Breaking News

संपादकीय

यंत्रणेत सुधाराची गरज

एकीकडे रेल्वे, बस आदी सार्वजनिक सेवा कोलमडलेल्या असतानाच रिक्षा, टॅक्सीवाले ग्राहकांना नाडतात. कुठे जायचे, कुठे जायचे नाही, यावरून प्रवाशांशी अरेरावीची भाषा करतात. रेल्वे, रस्त्यांची अवस्था यात गेल्या अनेक वर्षांत फारशी सुधारणा नाही. अर्थात हळूहळू परिस्थिती पालटते आहे. येत्या काही वर्षांत मेट्रोचे जाळे शहरभरात पसरेल. उपनगरे व आसपासचा परिसरही अधिक चांगल्या …

Read More »

थोर महापुरुषांच्या वास्तू उपेक्षित का?

रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर, तसेच स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांचे जन्मगाव असलेल्या नाते गावातील त्यांच्या जन्मस्थळाची अतिशय दुरवस्था झाली आहे. सी. डी. देशमुख यांचा जन्म ज्या घरामध्ये झाला त्या घराचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येते, अशीच मागणी नरवीर मुरारबाजी देशपांडे या स्वराज्याच्या सरदाराच्या …

Read More »

मोहीम जलसंवर्धनाची

देशाच्या कुठल्याही भागात शहरीकरण करताना आता हरित समतोल केंद्रस्थानी ठेवण्याचे भान बाळगायला हवे आहे. विहिरी, कुंडे आणि तळी जपण्याच्या पारंपरिक पद्धतींकडे पुन्हा एकदा वळावे लागणार आहे. जलसंवर्धनाला जनआंदोलनाचे रूप द्यावे लागेल, असे आवाहन खुद्द मोदीजींनीच केले. याहून अधिक चांगली सुरुवात त्यास लाभली नसती. बदलत्या हवामानाने आपले रंग दाखवायला केव्हाचीच सुरुवात …

Read More »

आपत्ती व्यवस्थापनसाठी कर्जतचे प्रशासन सज्ज

कर्जत तालुक्याची भौगोलिक रचना पाहिली असता डोंगरदर्‍या आणि पावसाळ्यात ओसंडून वाहणार्‍या नद्या यांनी संपन्न असलेला तालुका आहे. पावसाळ्यात सातत्याने दरडी कोसळण्याच्या आणि सतत पाऊस कोसळत असेल तर नद्यांना पूर येण्याच्या घटना घडत असतात. त्याचवेळी मोठ्या प्रमाणात  राज्यमार्ग यांचे जाळे विणले गेले असल्याने रस्ते आणि रेल्वे यांच्याबाबत आपत्तीचे प्रसंग मोठ्या प्रमाणात …

Read More »

असंघटितपणाचा शाप

देशात शेतीखालोखाल रोजगाराची संधी बांधकाम क्षेत्रात मिळत असल्याने देशभरातील ग्रामीण भागातील नडलेले, अशिक्षित, गरीब मजूर मोठ्या संख्येने कामाच्या शोधात शहरी भागांकडे स्थलांतर करीत असतात. त्यांची संख्या मोठी असल्यामुळेच त्यांच्या मजुरीच्या दरावरही परिणाम होतो. कामाच्या अनिश्चिततेमुळे व असंघटित असल्याने मिळेल त्या रोजगारावर हे मजूर काम करत राहतात. त्यांच्यासोबत त्यांचा कुटुंबकबिलाही भटक्यांचे …

Read More »

पेपरलेस कारभार एक भ्रम…

गेली काही वर्षे आपण पेपरलेसच्या गोष्टी ऐकतोय व त्याच्या गप्पाही मारतोय. संगणकीकरण, डिजिटलायजेशन वगैरेमुळे पेपर्स वापरण्याचे प्रमाण कमी होईल असे खरंच वाटत होते. मलाही बरे वाटले होते. पर्यावरण, झाडे वगैरे वाचतील हा विचार नंतरचा, पण टाईप केलेल्या कागदांचे ओझे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेणे वाचेल म्हणून मला जास्त आनंद होत …

Read More »

अमेरिकेने चिंता करू नये!

अमेरिकेचे धार्मिक स्वातंत्र्य या विषयावरचे जे ताजे प्रतिवृत्त प्रसिद्ध झाले आहे, त्यात भारतात धार्मिक अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत, अशी टिप्पणी करण्यात आली आहे. गायीवरून मुसलमानांच्या हत्या होत आहेत. नगरांची मुसलमानी नावे बदलण्यात येत आहेत आणि एकंदरीत मुसलमानांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा संकोच होईल अशी धोरणे भारत सरकार राबवत आहे, असे मत व्यक्त करण्यात …

Read More »

आयुष्य

तत्कालीन राज्याचे गृहमंत्री कै. आबा उर्फ आर. आर. पाटील यांनी क्लास वन अधिकारी व उच्चशिक्षित तरुणांच्या एका कार्यक्रमात आयुष्यावर भाष्य करणारे मार्गदर्शन केले होते. जीवनाच्या गरजा किती असाव्यात हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे. गरजा पूर्ण झाल्याच पाहिजेत, मात्र त्याचा विस्तार व मिळकतीची मर्यादा यांचीही सांगड घातली पाहिजे. त्यांनी एका उच्च अधिकार्‍याचे …

Read More »

मराठी गडी यशाचा धनी

महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले। खरा वीर वैरी पराधिनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा॥ पांडुरंग महादेव बापट उर्फ सेनापती बापट या थोर तत्त्वचिंतक आणि लढाऊ समाजसेवकाच्या या वचनाची आठवण झाली. मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या शिवशाही सरकारने म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या …

Read More »

पर्यटकांनी आततायीपणा टाळल्यास समुद्रकिनारे सुरक्षित!

पर्यटन व्यवसायामुळे रोजगाराच्या संधी वाढत असून कोकण किनारपट्टी देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरू पाहत आहे. अशात बीचवर धम्माल करावीशी न वाटली तरच नवल, परंतु नवख्या ठिकाणी समुद्राचा अंदाज न घेता तरुणाई पोहण्यासाठी खूपच अधीर होते. भरती-ओहोटीचे गणित लक्षात न घेतल्यास समुद्रात उडी घेणे जीवावर बेतू शकते. किंबहुना प्राणाशी खेळ करीत आहोत …

Read More »