Breaking News

Yearly Archives: 2022

शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

प्रलंबित प्रमुख मागण्यांवर चर्चा अलिबाग ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या शिष्टमंडळाने नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. राज्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या आणि भेडसावणारया समस्यांबाबत राज्यपालांना माहिती देऊन त्यावर चर्चा करण्यात आली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व शिक्षक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी केले. 1 नोव्हेंबर …

Read More »

पत्रकारांना कायद्याने खरेच संरक्षण मिळते?

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला म्हणजेच पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा केला गेलेला आहे, मात्र हा कायदा हा पत्रकारांवर हल्ला झाल्यानंतर खरेच काही संरक्षण देणारा आहे का, असा प्रश्न पडतो. महाराष्ट्र शासन हे देशातील पुरोगामी राज्य असून या राज्यात लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेला संरक्षण देणारा कायदा केला आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत हा …

Read More »

महाडमध्ये अपघातात तिघे ठार, दोन जण जखमी

महाड : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव येथे शनिवारी (दि. 26) मध्यरात्री बलेनो कारची बसला धडक बसून तिघांचा मृत्यू आणि दोन जण जखमी झाले आहेत. मुंबईच्या दिशेने जाणार्‍या बलेनो कारने (एमएच 05-डीएस 6861) समोरून येणार्‍या बसला (एमएच 48-बीएम 6299) धडक दिली. या अपघातात कारमधील संदीप सीताराम पाटील (40, ठाणे) …

Read More »

देवद, वांगणी तर्फे वाजेत विकासकामांचे भूमिपूजन

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघात विकासाची विविध कामे सुरू आहेत. त्यालाच अनुसरून देवद आणि वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायत हद्दीतही विकासकामे करण्यात येत असून त्याचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते …

Read More »

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचे आमरण उपोषण

मुंबई : प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे भोसले आक्रमक झाले असून त्यांनी शनिवार (दि. 26)पासून मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी संभाजीराजेंनी उपोषणासंदर्भात घोषणा केली होती. त्यानुसार …

Read More »

पोलीस मिनीबस घुसली चहाच्या टपरीत

खांब-कोलाड मार्गावर अपघात; चौघे जखमी, टपरीधारकाचे मोठे नुकसान धाटाव : प्रतिनिधी खांब-कोलाड मार्गावरील पुगाव गावाच्या स्टॉपवर  असलेल्या चहाच्या टपरीत शुक्रवारी (दि. 25) सकाळी पोलीस मिनीबस घुसली. या घटनेत चार पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून मिनीबससह टपरीचे अतोनात नुकसान झाले. पोलीस मिनीबस (एमएच-06,के-9930) शुक्रवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास खांबकडून कोलाडकडे …

Read More »

जुम्मापट्टी शाळा परिसरात लावले माकड पकडण्यासाठी पिंजरे

कर्जत : बातमीदार नेरळ जुम्मापट्टी येथील प्राथमिक शाळेतील वर्गात घुसून पिसाळलेल्या माकडाने गुरुवारी (दि. 24) पहिल्या इयत्तेतील विद्यार्थिनीला चावा घेतला होता. त्या जखमी विद्यार्थिनीला उल्हासनगर येथे उपचार करून घरी आणण्यात आले आहे. दरम्यान, त्या ठिकाणी येणार्‍या माकडांना पकडण्यासाठी वन विभागाने या शाळेच्या परिसरात पिंजरे लावले आहेत. कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत …

Read More »

कर्जतमध्ये मेल, एक्सप्रेस गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करावेत

कर्जत : प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकात मेल, एक्सप्रेस गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करावेत, अशी मागणी येथील रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे माजी सचिव नितीन परमार यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे  निवेदनाद्वारे केली आहे. पुण्याहून मुंबईला जाणार्‍या सर्व मेल, एक्सप्रेस रेल्वे गाड्या पुर्वी कर्जत स्थानकात थांबत असत, मात्र कोरोनाची लाट …

Read More »

आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

पेण : प्रतिनिधी तालुक्याचा सर्वांगीण विकास करणे हाच ध्यास असल्याने आमदार फंडातून 50 लाखाचा निधी देऊन वडखळ कोळवे गावाचा विकास करण्याचे ध्येय्य ठेवले आहे. कोळवे व परिसरातील गावांनी आपल्याला बहुमत दिले असून येथील नागरिकांचे प्रश्न सोडविणे हे माझे आद्य कर्तव्य समजतो, असे प्रतिपादन आमदार रविशेठ पाटील यांनी केले. कोळवे गावातील …

Read More »

मराठी भाषेचा वारसा जपा -प्राचार्य इंदुमती घरत

सीकेटी विद्यालय व कोमसापतर्फे मराठी भाषा दिन साजरा पनवेल ः रामप्रहर वृत्त मराठी भाषा गोड आहे. तिची भुरळ अनेक अमराठी माणसांनाही पडली आहे. त्यामुळे आपल्या मातृभाषेचा वारसा आपण जपला पाहिजे, असे मत चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य इंदुमती घरत यांनी शनिवारी (दि. 26) नवीन पनवेल …

Read More »