Breaking News

मुंबई – नवी मुंबई

मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह; झिशान सिद्दिकींची भाई जगतापांविरोधात तक्रार

मुंबई ः प्रतिनिधी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना काँग्रेसने मात्र आतापासूनच पुढील विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा नारा दिला आहे, तर अवघ्या वर्षभरातच मुंबईत महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसून कामाला सुरुवात केली आहे. असे असताना मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस दिसू लागली आहे. काँग्रेसचे वांद्रे पूर्वमधील आमदार झिशान …

Read More »

भाजपतर्फे 21 जूनला योग शिबिरे

मुंबई ः प्रतिनिधी जागतिक योग दिनानिमित्त 21 जून रोजी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशतर्फे राज्यातील 2700पेक्षा अधिक ठिकाणी योग शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमात राज्यभरातील एक कोटींहून अधिक नागरिक सहभागी होतील, अशी माहिती मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी (दि. 18) दिली. भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत ते …

Read More »

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक; एनआयएची मोठी कारवाई

मुंबई ः प्रतिनिधी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेली स्फोटके आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना गुरुवारी (दि. 17) अटक केली. या प्रकरणात सचिन वाझेंनंतर अटक होणारे प्रदीप शर्मा हे मुंबई पोलीस दलातील दुसरे मोठे अधिकारी आहेत. …

Read More »

वाढीव मालमत्ता करात भूमिपुत्रांना दिलासा द्यावा -निशांत भगत

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांना वाढीव मालमत्ता कर, तीन पट दंड, मागील थकबाकी व अंदाजित क्षेत्रफळ जोडून वितरीत केलेल्या देयकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजप युवा नेता निशांत करसन भगत यांनी नवी मुंबई आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. भगत यांनी निवेदनात म्हटले आहे की, नवी मुंबई शहरातील …

Read More »

मराठा आरक्षणाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

संभाजीराजे उद्या घेणार भेट मुंबई ः प्रतिनिधीमराठा आरक्षणावर कोल्हापुरात खासदार संभाजीराजेंच्या नेतृत्वात बुधवारी (दि. 16) मूक आंदोलन झाले. या वेळी सर्व लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका मांडत मनोगत व्यक्त केले. दरम्यान, या आंदोलनानंतर संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे.या आंदोलनात मराठा समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर …

Read More »

‘शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली’

मुंबई : अयोध्येतील राम मंदिर उभारणीमधील कामात जमीन खरेदी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरून शिवसेनेने घेतलेल्या जहाल भूमिकेचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाकडून बुधवारी (दि. 16) आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसेना भवन परिसरात तुफान हाणामारी झाली. यानंतर माहीम पोलीस ठाण्यात पोहचल्यावर भाजप नेते आमदार आशिष शेलार …

Read More »

सिडकोतर्फे नैना प्रकल्पाच्या जमीन मालकांना आवाहन

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळातर्फे नवी मुंबई विमानतळाभोवतालच्या 371 चौ.कि.मी. च्या प्रदेशात साकारण्यात येत असलेल्या, नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र अर्थात नैना प्रकल्पाची अंमलबजावणी जलद गतीने होत असून प्रकल्पाकरिता प्रस्तावित 11 नगर रचना योजनांपैकी क्र. 1 ते 3 या योजनांवर विविध स्तरांवर कार्यावाही सुरू आहे. तर योजना …

Read More »

‘दिबां’च्या नावासाठी डोंबिवलीत सर्वपक्षीय कृती समितीची बैठक

डोंबिवली : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, या मागणीसाठी सोमवारी (दि. 14) डोंबिवली येथे सर्वपक्षीय कृती समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये 24 तारखेला होणार्‍या आंदोलनासंदर्भात दिशा ठरविण्यात आली. या बैठकीला नवी मुंबई विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार …

Read More »

महाराष्ट्रातील सरकार एकमेकांच्या पायात पाय घालून पडेल -दानवे

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. पटोले यांना येत्या तीन वर्षांत मुख्यमंत्री होण्याची संधी आहे. एवढेच नाही तर येत्या तीन वर्षात अजित पवारांनीही मुख्यमंत्री व्हावं, त्यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत, असे म्हणत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्रातले …

Read More »

वाशीच्या महात्मा फुले भवनमध्ये 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण केंद्र; आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश

नवी मुंबई : प्रतिनिधी वाशी प्रभाग क्र.63 मधील नागरिकांसाठी 18 ते 44 वर्षांपर्यंतच्या नागरिकांना थेट लसीकरणाचा लाभ घेता यावा, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने माजी सभापती संपत शेवाळे, स्थानिक नगरसेविका दयावती शेवाळे यांच्या सौजन्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वाशी व फोर्टिस हॉस्पिटल, वाशी यांच्या माध्यमातून वाशी सेक्टर-17 …

Read More »