पनवेल ः बातमीदार खारघर येथील मोबाइल शॉपमध्ये घरफोडीप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तिघेही सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याकडून 45 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरी केलेले मोबाइल परराज्यात मागणीनुसार पाठविले जाणार होते. खारघर येथे मोबाइल शॉप फोडल्याचा गुन्हा 30 ऑगस्टला घडला होता. गॅस कटरने शटर कापून दुकान …
Read More »Monthly Archives: September 2020
केगावात विजेचा लपंडाव सुरूच
नागरिक हैराण; महावितरणचे दुर्लक्ष उरण ः वार्ताहर उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायत हद्दीत मागील तीन महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू असून त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज महावितरण कंपनीचे अधिकारी मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळामध्ये वीज महावितरण कंपनीने मीटरचे रीडिंग न घेता सरासरी वीज बिले …
Read More »नवी मुंबईत डेंग्यूचा रुग्ण नसल्याचा दावा
मागील वर्षीच्या तुलनेत साथ आटोक्यात नवी मुंबई ः प्रतिनिधी दरवर्षी पावसाळा काळात साथीच्या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात, मात्र या वर्षी हे प्रमाण अत्यल्प दिसत आहे. नवी मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार जानेवारीपासून आतापर्यंत डेंग्यूचा एकही रुग्ण शहरात सापडला नाही, तर मलेरियाचे फक्त नऊ रुग्ण सापडले आहेत. पालिकेकडून कोरोना काळातही याबाबत …
Read More »माजी पोलीस आयुक्त संजय कुमार यांना कोरोना संसर्गाची लागण
पनवेल ः बातमीदार नुकतीच मुंबईत पोलीस मुख्यालयात प्रशिक्षण विभागात बदली झालेले नवी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय कुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या वाहनचालक व त्यांच्या समवेत राहणार्या अन्य एका कर्मचार्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांनीही तपासणी केली होती. यात संजय कुमार यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 3 …
Read More »जलभूषण पुरस्काराचा निर्णय रद्द करा; संघर्ष फाऊंडेशनचे कोकण आयुक्तांना निवेदन
खारघर ः बातमीदार शासनाने जलभूषण पुरस्कार प्रदान करण्यासंदर्भात जूनमध्ये घेतलेला शासन निर्णय तत्काळ रद्द करावा, अशा मागणीचे निवेदन नवी मुंबईतील संघर्ष फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाकडून सोमवारी (दि. 7) कोकण आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना देण्यात आले. शासनाने 12 जून 2020च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी जलक्रांतीचे जनक म्हणून …
Read More »ग्रामीण भागातही अँटिजेन टेस्ट
3000 किट प्राप्त पनवेल ः बातमीदार पनवेल महानगरपालिका हद्दीपाठोपाठ आता पनवेलच्या ग्रामीण भागातदेखील कोरोनाच्या अँटिजेन टेस्टला सुरुवात करण्यात आली आहे. 3 सप्टेंबरपासून पनवेलच्या ग्रामीण भागात अँटिजेन टेस्टला सुरुवात करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाला आळा बसावा यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. तालुक्यातील नेरे, अजिवली, आपटा, वावंजे, गव्हाण …
Read More »कर्जतमध्ये महिलांना धान्यवाटप
कर्जत : बातमीदार – कोरोना तसेच लॉकडाऊनमुळे आदिवासी, कामगार, घरकाम करणार्या महिला तसेच विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत महिलांचा रोजगार हिरावला असल्याने त्यांना कुटुंब चालवणे कठीण होऊन बसले आहे. या पार्श्वभूमीवर दिशा केंद्र संचलित व केंद्रीय समाज कल्याण बोर्ड दिल्ली यांच्या माध्यमातून चालवण्यात येणार्या ’सोबतीण’ कुटुंब सल्ला सहाय्य केंद्राच्या वतीने मदतीचा हात …
Read More »चक्रीवादळात नुकसान झालेल्या साई विद्यालयास आर्थिक मदत
माणगाव : प्रतिनिधी – माणगाव तालुक्यातील साई पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य ज्ञानदीप विद्यामंदिरचे 3 जूनच्या निसर्ग चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या शाळेला पूर्वपदावर आणण्यासाठी समाजसेवक कृष्णाजी महाडिक यांनी मुंबईतील सुमन रमेश तुलसी चरिटेबल ट्रस्टकडून एक लाख 65 हजार रुपये मिळवून दिले. या निधीतून विद्यालयाची दुरुस्ती करण्यात …
Read More »माथेरानमध्ये महावितरणवर धडक
कर्जत : बातमीदार – लॉकडाऊन सुरू झाल्यापासून माथेरानमध्ये महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार समोर आला आहे. मीटर बंद असूनही रिडींग दाखवून बिल देणे, बिल भरलेले असूनही मागील महिन्यांची शिल्लक बिलात अधिक येणे, तक्रारींचे निवारण न होणे, वीज बिल भरणा कर्मचारी उपस्थित नसणे यामुळे ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण …
Read More »सुसह्य उन्हाळ्यासाठी आतापासूनच जलनियोजन आवश्यक
पोलादपूर : प्रतिनिधी – पावसाचे हस्त नक्षत्र शिल्लक असताना पोलादपूर तालुक्याने यंदा सरासरीच्या 98.54 टक्के सरासरी गाठली. दरवर्षी समाधानकारक पाऊस पडत असताना उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते. ती दूर करण्यासाठी आतापासूनच व्यापक प्रयत्न सुरू करण्याची गरज आहे. पोलादपूर तालुक्याचे सर्वसाधारण पर्जन्यमान 3680 मिलीमीटर असून, दरवर्षीच्या सरासरीच्या 98.54 टक्के सरासरी गाठली आहे. यंदा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper