Breaking News

Monthly Archives: September 2020

जासई येथील पूरग्रस्तांना नुकसानभरपाई मिळणार; संघर्ष समितीच्या विविध मागण्यांना यश

उरण : प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे जासई गावातील 130 घरांच्या झालेल्या दैनिय अवस्थेची सविस्तर माहिती अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली. भविष्यात आमच्या गावाला पावसाच्या पाण्याचा कशा प्रकारे धोका निर्माण होऊ शकतो. हे संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी उरण तालुक्यातील छत्रपती शिवाजी हायस्कूल जासई येथे उपस्थित अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच 130 …

Read More »

रायगडात तब्बल 670 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 13 रुग्णांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात तब्बल 670 नव्या कोरोना रुग्णांची आणि 13 रुग्णांच्या मृत्यूची नोंद बुधवारी (दि. 2) झाली. एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळण्याचा जिल्ह्यातील हा आतापर्यंतचा नवा उच्चांक आहे. दुसरीकडे दिवसभरात 477 जण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 307, अलिबाग 91, रोहा 53, माणगाव 49, …

Read More »

मोदी सरकारचा चीनला पुन्हा दणका; पबजीसह 118 अ‍ॅप्सवर बंदी

नवी दिल्ली : मोदी सरकारने चीनला आणखी एक दणका दिला आहे. केंद्राने 118 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये पबजीचाही समावेश आहे. भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला तणाव पुन्हा एकदा वाढला असून, गलवान खोर्‍याप्रमाणे पँगाँग सरोवर परिसरातही चिनी सैन्यांकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केल्याने भारताने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. …

Read More »

पर्यटकांसाठी माथेरान अखेर खुले

कर्जत : बातमीदारसाडेपाच महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अखेर 2 सप्टेंबरपासून माथेरान पर्यटनस्थळ सर्व पर्यटकांसाठी खुले झाले  आहे. राज्य शासनाच्या मिशन बिगीन अगेनच्या नव्या परिपत्रकानुसार रायगड जिल्हाधिकार्‍यांनी हे आदेश दिले आहेत. त्यामुळे माथेरानमध्ये आनंदाचे वातावरण आहे.रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव माथेरानमध्ये वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून माथेरान हे 17 …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या निधीतून विविध विकासकामांना मंजुरी

उरण : वार्ताहरउरणचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून मतदारसंघातील विविध विकासकामांना प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे, परंतु कोरोना प्रादुभार्वामुळे राज्य शासनाकडून विकासात्मक कामे स्थगित असल्याने उरण विधानसभा मतदारसंघातील कामेही रखडली आहेत. दरम्यान, शासनाने नव्या कामांना स्थगिती दिली असली तरी आधी मंजूर झालेल्या कामांना गती द्यावी, अशी आमदार महेश बालदी …

Read More »

खारघरमध्ये गोरगरीबांना अन्नधान्य वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. अशा गोरगरीबांसाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खारघरचा राजा गणेशोत्सव मंडळ तसेच विविध समाजांचे अन्नदाते यांच्या माध्यमातून अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. त्या अंतर्गत भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते खारघरमधील गरीब, गरजू जनतेला मंगळवारी (दि. …

Read More »

पाली-भूतिवली धरणातील पाणी स्थानिकांना मिळावे

माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची मागणी कर्जत : बातमीदारधरण बांधून पूर्ण आहे, पण धरणाचे पाणी शेतीला सोडण्यासाठी कालवे नाहीत अशी स्थिती कर्जत तालुक्यातील पाली-भूतिवली धरणाची आहे. या धरणातील पाणी आजूबाजूची गावे व वाड्यांना मिळावे यासाठी भारतीय जनता पक्ष आग्रही आहे. धरणाच्या कालव्यांची कामे बिल्डर लॉबीला फायदा व्हावा यासाठी अडवून ठेवणार्‍या …

Read More »

राज्यात कोरोनाचा कहर

देशातील प्रत्येक चौथा रुग्ण महाराष्ट्रातील मुंबई : प्रतिनिधीदेशातील एकूण रुग्णांपैकी एक चतुर्थांश रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. म्हणजेच देशात आढळून आलेल्या चार रुग्णांपैकी एक महाराष्ट्रातील आहे. काळजी वाढवणारी गोष्ट देशात आतापर्यंत 66 हजार रुग्णांचा मृत्यू झाला असून, यातील 25 हजारांच्या जवळपास रुग्ण महाराष्ट्रातील आहेत.देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. देशात बुधवारी …

Read More »

पशूंसाठी रोग नियंत्रण लसीकरण मोहिमेस सुरुवात

पाली ः प्रतिनिधी केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लाळ्या खुरकूत रोग नियंत्रणाकरिता लसीकरण मोहिमेस मंगळवारपासून (दि. 1) सुधागड तालुक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीत पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक जांभूळपाडा कार्यक्षेत्रातील टिपूदेवी देवीचंदजी संघवी गोशाळा येथे एकूण 165 जनावरांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणापूर्वी सर्व जनावरांच्या कानात 12 आकडी बिल्ले टोचण्यात …

Read More »

अपघातात क्लिनरचा जागीच मृत्यू

खोपोली ः प्रतिनिधी खंडाळा घाटात मुंबई-पुणे जुना महामार्ग व एक्स्प्रेस वे जुळतात त्याअगोदर असलेल्या अंडा पॉइंट येथे बुधवारी (दि. 2) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात गाडीतील क्लिनरचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत खोपोली पोलिसांत नोंद झाली असून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बाजूकडून मुंबईकडे जात असलेला कंटेनर अंडा …

Read More »