Breaking News

Monthly Archives: May 2021

‘मविआ’ला मराठा आरक्षण द्यायचेच नव्हते; भाजप नेते खासदार नारायण राणेंचे टीकास्त्र

मुंबई ः प्रतिनिधी मराठा आरक्षणबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची या संदर्भात भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 12) भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. या सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते, असा …

Read More »

वडाळे तलावाच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

पनवेल : महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या शहरातील वडाळे तलावाच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कामाची अधिकार्‍यांसह बुधवारी पाहणी करून त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, नगरसेविका …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या निधीतून कोरोना रुग्णांच्या वैद्यकीय यंत्रसामुग्रीसाठी 50 लाख

पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीच्या लढाईत नागरिकांना मदत करणारे उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी त्यांच्या स्थानिक आमदार कार्यक्रम निधीतून चौक ग्रामीण रुग्णालयाला कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारार्थ वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य पुरवठा करण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे.सन 2021-2022 या आर्थिक वर्षाकरिता स्थानिक आमदार विकास कार्यक्रमांतर्गत आमदार …

Read More »

सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना फ्रंटलाइन वर्कर्स घोषित करा

देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाइन वर्कर्स घोषित करून लसीकरणात प्राधान्य द्यावे, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.देशातील सुमारे 12 राज्यांत पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून जाहीर करण्यात आले …

Read More »

राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण तूर्त स्थगित

राज्य सरकारचा निर्णय मुंबई ः प्रतिनिधीराज्यात लसींचा तुटवडा जाणवत असल्याने 18 ते 44 वयोगटासाठीच्या लसीकरणाला तुर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती बुधवारी (दि. 12) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या वयोगटासाठी उपलब्ध असलेल्या लसी आता 45 वयापेक्षा जास्त वयोगटाच्या नागरिकांना देण्यात येणार आहेत, …

Read More »

कोरोना : हायकोर्टाने काढले राज्य सरकारचे वाभाडे

मुंबई ः राज्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती तसेच रुग्णालयांतील बेड, इंजेक्शन व ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 12) मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान राज्य सरकारला धारेवर धरले. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ‘स्वत:च स्वत:च्या कौतुकाची टिमकी वाजवत त्यातच मश्गूल असणार्‍या राज्य सरकारचे वाभाडे आज न्यायालयाने काढले. …

Read More »

कोरोना रुग्णांसाठी ‘दिशा’दूत; नातेवाइकांना हॉस्पिटलमधील बेड्सबाबत माहिती देण्याचा उपक्रम

पनवेल : वार्ताहर कोरोनाच्या दुसर्‍याला लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे बेड उपलब्ध होणे दुरापास्त झाले आहे. ऑक्सिजन अतिदक्षता विभाग, त्याचबरोबर व्हेंटिलेटर याच्या शोधार्थ नातेवाइकांना वणवण करावी लागते. त्यांची गैरसोय दूर व्हावी म्हणून त्यांना बेडबाबत माहिती उपलब्ध व्हावी, तसेच रुग्णालयाचे संपर्क क्रमांक मिळावेत या उद्देशाने कामोठे येथील दिशा मंचच्या …

Read More »

खारघरच्या सरस्वती कॉलेजमध्ये लसीकरणास मान्यता

पनवेल : प्रतिनिधी शासनाने नवीन निश्चित केलेल्या धोरणानुसार 1 मे 2021 पासून खासगी लसीकरण केंद्रांना स्वतः उत्पादकाकडून लस खरेदी करून कोविन पोर्टलचा वापर करून लसीकरण कार्यक्रम राबविण्यास मान्यता दिली आहे. पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात अपोलो रुग्णालयाला सरस्वती कॉलेज खारघर येथे खासगी लसीकरण केंद्र (पीसीव्हीसी) सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. पनवेल …

Read More »

भाजपकडून कर्नाळा परिसरात मास्क, सॅनिटायझरचे वाटप

पनवेल : वार्ताहर कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाळा विभाग भाजपकडून परिसरात मोफत सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात तसेच लसीकरण केंद्रापर्यंत नागरिकांना मोफत प्रवास सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोनाने आता शहरी भागासहीत ग्रामीण भागातदेखील प्रादुर्भाव वाढवला आहे. ग्रामीण भागात नागरिकांपर्यंत कोरोनासंदर्भात जनजागृती …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते होणार रिक्षाचालकांना मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेलमधील अत्यंत गरजू अशा 10 महिला व 10 पुरुष रिक्षाचालकांना आर्थिक मदत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 13) देण्यात येणार आहे. राज्यात निर्बंधांच्या काळात …

Read More »