Breaking News

मुंबई – नवी मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या नातेवाइकाचे ‘नाणार’च्या जमिनीत कमिशन

भाजपचे नेते निलेश राणेंचा गंभीर आरोप मुंबई : प्रतिनिधी कोकणातील बहुचर्चित आणि वादग्रस्त नाणार प्रकल्पावरुन भाजपचे नेते निलेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नाणार प्रकल्पात बाधित जमिनीचे मुख्यमंत्र्यांच्या नातेवाइकाने कमिशन घेतले आहे, असा खळबळजक आरोप निलेश यांनी यांनी केला आहे. नाणार प्रकल्पाला शिवसेनेने विरोध …

Read More »

मेट्रोच्या प्रश्नावर दुर्लक्ष

तत्काळ पाऊले उचलण्यासंदर्भात फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र मुंबई : प्रतिनिधी मेट्रो-3 च्या कारशेडची जागा बदलण्याचा घातलेला घाट, आधीच अहवाल लिहून नवीन कमिटीचा निव्वळ फार्स, राज्याचे आर्थिक आणि मुंबईकरांचे प्रचंड नुकसान टाळण्यासाठी आरे येथेच कारशेड करण्याबाबत तत्काळ पाऊले उचलण्याची गरज आदी मुद्दे मांडत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना …

Read More »

दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर

शालेय शिक्षणमंत्र्यांची माहिती मुंबई ः प्रतिनिधीराज्य शिक्षण मंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी (दि. 21) केली आहे. बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे 2021 दरम्यान घेण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दिली. त्याचप्रमाणे दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मेदरम्यान घेण्यात …

Read More »

वीज थकबाकी दंडेलशाहीने वसूल केल्यास राज्यात उद्रेक

आ. प्रवीण दरेकर यांचा मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे इशारा मुंबई ः प्रतिनिधीकोरोना काळात वीज ग्राहकांना हजारो, लाखोंची वीज बिले पाठविल्यामुळे महावितरणचा सावळागोंधळ समोर आला आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्याऐवजी सरकार सक्तीने, दंडेलशाहीने ग्राहकांकडून थकबाकी वसूल करणार असेल, तर राज्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी …

Read More »

‘वीजपुरवठा खंडित केल्यास राज्य सरकारविरुद्ध दोन हात’

मुंबई : प्रतिनिधी वीजपुरवठा खंडित केल्यास राज्य सरकारविरुध्द दोन हात करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट इशाराच दिला आहे. महावितरणच्या वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे, थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या धोरणावरून शेट्टी यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. राजू शेट्टी …

Read More »

टोपेंनी राजीनामा द्यावा; भाजपची मागणी लसीकरण कार्यक्रमात अकार्यक्षमता; आमदार अतुल भातखळकर यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विरुद्धच्या लसीकरण मोहिमेला मुंबईसह राज्यात मोठी खीळ बसली असून मुंबईत मंगळवारी दिवसभरात केवळ 13 लोकांना व राज्यभरात केवळ 181 लोकांनाच कोरोना लस देण्यात आली आहे. राज्यात 9.83 लाख लसी उपलब्ध असताना सुद्धा केवळ राजकारण करण्यासाठी लस कमी देण्यात आल्याची ओरड केली जात आहे. केंद्राकडे बोट दाखविणार्‍या …

Read More »

पती-पत्नीमधील वाद वाढले!; वर्षभरात 633 तक्रारी; 151 प्रकरणांत समुपदेशन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पती-पत्नीमधील वाद आणि यातून होत असलेले घटस्फोट हा एक गंभीर प्रश्न असून यात वाढ होत असल्याने पोलीस समुपदेशनाच्या माध्यमातून हे वाद मिटविण्याचे काम करीत असतात. 2020 या वर्षात पती-पत्नीमधील वादाच्या 633 तक्रारी दाखल झाल्या असून त्यातील 151 तक्रारींत समुपदेशनाद्वारे तोडगा निघाला आहे. कायदा आणि सुव्यवस्था …

Read More »

धान्य, भाज्या ‘मातोश्री’त नेऊन विकायच्या का?

खासदार नारायण राणे कडाडले मुंबई : प्रतिनिधीनव्या कृषी कायद्यांविरोधात मुंबईतील आझाद मैदानात 23, 24, 25 जानेवारी रोजी होणार्‍या शेतकरी आंदोलनात महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचे मुख्य नेते सहभागी होणार आहेत. यावरून भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत समाचार घेतला आहे. हे आंदोलन राजकीय आहे. वर्षभरात शेतकर्‍यांच्या हिताचे एकही काम …

Read More »

राज्य सरकारची कृती सगळ्याच आरक्षणांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी

देवेंद्र फडणवीस यांचा आरोप मुंबई : प्रतिनिधीमराठा आरक्षण प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असून, या संदर्भात बुधवारी (दि. 20) होणारी सुनावणी पुढील महिन्यात ढकलण्यात आली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीचा निर्णय लांबत चालल्याची स्थिती आहे. दरम्यान, या प्रकरणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले …

Read More »

महाविकास आघाडीत बिघाडी?; नवी मुंबईत स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा सूर

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेरूळ येथे झालेल्या काँग्रेसच्या विभाग कार्यकर्त्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही, तर या वेळी स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा सूर आळवला गेला. दुसरीकडे वाशी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या नूतनीकरण पुनर्प्रवेश सोहळ्यावरून निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकला गेल्याचे बोलले जात असले तरी …

Read More »