Breaking News

Monthly Archives: September 2020

पेण अर्बन बँकेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक; ठेवीदारांनी वाचला समस्या, तक्रारींचा पाढा

अलिबाग ः प्रतिनिधी 598 कोटींच्या थकीत कर्जांची वसुली करा, जप्त केलेल्या मालमत्तांची विक्री करून ठेवीदारांचे पैसे परत द्या, दर महिन्याला झालेल्या कार्यवाहीसाठी नियमित आढावा बैठका घ्या यांसारख्या मागण्या पेण अर्बन बँक ठेवीदारांच्या वतीने मंगळवारी (दि. 8) जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्या. या वेळी ठेवीदारांनी आपल्या समस्या आणि तक्रारींचा पाढाच जिल्हा प्रशासनासमोर …

Read More »

कंगना मुंबईकडे रवाना

मनाली : वृत्तसंस्था अभिनेत्री कंगना राणौतविरोधात तिने केलेल्या वक्तव्यावर विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव सादर झाला आहे, तर दुसरीकडे कंगनाच्या कार्यालयात अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप मुंबई महापालिकेने करून 24 तासांत कागदपत्र जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कंगना एक दिवस आधीच मनालीच्या घरातून मंगळवारी (दि. 8) मुंबईकडे रवाना झाली. दरम्यान, राज्याचे …

Read More »

रिया चक्रवर्तीला अखेर ‘एनसीबी’कडून अटक

मुंबई ः प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला ड्रग्ज सेवनासह इतर आरोपांखाली मंगळवारी (दि. 8) अटक करण्यात आली. अमली पदार्थविरोधी विभागाने (एनसीबी) ही कारवाई केली. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ड्रग्ज तस्करीचा मुद्दा समोर आला होता. त्याची चौकशी केल्यानंतर यात …

Read More »

राज्य सरकारच्या विधेयकाचा राज्य सहकार खात्याचा भोंगळ कारभार; घोटाळेबाज कर्नाळा नागरी सहकारी बँकेला संरक्षण; राज्य सरकारच्या विधेयकाचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून निषेध

मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त सहकारी बँकेसंदर्भात राज्याच्या सहकार खात्याकडून चांगल्या तरतुदी आणण्याची गरज होती, मात्र तसे न करता उलट घोटाळेबाज कर्नाळा नागरी सहकारी बँकेला संरक्षण देण्याचे काम केले जात आहे, अशी टीका करीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 8) विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सहकारी बँकधार्जिण्या विधेयकाला विरोध करून निषेध …

Read More »

कोविड केअर सेंटर की मृत्यूचे आगार? : देवेंद्र फडणवीस

मुंबई ः राज्यात कोरोनामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरमधील परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. बीकेसीमध्ये उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये होणार्‍या मृत्यूविषयी चिंता व्यक्त करीत ते कोविड केअर सेंटर आहे की …

Read More »

…अन्यथा आरपारची लढाई

विजयी मेळाव्यात प्रकल्पग्रस्तांचा निर्धार नागोठणे ः प्रतिनिधी आंदोलनाची आम्हाला अजिबात हौस नाही, मात्र जनतेच्या हक्कांसाठी आमची लोकशासन संघटना बाहेर पडली तर हक्क मिळवून दिल्याशिवाय थांबत नाही. जगात जनशक्तीला कोणीही हरवू शकले नसून रिलायन्सने प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावले नाहीत, तर पुढची लढाई आरपारची असेल, असा इशारा लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे प्रदेश …

Read More »

तरुणांकडून भोराई मंदिराची साफसफाई

पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील ऐतिहासिक व अभेद्य असा सुधागड किल्ला कायम स्वच्छ राहावा यासाठी दुर्गप्रेमी नेहमीच प्रयत्नशील असतात. अतिवृष्टीमुळे सुधागड किल्ल्यावरील प्राचीन भोराई मातेच्या मंदिरात चिखल झाला होता. त्यामुळे सुधागड तालुक्यातील काही तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रविवारी (दि. 6) एकत्र येत भोराई मंदिराची स्वच्छता करून गाभार्‍यातील चिखलदेखील साफ केला. सुधागड किल्ल्याचे …

Read More »

चक्रीवादळात 32 टक्के बागायत क्षेत्र बाधित

नारळ, सुपारीसह आंब्याच्या बागा भुईसपाट मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील 2503 हेक्टर बागायत क्षेत्रापैकी 794 हेक्टर म्हणजेच जवळजवळ 32 टक्के बागायत क्षेत्र जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळात भुईसपाट झाल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. नारळ, सुपारीसारखे हुकमी पीक डोळ्यांंदेखत अस्मानी संकटाने हिरावले असून उर्वरित नारळाच्या झाडांचे उत्पन्न मिळण्यासाठी अद्याप सहा माहिने वाट …

Read More »

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकार्यांना निवेदन

अलिबाग ः प्रतिनिधी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी (दि. 8) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अंतर्गत रायगड जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले. राज्यभर जिल्हा परिषद शिक्षकांनी हे निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. शासनाकडून मागण्या मान्य करण्यासाठी …

Read More »

पनवेल तालुक्यात 279 कोरोनाबाधित

नऊ रुग्णांचा मृत्यू; 264 जणांची कोरोनावर मात पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात मंगळवारी  (दि. 8) कोरोनाचे 279 नवीन रुग्ण आढळले असून, नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर 264 रुग्णांनी कोरोनावर मात केली. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 194 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून चार जणांचा मृत्यू झाला, तर 191 रुग्ण …

Read More »