Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता उद्या मिळणार

लखनऊ : वृत्तसंस्था पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत मोदी सरकार येत्या रविवारी (दि. 24) दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करणार आहे. गोरखपूर येथील शेतकरी मेळाव्यात पंतप्रधान मोदी एका क्लिकने देशातील 12 कोटी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 25 हजार कोटी रुपये ट्रान्सफर करणार आहेत. मोदी सरकारने या वर्षीच्या अर्थसंकल्पात …

Read More »

शरद पवार यांच्यासमोर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा गोंधळ

फलटण : प्रतिनिधी लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना शरद पवार यांच्या माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजीला तोंड फुटले आहे. खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेल्या पवार यांना त्याचा शुक्रवारी (दि. 22) फलटण दौर्‍यात अनुभव आला. पवारांच्या भाषणादरम्यानच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जोरदार राडा झाला. हा वाद एवढा टोकाला गेला की संतप्त कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना …

Read More »

विषारी दारूमुळे 17 जणांचा मृत्यू

गुवाहाटी ः वृत्तसंस्था आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने 17 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी (21 फेब्रुवारी) दारू प्यायल्यानंतर काही जण आजारी पडले होते. दारू प्यायल्याने अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी तातडीने गोलाघाट येथील शहीद कुशल कंवर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विषारी दारू प्यायल्याने 21  …

Read More »

धास्तावलेल्या पाकची बचावासाठी भागमभाग!

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था जास्तीत जास्त रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी सज्ज राहा. काही जागा सैनिकांसाठी राखीव ठेवा. जखमी सैनिकांचे वेळीच उपचार होतील याची काळजी घ्या, अशा आशयाची पत्रं पाकिस्तान लष्करानं देशभरातील सर्व रुग्णालयांना लिहिली आहेत. त्याचप्रमाणे देशाच्या सीमेवर राहणार्‍या नागरिकांना दक्षता बाळगण्याचा इशाराही दिला आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध …

Read More »

पाकिस्तानात जाणारे पाणी रोखणार ः ना. नितीन गडकरी

नवी दिल्ली : पुलवामातील आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची कोंडी करण्याचे प्रयत्न अधिक तीव्र केले आहेत. पाकिस्तानात जाणारे भारतातील व्यास, रावी आणि सतलज नद्यांचे पाणी रोखण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, या तीन्ही नद्यांवर उभारलेल्या प्रकल्पांच्या माध्यमातून आता पाकिस्तानला दिले जाणारे …

Read More »

आजपासून बारावीची परीक्षा

पुणे : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणार्‍या इयत्ता बारावीच्या परीक्षेला गुरुवार (दि. 21) पासून सुरुवात होत आहे. या परीक्षेला राज्यातून 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थी प्रविष्ठ झाले असून, परीक्षा 20 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. यंदा प्रथमच प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहे. …

Read More »

एमएमआरडीएचे क्षेत्र विस्तारले

मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) सीमा वाढविण्यास बुधवारी (दि. 20) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे वसई, पनवेल, अलिबाग, खालापूर व पेण तालुक्याचा उर्वरित भाग आणि पालघर तालुका पूर्णपणे या प्राधिकरणात समाविष्ट होणार आहे. या संदर्भातील एमएमआरडीए अधिनियमातील अनुसूचीमध्ये सुधारणा करण्यासाठीचा मसुदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात …

Read More »

दहशतवाद्यांना पोसू नका; पाक, चीनला अमेरिकेचा सल्ला

वॉशिंग्टन ः पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पोसू नका आणि त्यांना मदद देणे बंद करा, अशा शब्दांत अमेरिकेने पाकिस्तान आणि चीनला उद्देशून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संयुक्त राष्ट्र संघातील (युनो) आपापल्या जबाबदार्‍या यथाशक्ती पार पाडा, असेही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दोन्ही देशांना म्हटले आहे. युनोकडून घोषित करण्यात आलेले …

Read More »

महायोजना शिबिर नागरिकांसाठी लाभदायक -मुख्यमंत्री

पुणे ः प्रतिनिधी एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहचावा यासाठी महायोजनासारखी शिबिरे उपयुक्त ठरतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कोथरूड येथील महेश विद्यालय येथे महायोजना शिबिर 2019चे उद्घाटन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय …

Read More »

आग्र्यात काश्मिरींना हॉटेलबंदी

आग्रा ः वृत्तसंस्था पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मिरी तरुणांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता उत्तर प्रदेशातील आग्र्यामध्ये काश्मिरी लोकांना हॉटेलमध्ये रूमही न देण्याचा निर्णय काही हॉटेलचालकांनी घेतला आहे. यासंदर्भातील काही पत्रकेही या हॉटेल व्यावसायिकांकडून छापण्यात आली आहेत. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना एका हॉटेलचा व्यवस्थापक फिरदौस अलीने हॉटेलांच्या या निर्णयाचे समर्थन …

Read More »