Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

मंदिराचा भाग कोसळून चौघांचा मृत्यू

कोलकाता ः वृत्तसंस्था पश्चिम बंगालमध्ये जन्माष्टमीच्या उत्सवाला गालबोट लागले आहे. मंदिराचा काही भाग कोसळल्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 27 जण जखमी झाले आहेत. 24 उत्तर परगना जिल्ह्यातील कोचुआ गावात बाबा लोकनाथ मंदिरामध्ये ही घटना घडली. या मंदिरामध्ये जन्मोत्सव साजरा करण्यासाठी भाविकांनी गर्दी …

Read More »

विरोधकांची अवस्था बुद्धू मुलासारखी

मुख्यमंत्र्यांचे विरोधकांवर टीकास्त्र जळगाव ः प्रतिनिधी निवडणुकीत अपयश आले म्हणून ईव्हीएमला दोष देणार्‍या विरोधकांची अवस्था पेन खराब होते म्हणून परीक्षेत नापास झालो, असे म्हणणार्‍या बुध्दू मुलासारखी झाल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथील जाहीर सभेत विरोधकांना लगावला. महाजनादेश यात्रेच्या दुसर्‍या टप्प्याच्या दुसर्‍या दिवशी ते सभेत बोलत होते. या वेळी …

Read More »

नव्या भारतात कुटुंबवादाला स्थान नाही

पंतप्रधानांचा निर्धार; फ्रान्समध्ये मुस्लिमांकडून भव्य स्वागत नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौर्‍यावर असून, शुक्रवारी (दि. 23) त्यांचा दौर्‍याचा दुसरा दिवस होता. या वेळी त्यांनी भारतीयांशी संवाद साधत आपल्या सरकारने केलेल्या कामांची तसेच मिळवलेल्या यशाची माहिती दिली. मी इतर राजकीय नेत्यांप्रमाणे दिलेले वचन विसरत नाही, असा टोलाही या …

Read More »

तळीरामांनो सावधान!, कळंगुटकिनारी उघड्यावर मद्यपान करणार्यांवर कारवाई

म्हापसा ः वृत्तसंस्था जगप्रसिद्ध कळंगुट समुद्रकिनार्‍यावर येणार्‍या देश-विदेशी पर्यटकांना यापुढे सावधगिरी बाळगावी लागणार आहे. पंचायत क्षेत्रात उघड्यावर दारूचे सेवन करणार्‍यांवर तसेच उघड्यावर कचरा टाकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पंचायतीने दिला आहे. तसा आदेश पंचायतीकडून जारी करण्यात आला आहे. पंचायतीचे सरपंच शॉन मार्टीन्स यांच्या सहीनिशी जारी करण्यात आलेल्या आदेशात कळंगुट पंचायत …

Read More »

जगभरात 19 वर्षांत 2000 वाघांची शिकार

नागपूर : प्रतिनिधी गेल्या 19 वर्षांत जगातील 32 देशांमध्ये 1,977 वाघांची शिकार करण्यात आली आहे, तर 382 वाघांना जिवंत पकडण्यात आले. एकट्या भारतातच या 19 वर्षांत 626 वाघांची शिकार करण्यात आली असून वाघांच्या शिकारीत भारत पहिल्या क्रमांकावर असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. केंब्रिज येथील ट्रॅफिक इंटरनॅशनल या एनजीओच्या सर्व्हे …

Read More »

लग्नाची खात्री नसताना ठेवलेले शरीरसंबंध बलात्कार नाही ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था सहमतीने ठेवल्या जाणार्‍या शरीरसंबंधासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. लग्न होणार नसल्याची खात्री महिलेला असतानाही दोघांनी एकमेकांच्या सहमतीने शरीरसंबंध ठेवले तर तो बलात्कार ठरत नाही. लग्नाचे खोटे वचन देऊन बलात्कार केला, असेही म्हणता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात महिलेने दाखल …

Read More »

‘त्या’ कारवाईमागे केंद्र सरकार नाही ; गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आयएनएक्स भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने पी. चिदंबरम यांना अटक केली आहे. या अटकेमागे मोदी सरकार असल्याचा आरोप काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन केला होता. काँग्रेसच्या आरोपांवर केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चिदंबरम यांच्यावरील कारवाई कायद्याप्रमाणे होत आहे. त्यात केंद्र सरकार आणि भाजपची कोणतीही भूमिका नाही, असे …

Read More »

पाण्याखाली गेलेल्या गावांचे पुनर्वसन -चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : प्रतिनिधी पुराच्या पाण्याखाली गेलेल्या गावांचे नवीन जागेत पुनर्वसन करणार, अशी घोषणा महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (दि. 21) येथे केली. हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी, जुने पारगाव, नवे पारगाव या पूरग्रस्त गावांची पाहणी करून त्यांनी लोकांना दिलासा दिला. निलेवाडी येथे पूरग्रस्त गावकर्‍यांशी चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी आणि समस्या …

Read More »

सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार; चार जखमी

जळगाव : प्रतिनिधी सुरक्षा रक्षकाच्या हातातील बंदुकीतून अचानक गोळी सुटून चार जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि. 20) दुपारी अडीच वाजता भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत घडली. बंदुकीचा लॉक काढताना सुरक्षा रक्षकाच्या हातून नजरचुकीने हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. सेंट्रल बँकेच्या वरणगाव शाखेत सुरक्षा रक्षक म्हणून …

Read More »

अभिनंदन यांचा छळ करणार्‍या कमांडोचा खात्मा

नवी दिल्ली : भारतीय मिग-21 लढाऊ विमानासह पीओकेत कोसळलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना पकडणार्‍या आणि टॉर्चर करणार्‍या पाकिस्तानी कमांडोचा तीन दिवसांपूर्वी एलओसीवर लष्करासोबत झालेल्या चकमकीत खात्मा करण्यात आला आहे. बालाकोट हल्ल्यानंतर भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना हुसकावून लावताना भारताचे मिग-21 लढाऊ विमान पीओकेत कोसळले होते. त्यानंतर या विमानाचा …

Read More »