कर्जत तालुक्यातील घटना, शेतकर्याची न्यायालयात धाव कर्जत : बातमीदार तालुक्यातील गावंडवाडी येथील शेतकर्याने धारा भरताना सातबारा पहिला असता स्वतःची जमीन दुसर्याच्या नावावर झाल्याची बाब उघडकीस आली. त्यामुळे या शेतकर्याने थेट न्यायालयात धाव घेतली असून, कर्जत न्यायालयाने या घटनेचा तपास करण्याचे आदेश नेरळ पोलिसांना दिले आहेत. मुंबईच्या जवळ असल्याने कर्जत तालुक्यातील …
Read More »Monthly Archives: April 2021
वीकेण्ड लॉकडाऊननंतर माणगाव बाजारपेठेत नागरिकांची गर्दी
माणगाव : प्रतिनिधी कोविडच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या शनिवार व रविवार या दोन दिवसांच्या दुसर्या वीकेण्ड लॉकडाऊननंतर सोमवारी (दि. 19) सकाळपासूनच माणगाव बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी लगबग सुरू झाली. वीकेण्ड लॉकडाऊननमुळे माणगाव बाजारपेठेत दोन दिवस शुकशुकाट होता. नेहमी गजबजलेली माणगावची बाजारपेठ सुनी सुनी वाटत होती. सोमवारी सकाळी आपल्याला लागणार्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी …
Read More »‘आरसीबी’च्या विजयाची हॅट्ट्रिक चेन्नई ः आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रविवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट राइडर्सला पराभूत करीत स्पर्धेतील सलग तिसरा विजय नोंदविला. ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या झंझावाती अर्धशतकी खेळीमुळे बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 205 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याचे फलंदाज झटपट बाद झाले आणि …
Read More »विदेशी मद्यासह महिलेला अटक; पनवेल रेल्वेस्थानकात कारवाई
पनवेल ः प्रतिनिधी कोरोना निर्बंधांच्या काळात गोव्याहून विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणार्या महिलेला रेल्वे सुरक्षा बलाच्या क्राईम ब्रांचने पनवेल स्थानकात रविवारी (दि. 18) पहाटे पकडले. या महिलेकडून 40 हजारांचे विदेशी मद्य जप्त करण्यात आले असून, तिला राज्य उत्पादन शुल्क अधिकार्यांकडे पुढील कारवाईसाठी सुपूर्द करण्यात आले. 01134 मंगळुरू एक्स्प्रेस रविवारी पहाटे …
Read More »देशात कोरोनाचा हाहाकार!; दीड हजार मृत्यू; 2,61,500 नवे रुग्ण
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था महाराष्ट्रासह देशभरात कोरोना संक्रमणाचा प्रसार वेगाने होत असून, परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. अशातच देशात नव्या विश्वविक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. भयावह बाब म्हणजे वाढणार्या रुग्णसंख्येबरोबरच देशातील मृत्यूंची संख्याही झपाट्याने वाढली आहे. पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट घातक ठरताना दिसत आहे. युके, दक्षिण, ब्राझील या …
Read More »एक्स्प्रेस वेवर गुंडांचा थरार; पोलिसांशी हुज्जत घालून हत्यारे असलेली कार सोडून त्रिकूट फरार
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून हत्यारांनी भरलेली कार घेऊन त्रिकुटाने पोलिसांशी हुज्जत घालत पलायन केल्याची घटना घडली आहे. खालापूर पोलीस या तिघांचा कसून शोध घेत आहेत. एका स्विफ्ट कारमधून काही इसम धारदार हत्यारे घेऊन शनिवारी (दि. 17) रात्री एक्स्प्रेस वेवरून पुण्याच्या दिशेने जात होते. कोरोना परिस्थितीमुळे खालापूर टोलनाक्याजवळ …
Read More »केंद्राकडे बोट दाखवून राज्य सरकार स्वतःचे अपयश लपवू शकत नाही; रामदास आठवलेंचा टोला
मुंबई ः प्रतिनिधी रेमडेसीवीरसह सर्व औषधे महाराष्ट्राला मिळतील. औषधे पुरवू नका असे कोणतेही सरकार आदेश देऊ शकत नाही. राज्य सरकार केंद्रावर खोटे आणि खोडसाळ आरोप करीत आहे. महाविकास आघाडी सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपवू शकत नाही, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. कोरोनाचा …
Read More »‘देशात लॉकडाऊनचा निर्णय घाईगडबडीत घेतला जाणार नाही’
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशात महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये कोरोनाच्या दुसर्या लाटेने थैमान घातले आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याची चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या मुद्द्यावर भूमिका मांडली. देशात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घाईगडबडीत घेतला जाणार नाही. सध्या तरी तशी परिस्थिती दिसत नाही, असे …
Read More »‘ब्रुक फार्मा’च्या अधिकार्यावर पोलिसांची दंडेलशाही; भाजपने धरले राज्य सरकारला धारेवर
मुंबई ः प्रतिनिधी रेमडेसिवीर इंजेक्शनसंदर्भात विलेपार्ले पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या एका अधिकार्याला ताब्यात घेतले. या कारवाईची माहिती मिळताच विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार प्रसाद लाड पोलीस ठाण्यात पोहचले आणि त्यांनी पोलिसांनी कारवाईबद्दल जाब विचारला. पोलीस ठाण्यात वाद झाल्यानंतर तेथील अधिकारी आणि …
Read More »रोह्यात 44 रुग्णांची वाढ
रोहे ः प्रतिनिधी तालुक्यात कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी (दि. 17) एका दिवसात 44 नवे कोरोना रुग्ण आढळल्याने रोह्यात खळबळ उडाली आहे. ही वाढती आकडेवारी तालुक्याची चिंता वाढवणारी ठरली आहे. रोहा तालुक्यात 11 ते 17 एप्रीलपर्यंत एकूण 242 कोरोना रुग्ण आढळलेे असून, या कालावधीत 88 रुग्णांनी कोरोनावर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper