ज शेतकरी सभासदांना बिनव्याजी वाटणार कर्जत : बातमीदार रायगड जिल्ह्यातील शेतकरी कोरोनाच्या संकटामुळे मेटाकुटीला आला आहे. अशा वेळी बळीराजाला आधार देण्यासाठी कर्जत तालुक्यातील नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटी पुढे सरसावली आहे. सोसायटीने आपल्या 450 शेतकरी सभासदांसाठी तब्बल साडेतीन कोटी रुपये पीक कर्जासाठी उपलब्ध करून दिले असून, हे सर्व …

Read More »

‘सोशल स्पार्क’च्या मास्कचा गोरगरिबांना आधार

पनवेल : प्रतिनिधीआपण ज्या समाजात राहतो त्याचे आपण काहीतरी देणे लागतो याची जाणीव ठेवून सोशल स्पार्क या ग्रुपच्या माध्यमातून कोरोना योद्धे तसेच गोरगरिब नागरिकांना मास्कचे वाटप केले जात आहे. आज या ग्रुपमध्ये मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि कर्नाटक राज्यातील महिलाही सहभागी होऊन कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आपले योगदान देत आहेत, असे ग्रुप लीडर सुषमा …

Read More »

स्वदेशी वस्तू वापरण्याचा तरुणाईचा निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्तचिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार घालतानाच 2022 साली येत्या 75व्या स्वातंत्र्यदिनापर्यंत रोजच्या जीवनात वापरल्या जाणार्‍या वस्तूंपैकी किमान 75% भारतीय बनावटीच्या (मेड इन इंडिया) वापरण्याची ऑनलाईन प्रतिज्ञा रविवारी (दि. 21) भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांसमवेत अनेक युवक-युवतींनी घेतली. आपल्या देशाचे पंतप्रधान …

Read More »

रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कर्जत ः बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली  कर्जत-खालापूर तालुक्यातील 407वे रक्तदान शिबिर राणाप्रताप मित्र मंडळ मोठे वेणगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास 47 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तालुक्यातील मोठे वेणगाव येथील राणाप्रताप मित्र मंडळ यांच्या वतीने विठ्ठल मंदिराच्या सभागृहात समर्पण ब्लड …

Read More »

कोरोना रुग्णाचा खासगी गाडीतून प्रवास; ग्रामपंचायतीने वेधले रिलायन्सचे लक्ष

नागोठणेः प्रतिनिधी रुग्णाच्या आजारपणाची पूर्वकल्पना न देता तसेच चालकाला कोणत्याही प्रकारची सुरक्षा प्रदान न करता नागोठण्यातील एका टुरिस्ट कारचालकाला रुग्णालयात पाठविल्याबद्दल नागोठणे ग्रामपंचायतीने खंत व्यक्त करीत नागोठणे गावाला उद्भवणार्‍या धोक्याबाबत निवेदनाद्वारे नागोठणे रिलायन्सच्या अध्यक्षांचे लक्ष वेधले आहे. येथील रिलायन्स निवासी संकुलात राहणार्‍या कंपनीच्या एका कर्मचार्‍याला कोरोनाची लागण झाली असून सध्या …

Read More »

निसर्ग चक्रीवादळात सुरूच्या झाडांची पडझड; नवीन वृक्ष लागवड करण्याची मागणी

मुरूड ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे काशीद व मुरूड किनार्‍यावरील असंख्य सुरूची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. ताशी 120 किलोमीटरच्या वार्‍यापुढे ही झाडे टिकाव धरूशकली नाहीत. मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली आहेत. परिणामी सामाजिक वनीकरण विभागाने समुद्रकिनारी पुन्हा सुरूंच्या झाडाची लागवड करावी, अशी मागणी लोकांकडून होत आहे. तसेच मुरूड येथील समुद्रकिनार्‍यावर रायगड …

Read More »

वेळेत उपचार न मिळाल्याने जखमी तरुणाचा मृत्यू

माणगाव : प्रतिनिधी दुचाकी अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. 21) घडली. माणगाव येथे रुग्णवाहिका वेळेत न उपलब्ध झाल्याने सहा तासांपासून बाहेर स्ट्रेचरवर मृत्यूशी झुंज देणार्‍या या तरुणाने अलिबागला पोहचण्याआधीच रस्त्यात जीव सोडला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, माणगाव तालुक्यातील विळे रस्त्यावर …

Read More »

कर्जत पोलिसांना कोरोनाचा विळखा; 20 रुग्णांची वाढ; आरोपीच्या संपर्कात आल्याने संसर्ग

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. सोमवारी एका दिवसात 20 नवीन रुग्ण आढळून आले असून सर्वाधिक कोरोना रुग्ण पोलीस आहेत. नेरळ पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी आणि सात कर्मचारी तसेच कर्जत पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. सोमवारी कर्जत तालुक्यातील 12 पोलिसांचे अहवाल पॉझिटिव्ह आले …

Read More »

विजेच्या धक्क्याने पाच म्हशी मृत्युमुखी

अलिबाग ः प्रतिनिधी तालुक्यातील आवास येथे शनिवारी सायंकाळी विजेच्या धक्क्याने पाच म्हशींचा जागीच मृत्यू झाला. यात म्हशींचे मालक अशोक भगत यांचे सव्वातीन लाख रुपयांचे नुकसान झाले. भगत यांच्या काही म्हशी चरण्यासाठी आवास ते किहीमदरम्यानच्या जंगलात गेल्या होत्या. चक्रीवादळामुळे अलिबाग तालुक्यात वीजवाहक तारा तुटून पडल्या आहेत. त्यांची जोडणी करून वीजपुरवठा सुरळीत …

Read More »