कोट्यवधींची उलाढाल, पोलिसांसमोर मोठे आव्हान नवी मुंबई : रामप्रहर वृत्त 21 व्या शतकातली स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणार्या नवी मुंबईतले ड्रग्स विक्रीचे रॅकेट मोडीत काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. गांजा वगळता इतर इतर सर्व सिन्थेटिक (कृत्रिम) ड्रग्स असून, देश-विदेशात बनवले जात आहेत. हे ड्रग्स थेट मनोविकृतीवर गंभीर परिणामकारक आहेत. त्याची नशा …
Read More »खराब रस्त्यांवरून आव्हाडांचा ठाकरे सरकारला घरचा अहेर
कल्याण : प्रतिनिधी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांची उणीधुणी काढताना दिसतात. त्यावरून बरीच चर्चा रंगते. अशाच प्रकारे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवरून ठाकरे सरकारला घरचा अहेर दिला आहे. कल्याण पश्चिममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र …
Read More »औरंगाबादच्या नामांतरावरून महाविकास आघाडीत बिघाडी; शिवसेना-काँग्रेसमध्ये जुंपली
मुंबई : प्रतिनिधी औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याचा मुद्दा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमध्ये उफाळून आला आहे. शिवसेनेकडून वारंवार नामांतराची मागणी केली जात आहे, तर काँग्रेसकडून त्यास सातत्याने विरोध दर्शविला जात आहे. आता याच मुद्द्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला धर्मनिरपेक्षतेवरून टोला लगावला आहे, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब …
Read More »कोकण विभागात दोन हजार 765 आरोग्य कर्मचार्यांचे लसीकरण पूर्ण
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे शनिवारी (दि. 16) कोकण विभागात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ विभागातील सामान्य रुग्णालयांमध्ये करण्यात आला. कोकण विभागात विविध ठिकाणी कार्यरत असलेले आरोग्य अधिकारी तसेच मान्यवरांनी पहिली लस टोचून घेऊन या मोहिमेची सुरुवात केली. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी विविध केंद्रांवर …
Read More »भूखंड विक्रीस उत्तम प्रतिसाद
सिडकोच्या तिजोरीत 56 कोटींची भर नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळातर्फे ई-लिलाव व ई-निविदा प्रक्रियेद्वारे घणसोली आणि नवीन पनवेल येथील एकूण 27 निवासी, रो हाउस, बंगलो भूखंडांच्या विक्रीच्या योजनेस निविदाकारांचा उत्तम प्रतिसाद लाभून योजना पुस्तिकेतील वेळापत्रकानुसार संपूर्ण प्रक्रिया झाली. शुक्रवारी (दि 15) सिडको भवन येथे प्राप्त झालेल्या ई-निविदा उघडण्यात …
Read More »नवी मुंबईत सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ
पत्रकार परिषदेत पोलिसांनी दिली माहिती नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना काळात प्रत्यक्ष गुन्हे कमी झालेली असली तरी 2020 या वर्षात नवी मुंबई शहरात सायबर गुन्ह्यांत मोठी वाढ झाली आहे. 2019 च्या तुलनेत ही वाढ तीन पटीपेक्षा जास्त असून उकल होण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. त्यामुळे पोलिसांपुढे हे मोठे आव्हान असणार …
Read More »जावयाच्या अटकेनंतर मंत्री नवाब मलिकांचा सावध पवित्रा
मुंबई : प्रतिनिधी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेपाठोपाठ राष्ट्रवादीचे आणखी एक मंत्री अडचणीत आले आहेत. अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्जप्रकरणी अमली पदार्थविरोधी विभागाच्या (एनसीबी) पथकाने बुधवारी अटक केली. यावर मलिक यांनी सावध भूमिका घेतली आहे. ड्रग्जप्रकरणी मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालावर कारवाई करण्यात आल्यानंतर समीर खान यांचे …
Read More »तळोजा येथील रोजगार मेळाव्याला प्रतिसाद
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त होपमिरर फाऊंडेशनच्या वतीने व एज्यु-टेक कोचिंग क्लासेस, व्हेरल इव्हेंट्स आणि एचआर सोल्यूशन्सच्या सहकार्याने तळोजा फेज 1 येथे विनामूल्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो जणांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घेतला. होपमिरर फाऊंडेशन ही रमजान शेख यांनी स्थापन केलेली एक स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेने …
Read More »सिडकोतर्फे सहा भूखंड विक्रीकरिता उपलब्ध
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील खारघर, कळंबोली आणि सानपाडा नोडमधील निवासी आणि वाणिज्यिक (आर+सी) वापराचे सहा भूखंड विक्रीकरिता उपबल्ध करून देण्यात आले आहेत. प्रत्येक नोडमधील दोन याप्रमाणे सहा भूखंड विक्रीकरिता उपलब्ध आहेत. खारघर हा नवी मुंबईतील सर्वांत मोठा नोड असून रेल्वे, रस्ते आणि प्रस्तावित मेट्रो स्थानक …
Read More »धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर -पवार
मुंबई ः प्रतिनिधी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप आणि त्यानंतर फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी केलेला खुलासा यामुळे राज्यातील राजकारणात मोठा गदारोळ माजला आहे. मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचे स्वरूप गंभीर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper