Breaking News

Yearly Archives: 2022

संदीप नाईक यांचे ठिय्या आंदोलन

उन्नत मार्गिका कामात ढिसाळपणाचा केल्याचा निषेध नवी मुंबई ः बातमीदार ऐरोली- काटई मार्गावर नवी मुंबईकरांसाठी मुंबईच्या दिशेने आणि काटईच्या दिशेने मार्गिका बांधण्याच्या कामांमध्ये एमएमआरडीए करीत असलेल्या चाल-ढकलीचा निषेध करण्यासाठी बुधवारी (दि. 2 मार्च) ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. …

Read More »

विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घ्यावी -अरुणशेठ भगत

गव्हाण विद्यालयात एचएससी विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा पनवेल ः रामप्रहर वृत्त विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून आयुष्यात उत्तुंग भरारी घ्यावी, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी व समन्वय समिती सदस्य अरुणशेठ भगत यांनी केले. येथील रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत …

Read More »

दागिने खेचून पळणारा सराईत गुन्हेगार गजाआड

पनवेल ः वार्ताहर पनवेल शहर परिसरात तसेच खांदा वसाहत परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून पळणार्‍या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीने चार गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्याच्या अटकेनंतर आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पनवेल शहर परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे …

Read More »

रस्ते अपघातांत पुन्हा वाढ

जेएनपीटी महामार्गावर सर्वाधिक दुचाकी अपघात पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई, पनवेल, उरण या विकासात्मक विभागात निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुन्हा दुचाकी अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये सर्वाधिक अपघात हे जेएनपीटी महामार्गावर होत असल्याचे वाहतूक पोलिसांच्या अहवालातून समोर आले आहे. उरणच्या जेएनपीटी बंदराकडे जाणारे रस्ते चकाचक झाल्याने या भागात …

Read More »

आघाडीची अग्निपरीक्षा

मागील दाराने राज्यात सत्तेवर आल्यापासून महाविकास आघाडी सरकारने आजवर विधिमंडळाचे एकही अधिवेशन धडपणाने होऊ दिलेले नाही. दरखेपेला कोरोना महामारीचे कारण पुढे करीत कमीत कमी दिवसांत अधिवेशन गुंडाळण्याचा पळपुटेपणाच सत्ताधारी करीत आले आहेत. गुरूवारपासून सुरू होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मात्र सत्ताधार्‍यांना कोरोनाच्या नावाखाली पळ काढता येणार नाही. त्यामुळेच या अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध …

Read More »

पनवेलमध्ये धान्य महोत्सव; 4 ते 6 मार्चपर्यंत तांदूळ थेट शेतकर्‍यांकडून उपलब्ध

पनवेल ः रामप्रहर वृृत्त महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) रायगड व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण, यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा तांदूळ व धान्य महोत्सवाचे आयोजन 4 ते 6 मार्च दरम्यान शहरातील गुजराथी शाळा, डॉ. आंबेडकर रोड येथे करण्यात आले आहे. या महोत्सवात महाराष्ट्र शासन …

Read More »

विविध कार्यक्रमांची मेजवानी

पनवेल : रामप्रहर वृत्त केदार भगत मित्रपरिवार या संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील 21 महिलांचा सत्कार, हळदी-कुंकू समारंभ आणि चला जिंकूया पैठणी या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (दि. 6 मार्च) करण्यात आले आहे. व्हि. के. हायस्कूलच्या मागील मैदानावर होणार्‍या या समारंभास पनवेलमधील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित …

Read More »

रायगडातील चार विद्यार्थी परतले

अलिबाग, खोपोली : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेल्यापैकी रायगड जिल्ह्यातील आर्यन राजेंद्र पाटील (पेण), पूर्वा पराग पाटील (अलिबाग), सलवा मोहम्मद सलीम धनसे (खोपोली), प्रचिती दीपक पवार (पनवेल) हे चार विद्यार्थी सुखरूप घरी पोहचले. रायगड जिल्ह्यातील 32 विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेले आहेत. रशियाने युक्रेनवर  केलेल्या आक्रमणामुळे निर्माण झालेल्या युध्द …

Read More »

‘मी घरी आले माझे मित्रही लवकर घरी यावेत’

पनवेल : नितिन देशमुख   रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकेले आहेत. भारत सरकार या सर्व विद्यार्थ्यांना सुखरूपणे मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. रायगड जिल्ह्यातील काही विद्यार्थी युक्रेनमध्ये अजुनही युद्धाच्या ठिणग्या सोसत आहेत, तर काही सुखरुपपणे परतले आहेत. असाच युक्रेन ते भारत या प्रवासातील थरारक अनुभव …

Read More »

उलवे नोडमध्ये हनुमान मंदिर बांधकामाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे नोड सेक्टर 17 येथे हनुमान मंदिर बांधकामाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि.2) करण्यात आले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील सोसायटींचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, हनुमान मंदिराच्या बांधकामासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी …

Read More »