1 जूनपर्यंत निर्बंध कायम; नवीन नियमावली जाहीर मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ब्रेक द चेन अंतर्गत असलेले निर्बंध 1 जूनपर्यंत वाढविण्यात आले आहेत. राज्य सरकारने यासंदर्भातील नियमावलीही जारी केली आहे. परराज्यातून महाराष्ट्रात येणार्या प्रवाशांसाठी आरटी पीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. बुधवारी …
Read More »Monthly Archives: May 2021
आयपीएलसाठी मोहम्मद आमीर सोडणार पाकचे नागरिकत्व?
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पाकिस्तानचा माजी गोलंदाज मोहम्मद आमीर याने गतवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. 29 वर्षीय आमीर सध्या कुटुंबीयांसोबत लंडनमध्ये राहत आहे. तेथील नागरिकत्व स्वीकारून तो आयपीएलमध्ये खेळण्याचे स्वप्न पाहत आहे. मोहम्मद आमीरने निवृत्ती जाहीर करताना पाकिस्तान क्रिकेट संघ व्यवस्थापनावर गंभीर आरोपही केले. त्यामुळेच या …
Read More »अजुन थोडी कळ सोसा
लॉकडाऊनआधी महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सात लाखांपर्यंत पोहचली होती. लॉकडाऊननंतर मात्र ती चार लाख 75 हजारांपर्यंत खाली आली. देशाचा रुग्णवाढीचा दर 1.4 इतका आहे, तर राज्यात तो 0.8 पर्यंत खाली आला आहे. याचा अर्थ लॉकडाऊनसदृश कठोर निर्बंधांचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत, म्हणूनच राज्यातील कठोर निर्बंधांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. …
Read More »हार्दिक पांड्याचे स्थान डळमळीत
अष्टपैलू खेळाडूसाठी शार्दूल ठाकूरचा पर्याय मुंबई ः प्रतिनिधी भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला मोठा धक्का बसला आहे. कारण हार्दिकच्या जागी आता संघाला शार्दूल ठाकूरच्या रूपाने एक चांगला अष्टपैलू खेळाडू सापडल्याचे आता प्रशिक्षकांनीच सांगितले आहे. त्यामुळे आता लवकरच हार्दिक पांड्याचा संघातील पत्ता कट होऊ शकतो असे दिसत आहे. हार्दिक अष्टपैलू खेळाडू …
Read More »आयपीएलला मोठा धक्का
इंग्लंडपाठोपाठ न्यूझीलंड खेळाडूंचीही स्पर्धेकडे पाठ मुंबई ः प्रतिनिधी आयपीएलला आता अजून एक मोठा धक्का बसला आहे. कारण यापूर्वी इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने आमचे खेळाडू आयपीएल खेळू शकत नाहीत, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता न्यूझीलंडचे खेळाडूही आयपीएलचे सामने खेळू शकणार नसल्याचे समोर आले आहे. आयपीएलचे आतापर्यंत 29 सामने झाले आहेत. आयपीएलचे …
Read More »‘डब्ल्यूटीसी’च्या फायनलसाठी जडेजाचा कसून सराव
मुंबई ः प्रतिनिधी टीम इंडियाला इंग्लंडमध्ये सहा कसोटी सामने खेळायचे आहेत. त्याची सुरुवात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याने होणार आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या सामन्यांसाठी भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने कंबर कसली आहे. दौर्याला एक महिन्याचा वेळ असला तरी त्याने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. …
Read More »आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडियाचा दबदबा
सलग पाचव्या वर्षी अव्वल स्थान कायम मुंबई ः प्रतिनिधी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सलग पाचव्या वर्षी आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत आपला दबदबा कायम राखलाय. आयसीसीने गुरुवारी (दि. 13) जाहीर केलेल्या वार्षिक कसोटी क्रमवारीत टीम इंडियाने 121 गुणांसह अव्वल स्थान कायम राखले, तर 120 गुणांसह न्यूझीलंडही अव्वल स्थानावर विराजमान आहे. भारतीय …
Read More »मुस्लिम बांधवाने केले हिंदु बांधवाचे अंतिम संस्कार
ऐक्याचे अनोखे प्रतिक पनवेल : वार्ताहर एक मुस्लीम बांधव हिंदू बांधवाच्या मदतीला धावून जात अंतिम संस्कार हिंदू पद्धतीने करून एक अनोखे ऐक्याचे प्रतिक पनवेलकरांसाठी त्याने दाखवून दिले आहे. पनवेल येथे राहणारे व खारघर येथे व्यवसाय करणारे सैय्यद खान लकी (रा. तवा हॉटेल, हिरानंदानी, खारघर) यांना व खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ …
Read More »‘क्रांतिज्योत’तर्फे परिचारिकांचा सन्मान
पनवेल : वार्ताहर पनवेलमधील नेहमीच महिलांसाठी कार्यरत असणारी एकमेव संस्था ती म्हणजे क्रांतिज्योत महिला विकास फाऊंडेशन होय. महिलांना न्याय आणि सन्मान मिळवून देणारी ही संस्था आहे. संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष रुपाली शिंदे यांनी जागतिक परिचारिका दिनानिमित्त फाऊंडेशनतर्फे परिचारिकांना सन्मानित केले. कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीमध्ये परिचारिका आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. …
Read More »नगरसेविका सीता पाटील यांच्याकडून खांदा कॉलनी मास्क व धान्यवाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त वाढत्या कोरोनामुळे राज्यात कडक निर्बंध लागू आहेत. त्यामूळे सर्व सामान्य लोकांचे नागरिकांचे हाल होत आहेत. ह्या परिस्थितीत खांदा कॉलनी परिसरातील प्रभाग 15 मधील भाजप ओबीसी महिला मोर्चा उत्तर रायगड अध्यक्ष तथा नगरसेविका सीता पाटील यांनी प्रभाग 15 मधील रहिवाशांना मास्कचे वाटप केले. या वेळी प्रभागातील गरीब …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper