कच्छ ः वृत्तसंस्था भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गुजरात येथील कच्छ सीमेवर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने एका 50 वर्षीय संशयित पाकिस्तानी नागरिकाला अटक केली आहे. बीएसएफ आणि सुरक्षा यंत्रणांकडून या संशयित पाकिस्तानी नागरिकाची चौकशी सुरू आहे. सीमेवरून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असताना …
Read More »चोरीच्या कागदपत्रांच्या आधारे बातमी छापणार्यांवर कारवाई ; केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राफेल प्रकरणात संरक्षण मंत्रालयातून चोरी केलेल्या कागदपत्रांच्या आधारे बातम्या छापण्यात आल्या आहेत. या कागदपत्रांच्या आधारे बातमी छापणार्या दोन इंग्रजी वृत्तपत्रांविरोधात ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीने महाधिवक्ता के. के. वेणुगोपाळ यांनी सुप्रीम कोर्टात दिली. फ्रान्सबरोबर 36 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी …
Read More »पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय भवनाला भीषण आग
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था दिल्लीतील सीजीओ कॉम्प्लेक्समधील पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय भवन इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. काल इमारतीच्या 5 व्या मजल्यावर ही आग लागली आहे. या आगीत एका सीआयएसएफ निरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 24 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे …
Read More »कुंभमेळ्यातील सफाई कर्मचार्यांसाठी 21 लाखांची मदत
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:च्या बचतीमधील 21 लाख रुपये कुंभमेळ्यातील सफाई कर्मचार्यांसाठी मदतनिधी म्हणून दिले आहेत. कुंभमेळ्यात कार्यरत असलेल्या संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांच्या नियोजनाबद्दल मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे. तसेच हा कुंभमेळा पुढील कित्येक वर्षांसाठी प्रेरणादायी अन् ऊर्जा देणारा ठरेल, असेही मोदींनी …
Read More »विकासाची मोठी भरारी घेण्यास कोकण सज्ज; मुख्यमंत्र्यांचा विश्वास; चिपी विमानतळ इमारतीचे उद्घाटन
सिंधुदुर्गनगरी ः प्रतिनिधी गेल्या चार वर्षांच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न 71 हजारांवरुन एक लाख 40 हजारांपर्यंत गेले आहे. महामार्ग रुंदीकरण, बंदर विकास, मत्स्यव्यवसाय विकास, पर्यटन, हवाई सेवा या माध्यमातून विकासाची मोठी भरारी घ्यायला सिंधुदुर्ग जिल्हा सज्ज झाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. सिंधुदुर्ग विमानतळाच्या (चिपी) …
Read More »पबजी खेळण्याच्या नादात प्यायला अॅसिड
छिंडवाडा ः कोणत्याही गोष्टीचे व्यसन हे वाईट असते. त्यातही आजच्या तरुणाईला तंत्रज्ञानासंदर्भातील व्यसन लागण्याचे प्रमाण वाढले आहे. पबजी या गेमचे व्यसन लागल्याने अनेकांचा विचित्र प्रकारे मृत्यू झाल्याच्या काही बातम्या आतापर्यंत समोर आल्या आहेत. अशाच प्रकारची एक घटना आता मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. येथील छिंडवाडामधील एक तरुण पबजी गेम खेळता खेळता …
Read More »एअर स्ट्राईकवरून भाजपचा काँग्रेसवर पलटवार
नवी दिल्ली ः भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राईकनंतर शंका उपस्थित करणार्या काँग्रेस नेत्यांवर केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी हल्लाबोल केला आहे. भारतीय लष्कर आणि हवाई दलावर काँग्रेसच्या नेत्यांचा विश्वास नाही. सुरक्षा दलांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं ते म्हणाले. केंद्रीय मंत्री प्रसाद यांनी काँग्रेस नेते कपिल …
Read More »समुद्रमार्गे दहशतवादी हल्ल्याचा धोका
नौदल प्रमुखांचा इशारा नवी दिल्ली ः समुद्रमार्गे दहशतवादी हल्ला होऊ शकतो. समुद्रातून दहशतवादी कारवाया करण्यासाठी अतिरेक्यांना प्रशिक्षण दिले जात आहे, असा इशारा भारताचे नौदलप्रमुख सुनील लांबा यांनी मंगळवारी दिला. दिल्लीमध्ये इंडो-पॅसिफिकच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. पुलवामा दहशतवादी हल्ला कट्टरपंथीयांनी घडवून आणला. त्यांना अधिकृत यंत्रणांची मदत होती. भारताला अस्थिर करण्याचा …
Read More »‘ते माझ्यावर, तर मी दहशतवाद्यावर स्ट्राईक करतो’
पंतप्रधानांचा विरोधकांवर घणाघात गांधीनगर ः एकीकडे विरोधी पक्ष मोदी हटावचे नारे देत असताना लोकांच्या बळावर मी लोकहिताच्या निर्णयावर ठाम आहे. ते मोदीवर स्ट्राईक करण्याचा मानस ठेवतात, तर मोदी दहशतवादावर स्ट्राईक करण्याचे मनसुबे आखतो, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर केला आहे. गुजरातच्या गांधीनगर येथे असंघटीत कामगारांसाठी पेन्शन योजनेचा …
Read More »कुंभमेळ्यात मुख्यमंत्र्यांचे गंगास्नान
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याला भेट दिली. त्यानंतर त्यांनी त्रिवेणी संगमावर गंगेत स्नान केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्याला भेट दिल्यानंतर आपल्या ट्विटर अकाऊंटवर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत, तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित भव्य आणि दिव्य …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper