अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या बुधवारी (दि. 9) व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आलेल्या ऑनलाइन सभेत तंत्रज्ञानातील त्रुटींमुळे गोंधळ उडाला. या वेळी सदस्यांचा अधिकार्यांशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे ही सभा काही मिनिटांमध्येच आटोपण्यात आली. राजिपची अर्थसंकल्पीय सभा 11 मार्च 2020 रोजी झाली होती. त्यानंतर 10 जून रोजी सभा आयोजित करण्यात आली …
Read More »Monthly Archives: September 2020
पनवेल तालुक्यात आढळले तब्बल 372 नवे रुग्ण
एकाचा मृत्यू; 214 जणांची कोरोनावर मात पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 9) कोरोनाचे 372 नवीन रुग्ण आढळले असून, एकाचा मृत्यू झाला आहे, तर 214 रुग्णांनी कोरोनावर मात केली. महापालिका हद्दीत दिवसभरात 254 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर 175 रुग्ण बरे झाल्याने त्यांना …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मोखाडा महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन; ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्सकडून भरीव देणगी
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मश्री कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वारसा जपत शिक्षण क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय आणि प्रेरणादायी काम करणारे संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील एएससी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन मंगळवारी (दि. 8) करण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगचे …
Read More »मराठा आरक्षणाला स्थगिती; अंमलबजावणीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; मविआ सरकारला मोठा धक्का
नवी दिल्ली : वृत्तसंस्था नोकरी व शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण सध्या लागू होणार नाही, असे सांगत न्यायालयाने या आरक्षणाच्या अंमलबजावणीला तूर्तास स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर या खटल्याची सुनावणी मोठ्या खंठपीठाकडे सोपविण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या मराठा आरक्षणाला सर्वोच्च …
Read More »रायगड जिल्ह्यात तब्बल 963 रुग्णांचा नवा उच्चांक
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 9) आजवरच्या सर्वाधिक 963 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर नऊ रुग्णांचा कोविड-19मुळे बळी गेला आहे. दुसरीकडे दिवसभरात 436 जण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 372, अलिबाग 206, पेण 115, खालापूर 40, उरण 27, रोहा 53, कर्जत 49, माणगाव …
Read More »‘सवतकड्या’वर पर्यटकांचा ओघ; ई-पास रद्द केल्यामुळे नागरिकांची भटकंती
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील वावडुंगी ग्रामपंचायत हद्दीतील सुप्रसिद्ध असलेला सवतकडा येथील धबधबा पर्यटकांचे व स्थानिकांचे खास आकर्षण ठरत आहे. उंच धबधबा व त्यातून उडणारे तुषार पर्यटकांना आकर्षित करतात. राज्य शासनाने ई-पास रद्द केल्यामुळे मुरूडमध्ये आता पर्यटक तुरळक प्रमाणात दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने ठाणे व पनवेल येथील …
Read More »‘कोमसाप’च्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार
माणगाव ः प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य परिषद माणगाव शाखेच्या वतीने गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष 2019-20करिता तालुक्यातील गुणवंत शिक्षक म्हणून मुकेश रमेश भोस्तेकर आणि संगीता व्यंकट सुरशेट्टे यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या वर्षी शाखेच्या वतीने जिल्हा समन्वयक अ. वि. जंगम यांच्या सूचनेनुसार गुणवंत …
Read More »शिवरायांसह हुतात्म्यांची अवहेलना; कर्जत पं.स.कार्यालयात पुतळे फाटक्या छपराखाली व अंधारात
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्याची अस्मिता समजले जाणारे हुतात्मा भाई कोतवाल व हिराजी पाटील तसेच देशाची अस्मिता समजले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्यांची कर्जत पंचायत समिती कार्यालयात परवड सुरू आहे. पंचायत समितीच्या दुमजली कार्यालयात प्रवेश केल्यावर एका बंद खोलीत हे पुतळे असून, त्या खोलीचे छप्पर फाटून काळपट पडले आहे. …
Read More »पोलीस मित्र संघटनेच्या तालुका उपाध्यक्षपदी योगेश पाटील
पनवेल : रामप्रहर वृत्त पोलीस मित्र संघटनेच्या पनवेल तालुका उपाध्यक्षपदी रसायनी येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश बाळाराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. योगेश पाटील रसायनी विभागातील कासप गावचे रहिवासी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक, शैक्षणिक उपक्रमात सातत्याने सहभाग घेत सामाजिक बांधिलकी जपत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पोलीस मित्र …
Read More »उरणच्या चिमुरडीचा विक्रम
उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील अवघ्या पावणे सहा वर्षांच्या हर्षिती भोईर या चिमुरडीने ट्रेकिंगमध्ये विक्रम केला आहे. या बद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हर्षिती भोईर हीने साडेतीन वर्षांची असल्यापासून ट्रेकची आवड जोपासली आहे. फक्त साडेपाच वर्षात तिने दोन रेकॉर्डची नोंद करून आपले आणि आपल्या गावाचे नाव पूर्ण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper