नागोठणे : प्रतिनिधी येथील अग्रवाल विद्यामंदिर परीक्षा केंद्रावर शुक्रवारपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या दीर्घ कालावधीनंतर प्रथमच ऑफलाइन परीक्षा होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर कभी ख़ुशी कभी गम पाहायला मिळत आहे. या परीक्षा केंद्रावर विविध शाखेचे एकूण 519 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. विद्यार्थ्यांना लिखाणाचा तणाव येऊ नये, यासाठी वेळ अर्ध्या …
Read More »Yearly Archives: 2022
बारावीची बोर्ड परीक्षा सुरू
कर्जत तालुक्यातील 14 केंद्रांवर 2460 विद्यार्थी कर्जत : बातमीदार शुक्रवारपासून सुरु झालेल्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्धा तास जास्त मिळणार आहे. कर्जत तालुक्यात 2460 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले असून तीन मुख्य आणि 11 उपकेंद्रांवर परीक्षा सुरु झाली असल्याची माहिती कर्जत शिक्षण विभागाने दिली. आज पहिल्या पेपरसाठी आपल्या पाल्यांना घेऊन पालक मोठ्या …
Read More »अलिबागमध्ये पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा
अलिबाग : प्रतिनिधी येथील जे. एस. एम. महाविद्यालयाचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा शुक्रवारी (दि. 4) मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी प्रास्ताविक केले. परीक्षा विभाग प्रमुख प्रा. के. बी. चौगुले यांनी शैक्षणिक अहवालाचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आशुतोष …
Read More »मुरूडमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
मुरूड : प्रतिनिधी शालांत परीक्षा म्हणजे भविष्यातील कर्तृत्वाची दारे उघडून देणारा सोपान आहे. या परीक्षेत उत्तम प्राविण्य मिळविण्यासाठी वेळेला महत्त्व द्या, असे आवाहन विहूर येथील नचिकेताज हायस्कूलच्या संचालिका मुग्धा दांडेकर यांनी केले. शालांत परीक्षेतील प्रविष्ठ असलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुरूड तालुक्यातील विहूर येथील नचिकेताज हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुग्धा दांडेकर …
Read More »कर्जतमध्ये अग्निशमन दलाकडून जनजागृती
कर्जत : बातमीदार आग लागली की अग्निशमन दलाची मदत मागितली जाते. अग्निशामक उपकरणे कशी वापरावीत, आपत्कालीन परिस्थितीत काय काळजी घ्यावी, यासंबंधी कर्जत नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने नुकताच शहरात ठिकठिकाणी मार्गदर्शन आणि जनजागृती केली तसेच प्रात्यक्षिके दाखविली. एखाद्या स्थळी अचानक लागलेली आग विझवण्यासाठी कसा प्रयत्न केला पाहिजे, या बाबत कर्जत नगर …
Read More »पिरकोन हायस्कूलमध्ये विविध कार्यक्रम; आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती
उरण : बातमीदार मार्च 2021-2022, इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ठ होणार्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन व निरोप समारंभ आणि प्राचार्य व्ही. एस. व्हेटम यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिरकोन येथे मोठ्या उत्साहात झाला. या वेळी रयत टीकरिंग लॅबचे आमदार महेश बालदी यांनी उद्घाटन झाले. …
Read More »उरण शहरात पोस्ट कार्यालयाचे उद्घाटन
उरण ः वार्ताहर उरण शहरात पोस्ट कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी (दि. 3) शरण्या यु-डायरेक्टर पोस्टल सर्व्हिस नवी मुंबई विभाग यांच्या हस्ते झाले. शहरातील कोटनाका येथील पोस्ट कार्यालय जीर्ण व मोडकळीस आल्याने हे पोस्ट कार्यालय काही महिन्यांपासून जेएनपीटी टाऊनशिप येथे स्थलांतरीत झाले होते. त्यामुळे उरण शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होत …
Read More »चिंध्रण गावात साकारतोय सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प
सरपंच कमला देशेकर यांचे प्रयत्न कळंबोली : वार्ताहर सरपंच कमला एकनाथ देशेकर यांच्या दूरदृष्टीतून चिंध्रण गावातील संडपाण्याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प लवकरच कार्यरत होत आहे. त्यामुळे गावातील साथीच्या रोगांना आळा बसणार आहे. यामुळे गावातील महिलावर्गात उत्साहाचे वातावरण असून त्यांनी सरपंच कमला देशेकर यांचे अभिनंदन केले आहे. सांडपाण्यामुळे सर्वत्र पाणीच पसरत असून …
Read More »कर्नाळा परिसरात वेगाला बसणार ‘ब्रेक’
आरटीओच्या सेफ्टी व्हेईकलची नजर; विशेष उपाययोजना सुरू पनवेल ः वार्ताहर मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेलनजिक असलेल्या कर्नाळा अभयारण्य परिसरातून भरधाव वेगात जाणार्या वाहनांना आता ब्रेक लागणार आहे. कारण या वाहनांचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी आरटीओची नजर असणार आहे. वार्याच्या वेगाने धावणार्या वाहनांवर आता रोड सेफ्टी व्हेईकलच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. यासाठी आरटीओने …
Read More »पाली बसस्थानकाची पुनर्बांधणी खोळंबली
अष्टविनायक क्षेत्र व सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली येथील बसस्थानक देखणे व सुसज्ज असणे अपेक्षित होते. मात्र प्रदीर्घ प्रतीक्षा व पाठपुराव्यानंतर मंजूर झालेल्या या बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम आजही रखडले आहे. जीर्ण आणि जर्जर झालेल्या पाली बस स्थानकाची इमारत जवळपास वर्षभरापुर्वी पाडण्यात आली आहे. मात्र त्या ठिकाणी नवीन इमारतीच्या पुनर्बांधणीस व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper