Breaking News

Monthly Archives: June 2020

खालापुरात शेतीच्या कामांना सुरुवात

खोपोली ः प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसल्याने हैराण झालेल्या शेतकर्‍यांचे जीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या वर्षी पावसाचे वेळेवर आगमन झाल्याने काहींची तारांबळ उडाली आहे, मात्र या पावसाने शेतकरी सुखावला असून खालापूर तालुक्यातील सर्वच  शेतकर्‍यांनी आपल्या शेतीच्या मशागतीच्या व भातपेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे. खालापूर तालुक्यात पावसाने दमदार …

Read More »

माणगाव तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी

बाधित रुग्णांची संख्या सातवर माणगाव ः प्रतिनिधी – माणगाव तालुक्यातील इंदापूर येथील 50 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा शुक्रवारी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या बळीची नोंद प्रशासनाकडे करण्यात आली आहे. तसेच शनिवारी माणगावमध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला असून तालुक्यात सद्यस्थितीत सात कोरोनाबाधित रुग्ण असल्याची माहिती तहसीलदार …

Read More »

‘रोटरी’च्या पुढाकाराने वादळग्रस्तांच्या डोक्यावर छप्पर

कर्जत ः बातमीदार – निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या कर्जत तालुक्यातील शिंगढोळ गावातील कुटुंबांना रोटरी क्लबने मदतीचा हात दिला असून, रोटरीच्या मदतीमुळे या ग्रामस्थांना आपल्या घरावर पुन्हा छप्पर टाकता आले आहे. निसर्ग चक्रीवादळात कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात रजपे ग्रामपंचायतमधील शिंगढोळ गावाची भयानक परिस्थिती झाली होती. वादळ वार्‍यात गावातील सर्व घरांची पडझड …

Read More »

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात 250 शासकीय वास्तूंची वाताहत

तब्बल पाच कोटींचे नुकसान; पावसाळ्यात दुरुस्तीचे आव्हान कर्जत ः बातमीदार – निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील 250 शासकीय इमारतींच्या छपरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा, ग्रामपंचायत कार्यालये, स्मशानभूमी शेड, समाज मंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडी केंद्र आणि पशुवैद्यकीय दवाखाने आदी 250हून अधिक वास्तूंचे तब्बल पाच कोटी …

Read More »

मुरूडमध्ये मुस्लिम तरुणांकडून स्वच्छता मोहीम

मुरूड : प्रतिनिधीयेथील अंजुमन दर्दमंडले तालिमो तरकी या सामाजिक संस्थेच्या वतीने शनिवारी (दि. 13) मुरूड शहरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. या वेळी सुमारे दोनशे मुस्लिम युवकांनी रस्त्यावर उतरून चक्रीवादळामुळे पडलेली झाडे, कचरा साफ केला. मुरूड शहराला निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. नारळ, सुपारी व इतर झाडे उन्मळून पडल्याने शहराच्या …

Read More »

विदेशी सिगरेटस्चा कोट्यवधींचा साठा जप्त

पनवेलमध्ये दोन जणांना अटक उरण : प्रतिनिधीदुबईहुन जेएनपीटी बंदरामार्गे आलेला 11 कोटी 88 लाख 28 हजार 800 रुपये किमतीचा विदेशी सिगरेटचा साठा महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकार्‍यांनी जप्त केला आहे. पनवेल तालुक्यातील सोमाटणे येथील नवकार कंटेनर गोदामात ही कारवाई करण्यात आली.दुबईहुन आलेल्या 49 फूट लांबीच्या कंटेनरमध्ये खजुराच्या बॉक्समध्ये विदेशी सिगरेटचा …

Read More »

काँग्रेस नेते नाराज; मुख्यमंत्र्यांना भेटणार

मुंबई : प्रतिनिधीराज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी केले जात नसल्यामुळे काँग्रेस नाराज आहे. यामुळे आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. यासंदर्भात थोरात यांनी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. त्यानुसार नाराजीच्या कारणांबाबत सोमवारी (दि. 15) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते …

Read More »

सर्पमित्रांनो सावधान! साप हाताळतानाचे फोटो, व्हिडिओ व्हायरल केल्यास गुन्हा

पुणे : प्रतिनिधीसर्पमित्रांकडून नागरी वस्तीमधील साप पकडून त्यांना सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यात सोडले जाते, परंतु अनेकदा साप पकडण्यापूर्वी वनखात्याची परवानगी घेतली जात नाही. त्याचप्रमाणे साप हाताळतानाचे फोटो, व्हिडिओ व्हायरल केले जातात. त्यामुळे वन्यजीव कायद्याचे उल्लंघन होत असून, अशा सर्पमित्रांविरुद्ध गुन्हे दाखल होऊ शकतात, असा इशारा वनखात्याने दिला आहे.काही हौशी सर्पमित्र सापाला …

Read More »

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पेणला धावती भेट

विविध घटकांच्या समस्या घेतल्या जाणून पेण : प्रतिनिधीचक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकण दौर्‍यावर आलेले माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सहकार्‍यांनी शुक्रवारी (दि. 12) रात्री परतत असताना पेण येथे भेट दिली. या वेळी त्यांनी वादळग्रस्तांसह गणपती कारखानदार आणि नाभिक संघटनेच्या समस्या जाणून घेतल्या.निसर्ग चक्रीवादळाने रायगड व …

Read More »

कोरोना रुग्णसंख्येचा देशात नवा विक्रम

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशातील कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. शनिवारी (दि. 13) सकाळी संपलेल्या 24 तासांत देशात 11 हजार 458 नवे रुग्ण आढळले असून, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा तीन लाख आठ हजार 993वर पोहोचला आहे. एका दिवसात सर्वाधिक नवे रुग्ण आढळल्याचा हा विक्रम आहे. याशिवाय मागील 24 तासांत 386 …

Read More »