नाशिक : प्रतिनिधी शिवपुरी चौकातील उत्तम नगर येथे विजेच्या धक्क्याने दोन महिलांचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, विजेच्या धक्क्याने नागरिकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. सोजाबाई मोतीराम केदारे (80) …
Read More »सौदी अरेबियाकडून भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताच्या संभाव्य विकासवाढीची दखल घेत जगातील सर्वांत मोठा तेल निर्यातदार देश असलेल्या सौदी अरेबियानं गुंतवणुकीसाठी आता भारतावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. देशातील पायाभूत सुविधा आणि खाण आणि पेट्रोकेमिकल्स या क्षेत्रांमध्ये शंभर अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. सौदीचे ब्रँड अॅम्बेसेडर डॉ. सऊद बिन मोहम्मद अल …
Read More »पॅनकार्ड-आधार कार्ड जोडणीस मुदतवाढ
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था सरकारद्वारे पॅनकार्ड-आधार कार्ड जोडणीसाठी देण्यात आलेली अंतिम मुदत वाढवण्यात आलेली आहे. याअगोदर पॅनकार्ड-आधार कार्ड जोडणीसाठी 30 सप्टेंबर ही मुदत देण्यात आली होती, तर, आता नवी अंतिम मुदत 31 डिसेंबर देण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांना पॅनकार्ड-आधार कार्ड जोडणी करून घेण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी मिळाला आहे. …
Read More »पुण्यात ढगफुटी
14 जणांचा मृत्यू; अतिवृष्टीमुळे हाहाकार पुणे : प्रतिनिधी पुण्यात मंगळवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने बुधवारी मध्यरात्री रूद्रावतार धारण केला. या ढगफुटीत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे घाबरलेल्या नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. दरम्यान, गुरुवारीही (दि. 26) पावसाचा जोर होता. अतिवृष्टीमुळे शहराच्या मध्य वस्तीतून जाणार्या ओढ्यांना पूर आला. कात्रज …
Read More »ईडीने केली रॉबर्ट वाड्रांच्या कोठडीची मागणी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणीत पुन्हा भर पडली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांच्या कोठडीची आवश्यकता आहे, असं सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) दिल्ली हायकोर्टात सांगितलं. आर्थिक देवाण-घेवाणीत त्यांचा कथितरीत्या थेट संबंध आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा हे चौकशीत सहकार्य करत नसल्याचं ईडीनं कोर्टात …
Read More »हाफिजसाठी पाकची संयुक्त राष्ट्राकडे धाव
न्यूयॉर्क : वृत्तसंस्था दहशतवाद्यांसाठी ‘नंदनवन’ असलेल्या पाकिस्तानचा नापाक चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदविरोधात टेरर फंडिंगचं प्रकरण सुरू असतानाच, पाकिस्ताननं त्याच्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघात धाव घेतली आहे. महिन्याच्या खर्चासाठी हाफिजला बँक खात्याचा वापर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेकडे केली आहे. …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींना ग्लोबल गोलकीपर्स पुरस्कार
न्यूयॉर्क : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात यशस्वीपणे स्वच्छता अभियान राबविल्याबद्दल बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या वतीने त्यांना प्रतिष्ठेचा ग्लोबल गोलकीपर्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. फाऊंडेशनचे चेअरमन बिल गेट्स यांनी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान केला. पंतप्रधानांनी हा पुरस्कार देशवासीयांना समर्पित केला आहे. गौरवाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी …
Read More »आधार-पॅन लिंकची अंतिम मुदत 30 सप्टेंबरपर्यंत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पॅन आणि आधार क्रमांक 30 सप्टेंबरपर्यंत लिंक केला नाही, तर 1 ऑक्टोबरपासून पॅन कार्ड इन-ऑपरेटिव्ह म्हणजेच निष्क्रिय होईल. याआधी पॅन क्रमांक मुदत दिलेल्या तारखेपर्यंत आधार क्रमांकाशी लिंक केले नाही, तर ते इनव्हॅलिड (अमान्य) मानले जाईल, असा नियम होता. पॅन कार्ड इनव्हॅलिड (अमान्य) म्हणजेच, तुमच्याकडे पॅन कार्ड …
Read More »केंद्र सरकारी कर्मचार्यांना खूशखबर
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था केंद्र सरकारने आपल्या कर्मचार्यांच्या पेन्शन नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले असून याचा लाभ केंद्रीय कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना होणार आहे. सरकारने केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम, 1972 मधील 54 व्या नियमांत बदल केला आहे. त्यामुळे सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना मिळणार्या फॅमिली पेन्शनमध्ये वाढ होणार आहे. 1 …
Read More »सातार्याची पोटनिवडणूक विधानसभेसोबतच!
सातारा : प्रतिनिधी उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या खासदारपदासाठी सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अखेर जाहीर झाली आहे. विधानसभेसोबत म्हणजेच 21 ऑक्टोबरलाच सातार्यात मतदान होणार आहे. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सातार्याची जागा रिकामी झाली होती. उदयनराजे भाजपत गेल्यानंतर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper