Breaking News

Yearly Archives: 2021

राजभवनात लहान मुलांसाठी रंगला कट्टी बट्टी कार्यक्रम

गंधार गौरव पुरस्कारांचेही वितरण मुंबई : प्रतिनिधी बालदिनाचे औचित्य साधून बालरंगभूमीसाठी कार्य करणार्‍या गंधार कला संस्थेतर्फे लहान मुलांच्या कट्टी बट्टी या कार्यक्रमाचे तसेच गंधार गौरव पुरस्कार सोहळ्याचे राजभवन येथे रविवारी (दि. 14) आयोजन करण्यात आले होते. या वेळी बालरंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अभिनेते अतुल परचुरे यांना यावेळी राज्यपालांच्या हस्ते गंधार गौरव …

Read More »

जनजाती सुरक्षा मंचतर्फे बाईक रॅली

पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय जनजाती गौरव दिन आणि महान जनजातीय स्वतंत्र सेनानी तथा सनातन संस्कृती रक्षक भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस सोमवारी (दि. 15) पनवेलमध्ये साजरा झाला. त्यानिमित्त जनजाती सुरक्षा मंचाच्या वतीने गाढेश्वर येथे बाईक रॅली आयोजीत करण्यात आली होती. रॅलीनंतर गावामध्ये आयोजीत केलेल्या सभेत रायगड जिल्हा जनजाती सुरक्षा …

Read More »

सिडकोच्या विशेष गृहनिर्माण योजनेतील घरांची संगणकीय सोडत

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळाच्या कोविड योध्दे आणि गणवेषधारी कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजनेतील उपलब्ध घरांसाठी सोमवारी (दि. 14) संगणकीय सोडत झाली. ज्या अर्जदारांना सोडतीमध्ये घर प्राप्त झाले नाही, परंतु योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ज्या अर्जदारांनी अनामत रक्कम भरली होती अशा सर्व अर्जदारांना सोडत प्रक्रियेद्वारे सदनिका अदा करण्यात आल्या आहेत. …

Read More »

अल्पवयीन मुलगी तब्बल 400 जणांकडून बनली वासनेची शिकार

बीड ः प्रतिनिधी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातून लैंगिक अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या सहा महिन्यांत एका 16 वर्षांच्या मुलीवर तब्बल 400 लोकांनी बलात्कार केल्याचा आरोप या पीडितेने केला आहे. विशेष म्हणजे यात एका पोलिसाचाही समावेश असून पीडिता आता दोन महिन्यांची गर्भवती आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या आईचा काही …

Read More »

स्थानिकांच्या रोजगारासाठी खालापूर भाजप आक्रमक

पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील एक्सप्रेस ग्रॅन्ड क्यूब या आस्थापनेत निर्माण झालेल्या कामांमध्ये स्थानिक ठेकेदारांना काम देण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड कोषाध्यक्ष सनी यादव यांनी एका निवेदनाद्वारे आस्थापना अधिकार्‍यांकडे केली आहे. एक्सप्रेस ग्रॅन्ड क्यूब आस्थापना स्थानिकांबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. यासाठी आम्ही अनेक वेळा …

Read More »

राज्यस्तरीय गणेशमूर्ती स्पर्धेत पेणच्या मृगज कुंभार यांची मूर्ती ठरली सरस

पेण : प्रतिनिधी येथील श्री गणेश मित्र मंडळ आणि गणपती कारखानदार यांच्या संयुक्त विद्यमाने पेणमध्ये राज्यस्तरीय गणेशमूर्तींचे प्रदर्शन आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पेण तालुक्यातील मूर्तिकार मृगज कुंभार या मूर्तिकाराने प्रथम क्रमांक पटकावला. तर नितीन पेडणेकर (पेण) याने द्वितीय आणि आकाश लिहे (ठाणे) यांनी तृतीय क्रमांक पटकविला. …

Read More »

डोलकाठीचा गरूडध्वज ढाक डोंगरावरून आणला; कर्जत देऊळवाडीची यात्रा यंदाही रद्द, भैरीनाथाचे दर्शन मिळणार

कर्जत : प्रतिनिधी देऊळवाडी किरवली येथील कार्तिक पौर्णिमेच्या उत्सवासाठी परंपरेनुसार डोलकाठीच्या टोकाला बांधण्यासाठी ढाक डोंगरावरील भैरी मंदिरातून गरुडध्वज आणला, मात्र यंदाही कोरोनाच्या संकटामुळे कार्तिक पौर्णिमेची यात्रा रद्द करण्यात आली असून, भाविकांना सर्व शासकीय नियम पाळून दर्शन घेता येणार आहे. सकाळी गरुडध्वजाची पूजा ज्येष्ठ वारकरी नारायण बडेकर यांच्या हस्ते मंदिरात करण्यात …

Read More »

शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या राज्याध्यक्षपदी राजेश सुर्वेंची फेरनिवड; नाशिकच्या अधिवेशनात नवीन कार्यकारिणी जाहीर

अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग या शिक्षक संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष राजेश सुर्वे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. नाशिक येथे झालेल्या अधिवेशनात नवीन कार्यकारिणी जाहीर झाली.  सन 2018मध्ये या संघटनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्या वेळी राजेश सुर्वे यांच्या खांद्यावर संघटनेची धुरा सोपवण्यात आली होती. तीन …

Read More »

मुरूड तहसील कार्यालयासमोर बाणकोटकर यांचे उपोषण सुरू

मुरूड : प्रतिनिधी एफआरआयमध्ये असलेल्या सर्व आरोपींची नावे न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रात समाविष्ट करावीत, या मागणीसाठी राजपुरी कोळीवाड्यातील हरिदास बाणकोटकर यांनी सोमवार (दि. 15)पासून मुरूड तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. हरिदास बाणकोटकर यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी राजपुरी कोळीवाड्यातील काही ग्रामस्थांनी हल्ला करून अंगणातील वस्तू समुद्रात फेकून दिल्या होत्या, …

Read More »

नागोठण्यातील ‘रिलायन्स’विरोधातील प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन चिघळले; पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड

पाली : प्रतिनिधी येथील रिलायन्स कंपनीविरोधात स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांनी कडसुरे येथे सोमवारी (दि. 15)जनआंदोलन छेडण्यात आले. सायंकाळपर्यंत तोडगा न निघाल्याने आंदोलन चिघळले. या वेळी पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड करण्यात आली. स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्त यांना कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करावे, या प्रमुख मागणीसाठी शिहू नागोठणे विभागातील स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्तांनी सोमवारी …

Read More »