आरोग्यप्रहर व्यायाम म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर पैलवान किंवा पीळदार शरीरे येतात. असे होण्यासाठी तर व्यायाम लागतोच, पण निरोगी राहण्यासाठीही व्यायाम लागतो हे अनेकांना माहीतच नसते. भारतीय समाजामध्ये व्यायामाची आवड कमी आहे. सुशिक्षित सुखवस्तू समाजात तर व्यायामाची आवड अगदीच कमी आहे. भारतातील जातीव्यवस्थेमुळे कष्टकरी वर्गाला अन्न कमी, तर खाणार्यांना श्रमच नाही अशी …
Read More »Monthly Archives: September 2020
मच्छीमार उद्ध्वस्त!
अस्मानी संकटाचा फटका; शासनाकडून मदतीची अपेक्षा श्रीवर्धन : प्रतिनिधी मासेमारी बंदीनंतर 1 ऑगस्टपासून पुन्हा मासेमारी सुरू झाली असली तरी कोरोना, निसर्ग चक्रीवादळ आणि आता अतिवृष्टी व समुद्री वादळांंमुळे मच्छीमार पुरता उद्ध्वस्त झाला आहे. अशातच राज्य सरकारकडून 140 कोटी रुपयांचा डिझेल परतावा मंजूर होऊनही अद्याप मिळालेला नसल्याने कोळी बांधव आर्थिक संकटात …
Read More »मास्क हीच तूर्तास लस?
कोरोनाच्या आघाडीवर भारतासाठी काहिशी ‘गुड न्यूज’ आहे. भारतात प्रचंड संख्येने म्हणजे 50 लाखांच्या वर कोरोना रुग्ण आहेत, असे ऐकल्यावर आपली छाती दडपते, परंतु त्याच भारतात जगातील सर्वाधिक जवळपास 45 लाख बरे झालेले कोरोना रुग्ण आहेत हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. आपला कोविड-19मधून बरे होण्याचा दर आता 80 टक्क्यांच्या पुढे गेला …
Read More »जासई हायस्कूलमध्ये कर्मवीर जयंती साजरी
उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची 133वी जयंती जासई विद्यालयात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला शाळेचे चेअरमन अरुणशेठ जगे, भारतीय मजदूर संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष, कामगार नेते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य सुरेश पाटील, माजी सभापती नरेश घरत, …
Read More »‘ते’ बालक वात्सल्य ट्रस्टकडे
अलिबाग : प्रतिनिधी रसायनीत फेकलेल्या नवजात बालकाला अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डॉक्टरांनी व रसायनी पोलिसांच्या मदतीने जीवदान मिळाले आहे. नवजात अर्भकाला अलिबाग येथील वात्सल्य ट्रस्टकडे सोपविण्यात आले. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कचरा साठवणूक केलेल्या मैदानावर कोणीतरी अज्ञाताने हे अर्भक फेकून दिले. हे अर्भक पुरुष जातीचे असून याबाबत रसायनी पोलिसांना …
Read More »महिला अत्याचाराविरोधात भाजपतर्फे आंदोलन
खारघर ः रामप्रहर वृत्त महाराष्ट्र महिला मोर्चा अध्यक्ष उमाताई खापरे यांच्या सूचनेनुसार व आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी कोविड सेंटरमध्ये महिलांवर होणार्या आत्याचाराविरोधात भारतीय जनता पक्ष महिला मोर्चातर्फे खारघर येथे आंदोलन करण्यात आले. कोरोनाचे सर्व नियम पाळून खारघर येथील पोलीस ठाण्यात खारघर तळोजा मंडळाच्या …
Read More »कोविड सेंटरमध्ये महिला पोलिसांची नेमणूक करा
उरण तालुका भाजप महिला मोर्चाची मागणी उरण ः वार्ताहर कोविड सेंटरमधील महिला रुग्णांच्या सुरक्षेसाठी रुग्णालयात महिला पोलिसांची नेमणूक करावी, तसेच सीसीटीव्ही बसवून गस्त घालण्यात यावी, आदी मागण्या उरण तालुका भाजप महिला मोर्चा अध्यक्ष अॅड. राणी म्हात्रे यांनी मंगळवारी (दि. 22) उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी तसेच उरणचे …
Read More »पनवेल तालुक्यात 252 नवीन पॉझिटिव्ह
नऊ जणांचा मृत्यू; 285 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 22) कोरोनाचे 252 नवीन रुग्ण आढळले असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर 285 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 194 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर …
Read More »रायगड जिल्ह्यात 507 नवे पॉझिटिव्ह; 18 रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 507 नव्या कोरोना रुग्णांची आणि 18 रुग्णांच्या मृत्यूची नोंद मंगळवारी (दि. 22) झाली, तर दिवसभरात 685 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 252, अलिबाग 65, माणगाव 51, महाड 25, रोहा 16, कर्जत व पेण प्रत्येकी 15, पोलादपूर 14, खालापूर 13, मुरूड 11, …
Read More »पालिका प्रशासनाच्या ताफ्यात सुरक्षा रक्षक
खारघर ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका प्रशासनाच्या ताफ्यात सोमवारी (दि. 21) 10 सुरक्षा रक्षक दाखल झाले आहेत. खासगी सुरक्षा एजन्सीच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात ही भरती करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या पथकात हे सुरक्षा रक्षक कार्यरत असणार आहेत. कोरोनाच्या काळात आरोग्य विभागाच्या माध्यमातून मास्क न घालणे तसेच शासनाने घालून दिलेले नियम न …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper