Breaking News

Yearly Archives: 2022

सोन्याच्या बांगड्या चोरणार्या महिला गजाआड

पनवेल ः वार्ताहर नवी मुंबईमधील वाशीयेथील तनिष्क ज्वेलर्समध्ये ग्राहक बनून दोन लाखांच्या सोन्याच्या बांगड्या चोरणार्‍या दोन महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. 10 दिवसांपूर्वी तनिष्क ज्वेलर्समध्ये 2 महिला दागिने खरेदी करण्याच्या उद्देशाने गेल्या. प्रथम त्यांनी सेल्सगर्लला बांगड्या दाखवण्यास सांगितले. त्यानंतर ब्रेसलेटची डिझाईन त्यांना दाखवण्यात आली. या दरम्यान …

Read More »

पनवेल शहर पोलीस ठाण्यात महिलाराज

 महिला दिनी सांभाळली पोलीस ठाण्याची धुरा पनवेल ः वार्ताहर पोलीस दलात महिलांचे प्रमाण जेमतेम असले तरी मंगळवारचा दिवस त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला. 8 मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधत पनवेल शहर पोलीस ठाण्याची धुरा महिलांनी सांभाळून प्रत्यक्ष कामकाजात भाग घेऊन सगळी कामे केली. अतिशय सक्षमपणे महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी दिवसभर …

Read More »

पिंच्याक सिल्याट स्पर्धेत अनुज सरनाईकला ‘सुवर्ण’

पाली ः प्रतिनिधी दिव-दमण येथे नुकत्याच झालेल्या तिसर्‍या वेस्ट झोन पिंच्याक सिल्याट चॅम्पियनशिप स्पर्धेत पालीतील अनुज सरनाईक यांनी 85 ते 90 वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले. अंतिम सामन्यात राजस्थानच्या खेळाडूला हरवून अनुज सरनाईकने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. या यशामुळे खूप आनंद होत आहे, असे अनुजने सांगितले. अनुजला भारतीय पिंच्याक सिल्याट …

Read More »

दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत रायगड संघ अव्वल

धाटाव ः प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे झालेल्या लेदर बॉल दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत स्थानिक रत्नागिरी संघावर मात करीत रायगड संघाने अव्वलस्थान पटकावले. या स्पर्धेत रायगड, रत्नागिरी अ आणि ब, कोल्हापूर, अहमदनगर व सोलापूर अशा एकूण सहा संघांनी सहभाग घेतला होता. रायगड जिल्ह्याचा दिव्यांग क्रिकेट संघ हा साईनाथ पवार यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

अमृता भगत ठरली पॉवर वूमन; राज्य पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत विजेती

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील शेलू गावची रहिवासी आणि नेरळ येथील मातोश्री सुमती चिंतामणी टिपणीस महाविद्यालयाची विद्यार्थिनी अमृता ज्ञानेश्वर भगत ही महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पॉवर वूमन ठरली. मुंबईच्या कामगार क्रीडा मैदानावर आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत अमृताने क्लासिक क्रीडा प्रकारात ज्युनियर आणि सिनियर या दोन्ही गटांत बाजी मारली आणि तिने …

Read More »

महिला दिन विशेष

-ठमाताई अनंता पवार कर्जत तालुक्यातील जांभिवली येथे वनवासी आश्रम सुरू झाला, तेंव्हा तेथील आदिवासी मुलांना भाकरी करून देण्यासाठी ठमाताई अनंता पवार (वय 60, मु. गौरकामत, ता. कर्जत) जात असत. त्यावेळी त्यांना आपल्या आदिवासी समाजाच्या दुर्दशेची स्थिती समजली. आदिवासी पुरुषांबरोबर महिलासुद्धा व्यसनाधीन होत्या. पुरुषांच्या बरोबरीने महिला काम आणि मद्यपान करीत असत. …

Read More »

महिला दिन विशेष

– कल्पना हिलाल विधवा आई आणि धाकटी बहिण असलेले आपले कुटुंब चालविण्यासाठी नेरळच्या मोहाचीवाडीमध्ये राहणार्‍या कल्पना पांडुरंग हिलाल यांनी आपले आयुष्य वेचले आणि स्वतःच्या महत्वाकांक्षा, स्वतःचा आनंद यांना बाजूला ठेवत 20 वर्षे सिलेंडर प्रसंगी डोक्यावर वाहून नेले वडील पांडुरंग हिलाल यांचे 2002 मध्ये आकस्मिक निधन झाले, त्यावेळी कल्पना 20 वर्षाच्या …

Read More »

महाडमध्ये ट्रकसह पाच लाखांचा खैरसाठा पकडला

महाड : महाड वन विभागाने गुजराकडून गोव्याच्या दिशेने जाणार्‍या विना परवाना एका ट्रकवर महाड तालुक्यातील राजेवाडी फाट्याजवळ कारवाई करून ट्रकसह पाच लाखांचा खैरसाठा जप्त केला. या प्रकरणी ट्रकचालक मालक याला ताब्यात घेतले असून ट्रक आणि त्यातील खैराची लाकडे जप्त केली आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर राजेवाडी फाट्याजवळ महाड वनविभागाने रविवारी (दि. 6) …

Read More »

केदार भगत मित्र परिवाराकडून हळदीकुंकू आणि महिलांचा सन्मान

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलच्या जडणघडणीत महिलांचे योगदान महत्त्वाचे असून त्यांचा आदर्श घेऊन महिलांनी कार्यरत राहावे, असे आवाहन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे केले. केदार भगत मित्र परिवाराच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित हळदीकुंकू आणि 21 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान तसेच चला खेळूया पैठणी कार्यक्रम आयोजित …

Read More »

“पेण खारेपाटात अशुद्ध, गढूळ पाणीपुरवठा”

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा तारांकित प्रश्न मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त पेण तालुक्यातील खारेपाट भागात शहापाडा धरणातून अशुद्ध व गढूळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला आणि या प्रश्नावर राज्य शासनाचे लक्ष …

Read More »