Breaking News

Monthly Archives: September 2020

महाडमध्ये हुतात्मा दिनी शहिदांना अभिवादन

महाड ः प्रतिनिधी क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित प्रतिष्ठानच्या वतीने शहीद हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी गुरुवारी (दि. 10) महाडच्या हुतात्मा दिनी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. थोर स्वातंत्र्यसेनानी नानासाहेब पुरोहित यांच्यामुळे महाडमध्ये देशाच्या समग्र स्वातंत्र्यलढ्याची पहिली ठिणगी पडली. त्या अनुषंगाने महाडमध्ये क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित यांच्या नावे सुरू करण्यात आलेल्या प्रतिष्ठानमार्फत 78 …

Read More »

कर्जत पंचायत समितीला आली जाग!शिवरायांसह हुतात्म्यांच्या पुतळ्यांचे होणार सुशोभीकरण; ‘राम प्रहर’चा दणका

कर्जत ः बातमीदार कर्जत पंचायत समिती कार्यालयात असलेले छत्रपती शिवाजी महाराज तसेच हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचे पुतळे अंधारात, जमिनीवर पाणी असलेल्या जागी आणि आजूबाजूच्या भिंती काळपट अशा स्थितीत होते. दरम्यान, तालुक्यातून याबाबत सर्वांनी आवाज उठविल्याने कर्जत पंचायत समिती खडबडून जागी झाली आणि त्यांनी परिसर स्वच्छ करून रंगरंगोटी …

Read More »

कंगनाच्या कार्यालयावर बीएमसीची कारवाई; न्यायालयाकडून स्थगिती

मुंबई : प्रतिनिधी अभिनेत्री कंगना रनौतच्या मुंबईतील कार्यालयाचे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगत महापालिकेने बुधवारी (दि. 9) कारवाई सुरू केली होती, मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या कारवाईला तूर्तास स्थगिती दिली आहे. या प्रकरणी गुरुवारी दुपारी 3 वाजता पुन्हा सविस्तर सुनावणी होणार आहे. मुंबई महापालिकेचे कर्मचारी सकाळी कंगनाच्या कार्यालयाबाहेर धडकले आणि त्यांनी …

Read More »

भारतीय रेल्वे कात टाकणार! संपूर्ण गाडी एसी करण्याची योजना

मुंबई : प्रतिनिधी भारतीय रेल्वेमध्ये आजवर वेळोवेळी प्रवाशांच्या आरामदायी प्रवासाच्या दृष्टीने अनेक बदल झाले आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा रेल्वे कात टाकणार असून, एक महत्त्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार आता कमी खर्चात नागरिकांना एसी डब्यातून प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजेच रेल्वेने जनरल डब्यांसह सर्व डबे …

Read More »

श्रीवर्धन तालुक्यात भातशेती बहरली

श्रीवर्धन : प्रतिनिधी यावर्षी पावसाची सुरुवात 3 जून रोजीच झाली. तीन जून रोजी कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकले व या चक्रीवादळाच्या सोबतच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर जून महिन्याच्या आठ तारखेपासून नियमित पणे मोसमी पाऊस पडू लागला. शेतकर्‍यांनी रोहिणी नक्षत्र निघाल्यावर पेरलेले भात चक्रीवादळाच्या वेळी पडलेल्या पावसामुळे शेतात उगवले होते …

Read More »

तळोजा एमआयडीसीतील कंपन्या आजपासून होणार सुरू

खारघर : प्रतिनिधी तळोजा एमआयडीसीमध्ये मागील साडेचार महिन्यापासून बंद असलेल्या 804 उद्योग धंदे सुरु करण्यास शासनाने परवानगी दिल्याने गुरुवारपासून संपूर्ण तळोजा एमआयडीसी लॉकडाऊन नंतर प्रथमच सुरु होणार आहे. लाखो कामगार वर्गाचा रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे. तळोजा एमआयडीसीच्या मध्ये एकूण 973 कारखाने आहेत. यापैकी 169 उद्योग धंदे अत्यावश्यक सेवा पुरवीत असल्याने …

Read More »

तीन पत्रकारांना खालापुरात अटक; मुख्यमंत्र्यांच्या फार्म हाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

खोपोली : प्रतिनिधी अर्णव गोस्वामी संपादक असलेल्या रिपब्लिक टीव्हीच्या तीन पत्रकारांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खालापूर तालुक्यातील भिलवले येथील फार्म हाऊसमध्ये शिरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अनुज कुमार, जसपाल सिंह व प्रदीप धनवडे अशी या तिघांची नावे आहेत. तिघांनाही अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. …

Read More »

नागोठणे टपाल कार्यालयातील तांत्रिक अडचणींमुळे ग्राहक त्रस्त

भाजपकडून निवेदन नागोठणे : प्रतिनिधी येथील टपाल कार्यालयात वारंवार तांत्रिक अडचणींचे कारण देऊन अनेक महत्त्वाच्या सेवा नाकारल्या जात असल्याने शहरासह परिसरातील जनता त्रस्त झाली आहे. याबाबत नागोठणे शहर भाजपने याची दखल घेत शहर अध्यक्ष सचिन मोदी यांचे नेतृत्वाखाली टपाल कार्यालयात बुधवारी (दि. 9) निवेदन देण्यात आले. याबाबत येथील उप डाकपाल …

Read More »

ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांचे निधन

कर्जत : प्रतिनिधी बातमीदार माथेरान येथील ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र न्यूज 24चे संपादक संतोष पवार (वय 54) यांचे बुधवारी (दि. 9) सकाळच्या सुमारास वेळेवर उपचार उपलब्ध न झाल्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने रायगड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. संतोष पवार यांची रायगड जिल्ह्यातील पत्रकारांचा आधारस्तंभ म्हणून ओळख होती. रायगड प्रेस क्लबचे …

Read More »

फुकटचा तमाशा

सर्वप्रथम हे आवर्जून नमूद केले पाहिजे की मुंबईला पाकिस्तानव्याप्त काश्मीर संबोधणे आणि मुंबई पोलिसांना माफिया म्हणून दूषणे देणे खचितच समर्थनीय नाही. या दोन्ही गंभीर घोडचुका बॉलिवुडची अभिनेत्री कंगना राणावत हिने केल्या. त्याचा निषेध करावा तितका थोडा आहे. परंतु अशी बेफाम वक्तव्ये केल्याची शिक्षा म्हणून तिच्या मालमत्तेवर बुलडोझर फिरवणे ही एकप्रकारची …

Read More »