Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

पश्चिम विदर्भातील 502 प्रकल्पांत 24 टक्के पाणीसाठा

अमरावती ः पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांतील मोठे, मध्यम व लघु अशा एकूण 502 प्रकल्पांत सरासरी 24.90 टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे. यामध्ये बुलडाणा व अमरावती जिल्ह्यातील सरासरी पाणीसाठ्याची स्थिती बिकट आहे. परिणामी पुढील पावसाळ्यापर्यंत तीन महिने पाण्याचे नियोजन योग्यरीत्या जलसंपदा विभागासह संबंधित यंत्रणेला करावे लागणार आहे. …

Read More »

अग्निशमन दलाची धाडसी कामगिरी

पुणे ः पुण्यामध्ये शनिवारी (2 मार्च) अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला चेतन ओसवाल (39) हे विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने एका इमारतीत लिफ्टमध्ये अडकल्याची माहिती मिळाली. चेतन हे तासभरापासून लिफ्टमध्ये अडकले असून ते खूप घाबरलेल्या अवस्थेत आहेत. त्यांना लवकर वाचवा, असा फोन चेतन यांच्या वडिलांनी केला होता. भवानी पेठेतील भवानी माता मंदिरासमोर …

Read More »

पर्रीकर वैद्यकीय चाचण्यांकरिता पुन्हा गोमेकॉत

पणजी ः मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना काल सकाळी पुन्हा उपचारांसाठी गोमेकॉत आणण्यात आले आहे. पर्रीकर यांच्या काही वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. अंतर्गत रक्तस्राव चालू आहे का हे तपासण्यासाठी काही चाचण्या घेण्यात आल्या. पर्रीकर फेब्रुवारी 2018पासून दुर्धर आजाराने त्रस्त असून गोवा, मुंबई, दिल्ली तसेच अमेरिकेतही त्यांच्यावर उपचार झाले आहेत. विविध वैद्यकीय …

Read More »

मंदिरातच पुजार्याची धारदार शस्त्राने हत्या

मसूदच्या भावाची कबुली नवी दिल्ली ः बालाकोटमध्ये भारताने केलेल्या हवाई हल्ल्यातील नुकसानीचे वृत्त पाकिस्तान सरकार आणि त्यांच्या लष्कराने नाकारले असले तरी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हवाई हल्ल्यात मोठे नुकसान झाल्याची कबुली दिली आहे. ’जैश’चा म्होरक्या मसूद अझहरचा लहान भाऊ मौलाना अम्मार याने एका ऑडिओ क्लिपमधून या वृत्ताला दुजोरा दिला आहे, …

Read More »

मूंछे हो तो अभिनंदन जैसी

‘अभिनंदन’ स्टाईलची तरुणांत क्रेझ बंगळूरू ः विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी त्यांच्या स्टाईलची तरुणांमध्ये क्रेझ निर्माण झाली आहे. भारताचा लढवय्या जवान विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याचे सध्या सगळीकडे कौतुक सुरू आहे. त्यांना मानणाऱा मोठा चाहता वर्गही तयार झाला आहे. त्याचबरोबर त्यांच्या व्यक्तीमत्त्वाला भारदस्तपणा देणारी त्यांची मिशीही तरुणांमध्ये …

Read More »

आसू आणि हसू!

शहीद निनाद मांडवगणे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार नाशिक : प्रतिनिधी जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत वीरगती प्राप्त झालेले स्क्वॉर्डन लीडर निनाद मांडवगणे (वय 33) यांच्यावर शुक्रवारी (दि. 1) नाशिकमधील गोदावरीच्या तिरावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतमातेच्या या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी नाशिककरांनी तुफान गर्दी केली होती. भारतमाता …

Read More »

अभिनंदन यांच्या आई-वडिलांचा अनोखा सन्मान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मध्यरात्रीनंतर जेव्हा चेन्नई-दिल्ली विमान दिल्लीतील धावपट्टीवर थांबले, तेव्हा सामान काढण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी झालेली पाहायला मिळाली नाही. त्या वेळी सर्वांच्या नजरा एका जोडप्याकडे वळल्या होत्या. ते होते भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे आई-बाबा. या वेळी प्रवाशांनी उभे राहत टाळ्यांच्या कडडाटात निवृत्त …

Read More »

वेलकम अभिनंदन!

आज होणार सुटका; भारताच्या इशार्‍याने पाक वरमले इस्लामाबाद, नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय वैमानिक अभिनंदन वर्धमान यांना शुक्रवारी (दि. 1) सोडण्यात येणार आहे, अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तान संसदेत केली. अभिनंदन यांना सुखरूप सोडा अन्यथा ठोस कारवाई करण्याचा इशारा भारताने दिला होता. त्याची गंभीर …

Read More »

पाकला उपरती;चर्चेला आम्ही तयार -इम्रान

इस्लामाबाद : वृत्तसंस्था पुलवामा येथील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने केलेल्या जबरदस्त एअर सर्जिकल स्ट्राईकमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये जबरदस्त तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा शांततेचा राग आळवला आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोघेही शस्त्रसज्ज देश आहेत, युद्धामुळे कुणाचेही भले होणार नाही. …

Read More »

सीमेवर युद्धाचे ढग

लष्कर, नौदल, हवाई दलही सज्ज नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान पिसाळला असून, सीमेवर दोन्ही बाजूकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू झाला आहे. त्यामुळे दोन्ही देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हद्दीत हल्ला करणारे पाकचे लढाऊ विमान पाडण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे. दरम्यान, निर्माण झालेल्या संभाव्य युद्धजन्य …

Read More »