Breaking News

Yearly Archives: 2022

माथेरान दस्तुरी नाक्यावर टॅक्सी चालकांवर पोलिसांची कारवाई

कर्जत : बातमीदार माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाका येथील प्रवासी टॅक्सी चालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. विना परवाना गाडी चालविणे, कागदपत्रांची पूर्तता न करणे, कागदपत्र नसताना गाडी चालविणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेणे अशी प्रकरणे समोर आल्याने ही कारवाई केली आहे. माथेरान हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असून येथे येणार्‍या पर्यटकांना …

Read More »

पोलादपुरातील स्ट्रॉबेरी लागवड

गेल्या दहा वर्षांपासून पोलादपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी लागवडीचे प्रयोग सुरू आहेत. मोरगिरी, रानबाजिरे, पैठण, चाळीचा कोंड तसेच तालुक्याच्या विविध भागातील अनेक प्रयोगशील शेतकरी दरवर्षी दिवाळीपासूनच स्ट्रॉबेरी लागवड करीत होते. पोलादपूरनजिकच्या रानबाजिरे धरणाजवळ होऊ घातलेल्या स्ट्रॉबेरी फार्महाऊसमध्ये स्ट्रॉबेरी न पिकताच मोठ्या प्रमाणात सरकारी अधिकार्‍यांना उत्पन्न मिळाले आणि शासनाची रॉयल्टी बुडविणार्‍यास …

Read More »

पनवेल मनपातर्फे होणार महिलादिनी विविध कार्यक्रम

महापौरांचा अध्यक्षतेखाली महिला व बालकल्याण समितीची बैठक पनवेल : प्रतिनिधी महिलदिनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका व प्रजापिता ब्रम्हकुमारी यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. यासोबतच 5 मार्च रोजी खारघर येथे महिला बचत गट व  वैयिक्तिक महिला उद्योजिकांच्या विविध वस्तूच्या विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे …

Read More »

रायगडातील 15 हजार राज्य सरकारी कर्मचारी संपात सहभागी

अलिबाग : प्रतिनिधी आपल्या विविध प्रलंबीत मांगण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी  बुधवारपासून (दि. 22) दोन दिवस संप पुकारला आहे. त्याला रायगड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सुमारे 15  हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. यामुळे न शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट झाला होता. विविध संघटनांच्या समन्वय समितीच्या माध्यमातून शेकडो कर्मचारी बुधवारी …

Read More »

सुकापूरमध्ये रस्ते काँक्रीटीकरणाचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्याचा सर्वांगीन विकास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. त्यानुसार सुकापूर येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमधून रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची कामे मंजुर झाली आहे. या विकास कामांचे भूमिपूजन बुधवारी (दि. 23) भाजपचे …

Read More »

सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्येही रायगडात महाविकास आघाडीला तडे

शिवसेना स्वबळावर लढविणार- आमदार महेंद्र थोरवे कर्जत : बातमीदार रायगडचे पालकमंत्री हटावच्या मागणीनंतर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थित शिवसेनेने बंड केले. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षांत रायगडमध्ये मोठी फूट पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यानंतर आता रायगड जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्येही शिवसेनेने स्वबळावराचा नारा जाहीर केल्याने महाविकास आघाडीतील पक्षांत मोठी बिघाडी असल्याचेच …

Read More »

अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त परिसर सुशोभित; पनवेल मनपा सफाई कर्मचार्‍यांची अनोखी युक्ती

कळंबोली : प्रतिनिधी कळंबोली सेक्टर 1 येथील मोकळ्या भूखंडावर सफाई कर्मचार्‍यांच्या वतीने सुशोभित असे रंगरंगोटी करून तिथल्या परिसराला एक वेगळच सौंदर्य निर्माण करून दिले आहे. त्यामुळे सफाई कर्मचार्‍यांचे कौतुक येथील रहिवाशांनी केलेले आहे. कळंबोली सेक्टर 1 याठिकाणी असलेल्या मारुती मंदिराजवळ असलेल्या क्रिकेट मैदाना शेजारील एका जाग्यावर नेहमीच मो्या प्रमाणात कचरा …

Read More »

खारघरमधील भुयारी मार्गाची डागडुजी करा; भाजप नेते प्रभाकर घरत यांची सिडकोकडे मागणी

खारघर : रामप्रहर वृत्त खारघर रेल्वे स्टेशन बाहेरील भुयारी मार्गामधील रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते प्रभाकर घरत यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोच्या खारघर मधील कार्यकारी अभियंतांना निवेदन दिले आहे. घरत यांनी निवेदना म्हटले आहे की, खारघर रेल्वे स्टेशन येथील भुयारी मार्गामधील रस्ता खराब झालेला आहे. …

Read More »

उरणच्या टीपटॉप मार्केटचे नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन

उरण : वार्ताहर उरण येथील स्वामी विवेकानंद चौकजवळ असलेल्या टीप टॉप सुपर मार्केटचे नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते बुधवारी (दि. 23) उद्घाटन झाले. टीप टॉप सुपर मार्केटचे मालक हिरजी शिवजी चंदात व रणछोड शिवजी चंदात यांनी सर्व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले व आभार मानले. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष तथा …

Read More »

पाणी कपात करण्यापेक्षा पाणी चोरी थांबवा; आमदार मंदाताई म्हात्रे नवी मुंबई महापालिकेकडे मागणी

नवी मुंबई : बातमीदार, प्रतिनिधी नवी मुंबईतील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नवी मुंबईमध्ये विविध विकास कामे सुरू आहेत. सध्या पुनर्विकासाची कामेही सुरू झाली असून यापुढे मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीची अनेक कामे सुरू होणार आहेत. सद्यस्थितीत कामांना, प्रकल्पांना होणारा पाण्याचा वापर पाहता भविष्यात पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासोबत …

Read More »