Breaking News

संपादकीय

टँकरचे पाणी पुढे पोहचलेच नाही

कर्जत तालुका पाणीटंचाईग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो आणि या तालुक्यात किमान 50-70 गावे आणि वाड्या या दरवर्षी पाणीटंचाईग्रस्त असतात. त्यांना टँकरने पाणीपुरवठादेखील केला जातो, मात्र सर्व पाणीटंचाईग्रस्त गावे-वाड्यांना पाणी पोहचत नाही. तीच स्थिती यावर्षीही असून तालुक्यातील 84 गावे-वाड्या पाणीटंचाईग्रस्त असताना केवळ 21 गावे-वाड्यांत शासनाचे टँकर पोहचत आहेत. त्यामुळे शासनाची पाणीटंचाई …

Read More »

मधुमेहाचा वाढता विळखा

अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत वयाची चाळिशी उलटल्यानंतरच हा आजार आढळून येत असे. परंतु आता मात्र विशीतील तरुणांमध्ये देखील मधुमेह आढळतो. बायपासची शस्त्रक्रिया करणे भाग पडणार्‍या सुमारे 60 टक्के रुग्णांमध्ये त्याच्या मुळाशी डायबिटिस हे कारण असते. महानगरांमध्ये तर 60 च्या पुढे वय असणार्‍यांपैकी 40 टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये मधुमेह आढळतो. रक्तातील साखरेचे सरासरी …

Read More »

मराठी माणूस, त्याची भाषा आणि इतर लोक

महाराष्ट्रातील सर्व भाषिक शाळांमधून मराठी भाषा आणि साहित्य हा विषय अनिवार्य करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या मुंबईत चालू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात घोषित केला. महाराष्ट्राबाहेरील आणि महाराष्ट्र शासनाचे ज्यांच्या प्रशासनावर नियंत्रण नाही अशा शिक्षण संस्थांच्या शाळा महाराष्ट्रात त्यांच्या विशिष्ट विद्यार्थीवर्गासाठी विद्यादानाचे काम करीत असतात. तेथेही हा अनिवार्यतेचा नियम लागू …

Read More »

पुलं वाचतची गेलो, तेथे पुलं होवूनिया ठेलो..!

पुलस्पर्श होताच दु:खे पळाली नवा सूर, आनंदयात्रा मिळाली.. नैराश्येतुनी माणसे मुक्त झाली जगू लागली, हास्यगंगेत न्हाली..! – कविवर्य मंगेश पाडगावकर पुलंच्या साहित्याचा माझ्या किंवा समाजाच्या जडणघडणीवर झालेला परिणाम, पुलंच्या लिखाणाचा समाजावर काय परिणाम झाला याचे मूल्यमापन करण्याइतका काही मी मोठा नाही, परंतु माझ्या स्वत:च्या वैचारिक जडणघडणीवर पुलंच्या साहित्याचा नि:संशय परिणाम …

Read More »

कर्माचे फळ

देशाचे नाही पण राज्यातील राजकारणात तसेच समाजकारण व विविध क्षेत्रात चुलते (काका) पुतणे वाद चांगलाच परिचित आहे. अगदी सामान्यातील सामान्य कार्यकर्ता ते मोठ्यातील मोठा राजकारणी, समाजकारणी, समाजसेवक यांना पुतणेप्रेम घातक ठरले आहे. अगदी पूतनामावशीच्या प्रेमासम. कधी काकाचे प्रेम अपुरे पडत असेल किंवा हात आखडता घ्यावा लागला असेल, तर काका-पुतण्या वाद …

Read More »

देवेंद्रांनी उमटविला ठसा, विधिमंडळात आणि शिवसेनेतही

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर इतकी जबरदस्त पकड बसविली आहे की ज्याप्रमाणे राष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदी यांनी आपले स्थान अढळ आणि अटल निर्माण केले आहे, तसेच महाराष्ट्रातसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी आपले स्थान मजबूत केले आहे. याचे संपूर्ण श्रेय जसे देवेंद्रांच्या बुद्धिचातुर्याला द्यावे लागेल तसेच या श्रेयाचे खरे मानकरी …

Read More »

सौरशीतगृहांचे वरदान

फळे आणि भाजीपाला ही नाशवंत शेती उत्पादने असून, बाजारात पोहोचेपर्यंत ती खराब होण्यास सुरुवात झालेली असते. खराब मालाला दामही अल्प मिळतो. भारतात अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर शेती उत्पादन वाळून जाते किंवा खराब होते. त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारी शीतगृहे शेतकर्‍याला हितकारक ठरू शकतात. विजेची अल्प किंवा अत्यल्प उपलब्धता असणार्‍या …

Read More »

लागावी मराठीची गोडी

मराठी भाषेची अवस्था शालेय शिक्षणात काहिशी दुर्लक्षित अशी आहे की काय, अशी शंका यावी असे व्यापक चित्र यंदाच्या राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेच्या निकालातही दिसून आले. मराठी शिक्षकांची अवस्था देखील फारशी बरी नाही असा सूर गेले अनेक महिने लागतो आहे. या सार्‍या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी केलेले हे सुस्पष्ट विधान निश्चितच प्रभावी …

Read More »

बालभारतीचे अभिनंदन

पहिली-दुसरीच्या इयत्तांची किंवा एकंदरच शालेय पुस्तके ही त्या-त्या पिढीच्या मानसिकतेवर दीर्घकाळ टिकणारे संस्कार करीत असतात. शालेय वयात पाठ्यपुस्तकातून समोर येणारी माहिती व विधाने मुले प्रमाण वाक्याच्या स्वरुपात स्वीकारत असतात. त्याचा प्रतिवाद फारच क्वचित केला जातो. त्यामुळेच लिंगभेदाच्या सामाजिक वैचारिक धारणेच्या स्वरुपात दूरगामी बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने बालभारतीने उचललेले पाऊल खूपच …

Read More »

कोंढवी अन् कोतवालची जीर्ण पुनर्वसन संकुले

पोलादपूर तालुक्यातील कोंढवी आणि कोतवाल येथे सिध्दिविनायक ट्रस्टच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या पुनर्वसन संकुलाचा ताबा दरडग्रस्तांना लॉटरीद्वारे देण्यात आला आहे. सिध्दिविनायक ट्रस्टच्या मदतीचा योग्य विनियोग न झाल्याने पोलादपूर तालुका पुनर्वसनापासून वंचित राहिला आहे, मात्र सध्या या जीर्णावस्थेत असलेल्या दोन्ही पुनर्वसन संकुलांच्या इमारती सरकार आणि आपद्ग्रस्तांच्या कोत्या मानसिकतेचे द्योतक म्हणून उभ्या आहेत. …

Read More »