महाड : प्रतिनिधी किल्ले रायगडावर गुरुवारी (दि.6) 350वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या अभूतपूर्व सोहळ्याची क्षणचित्रे याची देही याची डोळा पाहण्यासाठी संपूर्ण राज्यातून लाखो शिवभक्तांनी किल्ले रायगड हजेरी लावली होती. शिवभक्तांच्या अलोट गर्दीत आणि शिवगर्जनेने अवघा रायगड या वेळी दुमदुमून गेला. आखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या मार्फत गेली …
Read More »Yearly Archives: 2024
रायगडात खासदार सुनील तटकरे विजयी; अनंत गीतेंचा पराभव
अलिबाग : प्रतिनिधी महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आपला रायगडचा गड राखला आहे. लोकसभा निवडणुकीत तटकरे यांनी विजय मिळवला. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा 82 हजार 784 मतांनी पराभव केला. तटकरे यांना पाच लाख आठ हजार 352, तर गीते यांना चार …
Read More »मावळमधून खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयाची हॅट्ट्रिक; संजोग वाघेरेंवर मात
पुणे : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार तथा शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार व उद्धव ठाकरे गटाचे नेते संजोग वाघेरे-पाटील यांचा सुमारे 96 हजार 615 मतांनी पराभव केला. खासदार श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे यांच्यात सरळ लढत झाली होती. …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस समाजाचा वाढदिवस -पद्मश्री मधु मंगेश कर्णिक
केशवसुत स्मारकाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून 10 लाखांची मदत पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे राजकारणापेक्षा समाज आणि जनतेसाठी केलेले सामाजिक कार्य मोठे आहे. समाजाचे ऋण, सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कार्यामुळे त्यांच्या वाढदिवसाला विशेष महत्त्व आहे. त्यांचा वाढदिवस हा समाजाचा वाढदिवस आहे, असे गौरवोद्गार कोकण मराठी साहित्य परिषदेचे …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन
पनवेल ः रामप्रहर वृत्त गोरगरीबांचे आधारवड माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त रविवारी (दि. 2) सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर व हितचिंतकांनी अभीष्टचिंतन केले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर, पुत्र आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, …
Read More »‘जय संतोषी माँ’ 49; सुपर हिटचा सर्वकालीन बहुचर्चित चमत्कार….
पिक्चरच्या जगात सुपर हिट, मेगा हिट फिल्मची कोणतीही रेसिपी, तराजू, थर्मामीटरम कॅल्क्युलेटर, लॅपटॉप नाही. जगातील कोणताही ज्योतिषी कशीही कुठलीही कुंडली मांडून पिक्चर सुपर हिटसाठी हा मुहूर्त हुकमी आहे असे सांगू शकत नाहीत. तरीही अनेक फिल्मवाल्यांची शुभ तारीख, शुभ शब्द यावर श्रद्धा (कधी अंधश्रद्धाही) असतेच, आणि तीही असावी. पिक्चरचं भवितव्य पब्लिकच्या …
Read More »आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पनवेलमध्ये निषेध आंदोलन
पनवेल ः रामप्रहर वृत्त महाडच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला. त्यामुळे आव्हाड यांचा सर्वत्र निषेध होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुरुवारी (दि. 30) आव्हाडांविरोधात पनवेलमध्येही जोरदार आंदोलन करण्यात आले. या वेळी आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत तीव्र …
Read More »दहावीच्या परीक्षेत मुंबई विभागामध्ये रायगड जिल्हा अव्वल; 96.75 टक्के निकाल
अलिबाग ः प्रतिनिधी दहावीच्या परीक्षेत मुंबई विभागामध्ये रायगड जिल्हा अव्वल ठरला आहे. जिल्ह्यातील 96.75 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात पनवेल तालुका अव्वल असून सर्वाधिक 97.76 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून 35 हजार 913 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 35 हजार 727 विद्यार्थी परीक्षेला …
Read More »‘प्रेम नगर’ है यह अपना….
हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो साऊंड सिस्टीमपासून सुपर साऊंड सिस्टीमपर्यंत, चित्रपटाच्या रिळापासून डिजिटलपर्यंत… असा भरपूर नि भारी प्रवास करताना त्यात एक गोष्ट कायम राहिली, ती म्हणजे प्रेम. त्याला तुम्ही प्रेम म्हणा, प्यार म्हणा, मोहब्बत म्हणा, इश्क म्हणा, लव्ह म्हणा काहीही …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांचे सुरक्षारक्षकांकडून आभार
पनवेल : रामप्रहर वृत्त स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड येथील सुरक्षारक्षकांनी आमदार प्रशांत ठाकूर व जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांचे आभार मानले आहेत. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कळंबोली येथे रायगड सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक गेल्या सात वर्षांपासून कार्यरत आहेत. या आस्थापनेने खासगीकरणाच्या नावाखाली 2 मे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper