Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

‘नमो’पर्वाला दुसर्यांदा सुरुवात ; नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, अरविंद सावंत कॅबिनेट तर रावसाहेब दानवे, रामदास आठवले, संजय धोत्रे राज्यमंत्री

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्याचबरोबर भाजप आणि सहकारी पक्षांसह 58  खासदारांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यामध्ये कॅबिनेट मंत्रिपदी भाजपचे नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल आणि शिवसेनेचे अरविंद सावंत यांचा समावेश आहे. …

Read More »

राज्यात वनक्षेत्रासह ‘वाघ’ वाढले

नागपूर ः प्रतिनिधी राज्यात वनांचे क्षेत्र वाढत असल्यामुळे वाघ वाढले असून यंदा 250 च्या वर वाघांची संख्या पोहोचली आहे. हे मोठे वाघ असून ज्यांची मोजणी होत नाही, असे लहान वाघही 102 च्या वर पोहोचले आहेत, अशी माहिती राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. वन विभागातर्फे …

Read More »

मणिपूरमधील काँग्रेसच्या 12 आमदारांनी पक्षाकडे सोपवले राजीनामे

मणिपूर ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या अपयशानंतर काँग्रेसचे अंतर्गत वातावरणही खराब झाल्याचे दिसत आहे. देशभरातील मोठ्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू झाल्याचे दिसत आहे. मणिपूरमधील काँग्रेसच्या तब्बल 12 आमदारांनी मणिपूर काँग्रेस कमिटीतील त्यांना असलेल्या विविध पदांचे राजीनामे दिले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी पक्षाकडे राजीनामे सोपवत आम्ही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे …

Read More »

पायल तडवी आत्महत्येचा तपास गुन्हे शाखेकडे

मुंबई ः प्रतिनिधी नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. डॉ. पायल तडवी हिनं बुधवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली होती. डॉ. पायलच्या शरीरावर जखमा असल्याने ही आत्महत्या नसून हत्या आहे असा युक्तिवाद तिच्या वकिलांकडून …

Read More »

मुंबई-पुणे फक्त अडीच तासांत इंटरसिटीचा वेग वाढला

मुंबई ः प्रतिनिधी मुंबई ते पुणे दरम्यान इंटरसिटी एक्स्प्रेसने प्रवास करताना आता तुमचा जवळपास पाऊण तासांचा वेळ वाचणार आहे. इंटरसिटी एक्स्प्रसेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून शुक्रवारपासून म्हणजेच 31 मे पासून एक्स्प्रेस नव्या वेळापत्रकानुसार धावणार आहे. या नव्या वेळापत्रकानुसार इंटरसिटी एक्स्प्रेस फक्त 2 तास 35 मिनिटांत आपला प्रवास पूर्ण करणार …

Read More »

महायुती लाखोंच्या फरकाने विजयी

काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा; विधानसभेची वाट बिकट मुंबई ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने महाराष्ट्रात फक्त सर्वाधिक जागाच जिंकलेल्या नाहीत तर अनेक जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या तुलनेत मोठे मताधिक्यही मिळवले आहे. 2014 प्रमाणे 2019 मध्येही भाजपा-शिवसेना युतीने 48 पैकी 41 जागा जिंकल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून समोर आलेल्या तपशीलानुसार भाजपा-शिवसेना युतीने लोकसभेच्या 16 …

Read More »

आज नरेंद्र मोदी घेणार पंतप्रधानपदाची शपथ; मान्यवरांच्या स्वागतासाठी राष्ट्रपती भवन सज्ज

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भाजपने देशात अभूतपूर्व यश मिळवूून सलग दुसर्‍यांदा सत्ता आपल्याकडे राखली. त्यामुळे पंतप्रधानपदाचा शपथविधीही विजयानुसार मोठा होणार, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यानुसार राष्ट्रपती भवन प्रथमच एकावेळी सहा हजारांहून अधिक पाहुण्यांचा पाहुणचार करणार असल्याचे समजते. मोदी दुसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या कार्यक्रमासाठी सहा हजारांहून अधिक पाहुणे …

Read More »

प. बंगालमधील तीन आमदार, 50 नगरसेवक भाजपात

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत 18 जागा जिंकून मोठे यश मिळवणार्‍या भाजपने तृणमूल काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असणार्‍या तृणमूलचे दोन आमदार आणि 50 नगरसेवक भाजपच्या गळाला लागले आहेत. दिल्लीत या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. 2017मध्ये भाजपमध्ये सामील झालेले तृणमूलचे माजी नेता मुकुल रॉय …

Read More »

जम्मू-काश्मीरमध्ये ‘हिज्बुल’च्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू ः जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अनंतनागमधील कोकेरनाग येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. मंगळवारी सकाळपासून या भागात शोधमोहीम सुरू होती. यादरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलांत चकमक झाली. या चकमकीत हिज्बुल …

Read More »

मध्य रेल्वेची धिम्या मार्गावरील वाहतूक ठप्प

Mumbai : people walking in Railway Track second day central line local train Technical problem is continue at Kurla Station on Wednesday . Photo by BL SONI मुंबई ः प्रतिनिधी मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी (दि. 28) विस्कळीत झाली होती. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. तब्बल 45 मिनिटे वाहतूक उशिराने सुरू …

Read More »