Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

कोरोनाविरोधात आज संपूर्ण देशभरात जनता कर्फ्यू!

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोनाला देशात प्रतिबंध घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी (दि. 22) संपूर्ण देशभरात जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. अनेकांनी पंतप्रधानांच्या या उपक्रमाचे कौतुक केले असून, यात सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे.कोरोना विषाणूचा प्रसार सर्वत्र होत असून, भारतातही काही रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

पीटरसनही म्हणतो, सरकारी आवाहनाचे पालन करा!

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी (दि. 23) जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. मोदींच्या या आवाहनचे भारतीय क्रीडापटूंकडूनही कौतुक झाले. भारतात आलेला इंग्लंडचा क्रिकेटपटू पीटरसन यानेही सर्वांना आपापल्या सरकारने केलेल्या आवाहनाचे पालन करायला हवे, असे म्हटले आहे. यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, आर अश्विन, …

Read More »

मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार कोसळले

कमलनाथ यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा भोपाळ : वृत्तसंस्थाकाँग्रेसला मध्य प्रदेशात मोठा धक्का बसला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर मध्य प्रदेशात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. याचा शेवट अखेर शुक्रवारी (दि. 20) झाला. मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार कोसळले आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. मध्य …

Read More »

अखेर न्याय झाला!

निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवले नवी दिल्ली : वृत्तसंस्थानिर्भया बलात्कार व हत्या प्रकरणातील चारही आरोपींना शुक्रवारी (दि. 20) पहाटे 5.30 वाजता फासावर लटकवण्यात आले. मुकेश सिंग (वय 32), पवन गुप्ता (25), विनय शर्मा (26) आणि अक्षय कुमार सिंग (31) अशी या आरोपींची नावे आहेत. त्यामुळे उशिराने का होइना पण निर्भयाला न्याय …

Read More »

रविवारी देशभरात जनता कर्फ्यू

पंतप्रधान मोदी यांचे आवाहन नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाजनता कर्फ्यूची मागणी मी आज देशवासीयांकडे करीत आहे. जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध. त्याचे पालन प्रत्येक नागरिकाने करावे, अशी मागणी मी करीत आहे. रविवारी (दि. 22) सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत कुणीही बाहेर पडू नये, असे आवाहन पंतप्रधान …

Read More »

ऑस्ट्रेलियाच्या सर्व खेळाडूंचा आयपीएलमधील सहभाग अनिश्चित

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाजगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जवळपास दोन लाख 19,033 वर पोहचली आहे. कोरोनामुळे 170हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 8,953वर पोहचली आहे. दुसरीकडे 82 हजार 909 लोक बरेही झाले आहेत. आशियाई देशांपेक्षा युरोपमध्ये मृत्यूंची संख्या जास्त आहे. वेगाने पसरणार्‍या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. …

Read More »

परदेशी पर्यटकांना भारतात ‘नो एन्ट्री’

15 एप्रिलपर्यंत व्हिसावर बंदी नवी दिल्ली : वृत्तसंस्थापरदेशातून भारतात आलेल्या बहुतांश लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता 15 एप्रिलपर्यंत पर्यटक व्हिसा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 70च्या वर पोहोचली आहे. यामध्ये 17 परदेशी रुग्णांचाही समावेश आहे. सध्या देशातील 12 राज्यांमध्ये …

Read More »

ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये; मान्यवरांच्या उपस्थितीत हाती घेतले ‘कमळ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकाँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी (दि. 11) भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्ष अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे यांनी भाजपचे ‘कमळ’ हाती घेतले. भाजपत प्रवेश करताना शिंदे यांनी काँग्रेसवर टीका केली. यापूर्वी जी काँग्रेस होती ती आता नाही, असे त्यांनी नमूद केले.मी …

Read More »

मध्य प्रदेशात राजकीय धूळवड

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्याने काँग्रेसला धक्का नवी दिल्ली : वृत्तसंस्थामध्य प्रदेशात धूळवडीच्या दिवशीच राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. येथे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे काय भूमिका घेणार याकडे …

Read More »

ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांचे निधन

पुणे : प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक अनंत भगवान दीक्षित (वय 67) यांचे दीर्घ आजाराने सोमवारी (दि. 9) सायंकाळी खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि कन्या असा परिवार आहे.  गेल्या चार दशकांहून अधिक काळ पत्रकारितेत असलेल्या दीक्षित यांनी ‘सकाळ’च्या कोल्हापूर आवृत्तीचे आणि त्यानंतर पुणे आवृत्तीचे संपादक म्हणून …

Read More »