नवी मुंबई : रामप्रहर वृत्त होपमिरर फाऊंडेशनच्या वतीने व एज्यु-टेक कोचिंग क्लासेस, व्हेरल इव्हेंट्स आणि एचआर सोल्यूशन्सच्या सहकार्याने तळोजा फेज 1 येथे विनामूल्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो जणांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घेतला. होपमिरर फाऊंडेशन ही रमजान शेख यांनी स्थापन केलेली एक स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेने …
Read More »सिडकोतर्फे सहा भूखंड विक्रीकरिता उपलब्ध
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील खारघर, कळंबोली आणि सानपाडा नोडमधील निवासी आणि वाणिज्यिक (आर+सी) वापराचे सहा भूखंड विक्रीकरिता उपबल्ध करून देण्यात आले आहेत. प्रत्येक नोडमधील दोन याप्रमाणे सहा भूखंड विक्रीकरिता उपलब्ध आहेत. खारघर हा नवी मुंबईतील सर्वांत मोठा नोड असून रेल्वे, रस्ते आणि प्रस्तावित मेट्रो स्थानक …
Read More »धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर -पवार
मुंबई ः प्रतिनिधी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप आणि त्यानंतर फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी केलेला खुलासा यामुळे राज्यातील राजकारणात मोठा गदारोळ माजला आहे. मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचे स्वरूप गंभीर …
Read More »धनंजय मुंडे राजीनामा द्या!; सर्व स्तरांतून मागणी; भाजप आक्रमक
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने केलेला बलात्काराचा आरोप आणि तिच्याच बहिणीसोबत मुंडे यांच्या असलेल्या संबंधांवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या सगळ्या घडामोडींप्रकरणी मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. भाजपनेही ही मागणी लावून धरली आहे. …
Read More »कोरोनाच्या विरोधातील लढाईत पंतप्रधान मोदींचे कार्य जगात सर्वोत्तम
देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य जगात सर्वोत्तम आहे. कोरोनाच्या विरुध्द संपूर्ण देशाने एकत्र येऊन लढण्याची आवश्यकता होती. परंतु प्रत्येक गोष्टीत विरोध करण्याची मानसिकता असणार्या विरोधी पक्षांनी निरर्थक आरोप करण्याचेच काम केले आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोरिवली येथे म्हणाले. कोरोनाच्या …
Read More »मंत्री धनंजय मुंडेंविरोधात बलात्काराची तक्रार
तरुणीची पोलिसांत धाव मुंबई : प्रतिनिधीराज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणीने केला असून, ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे, मात्र याबाबत कारवाई झाली नसल्याचे पीडितेचे म्हणणे आहे.माझ्यावर 2006पासून अत्याचार सुरू होते. पुढे बॉलीवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा …
Read More »मुख्यमंत्र्यांनी जाणूनबुजून संपत्ती लपवली; भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून भाजपचे माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. दरम्यान, आता सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती लपवली असल्याचा आरोप करत त्यांनी ही तक्रार …
Read More »सिडकोकडून बांधकाम क्षेत्राला दिलासा; आर्थिक वर्षात जमिनींच्या राखीव किमती गोठविणार
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको संचालक मंडळाच्या 19 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या बैठकीत नवी मुंबईच्या विविध नोडमधील आणि नोडबाहेरील क्षेत्रांसाठी सिडकोच्या मालकीच्या जमिनींच्या राखीव किंमती 2020-21 या आर्थिक वर्षाकरिता म्हणजे 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत गोठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अविकसित जमिनीची किंमत, सर्व प्रकारच्या …
Read More »आम्ही सुरक्षेशिवाय फिरणारे लोक -फडणवीस
लोणावळा : प्रतिनिधीसुरक्षा काढणे किंवा ठेवणे यामुळे आमच्यावर काही परिणाम होत नाही. आम्हाला त्याची काही चिंता नाही. आम्ही सुरक्षेशिवाय फिरणारे लोक आहोत. आहे तेवढी सुरक्षा पुरेशी आहे व ती ठेवली नाही तरीदेखील आम्हाला काही अडचण नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 11) येथे आयोजित पत्रकार परिषदेत म्हटले.विधानसभेतील …
Read More »राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव
परभणीतील मृत कोंबड्यांच्या अहवालातून स्पष्ट मुंबई : प्रतिनिधीदेशातील इतर राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. परभणी जिल्ह्यात 800 कोंबड्यांचा झालेला मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाला असल्याचे प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. मुरूंबा येथे ही घटना घडली असून, परभणीचे जिल्हाधिकारी डी. एम. मुंगळीकर यांनी याबाबत माहिती दिली.देशातील सहा राज्यांमध्ये …
Read More »