नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना, महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष पोलीस यंत्रणेकडून भाजपच्या माजी नगरसेवकांना पक्ष सोडण्यासाठी दबाव टाकत आहेत. त्यांच्यावरील जुनी प्रकरणे मुद्दाम उकरून काढत, कायदेशीर कारवाईची भीती त्यांना दाखविण्यात येत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर …
Read More »‘मुंबई तोडण्याचा काँग्रेसचा डाव भाजप यशस्वी होऊ देणार नाही’
मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसचे नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनी मुंबईसाठी दोन आयुक्त देण्याची मागणी करणे अत्यंत निंदनीय असून, या आडून मुंबईचे तुकडे करण्याचे काँग्रेसचे अनेक वर्षांपासूनचे षडयंत्र पुन्हा एकदा उघड झाले आहे असे सांगत भाजपचे मुंबई प्रभारी आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी अस्लम शेख यांच्यावर …
Read More »छत्रपती शाहू महाराज उद्यानाच्या दुरवस्थेकडे लक्ष द्यावे
भाजपचे आयुक्तांना निवेदन नवी मुंबई ः प्रतिनिधी महानगरपालिकेतर्फे सर्वत्र मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान सुरू आहे. स्वच्छतेसाठी प्रथम क्रमांक मिळावा म्हणून हे सर्व अभिमानास्पद असले तरी महानगरपालिका प्रशासनाचे उद्यानांकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. शहरातील उद्यानांवर नोव्हेंबरपर्यंत 28 कोटींचा खर्च करण्यात आला, परंतु नेरूळ प्रभाग क्र. 87 सेक्टर 8मधील छत्रपती शाहू …
Read More »पत्रकार दिनानिमित्त नवी मुंबईत परिसंवाद
नवी मुंबई : विमाका नवी मुंबई प्रेस क्लब आणि नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग यांच्या सहकार्याने पत्रकार दिनानिमित्त नवी मुंबईच्या विष्णूदास भावे नाट्यगृहात 21व्या शतकातील 21वे वर्ष: आव्हाने या परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या …
Read More »पोलीस दलाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; नवी मुंबईत फक्त नऊ जण बाधित
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबइ पोलीस दलात कोरोनाबाधितांचा आकडा एक हजार 700पर्यंत गेला होता तर मृतांचा आकडा 20 झाला होता. मात्र आता यातील फक्त नऊ जण बाधित राहिले आहेत. यातील आठ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील पोलीस दलाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. कोरोनामुळे टाळेबंदी लागू झाल्यानंतर …
Read More »दक्षिण नवी मुंबईसाठी सिडकोकडून ‘हेटवणे’तील पाणीसाठा आरक्षित
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोतर्फे दक्षिण नवी मुंबईतील पाणी पुरवठ्यात वृद्धी करण्यासाठी हेटवणे धरणातील अतिरिक्त 120 दशलक्ष लीटर प्रती दिन (एमएलडी) पाणी साठा आरक्षित करण्यासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाला रु. 119.80 कोटी शुल्क देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिडकोतर्फे पाणी पुरवठा करण्यात येणारी गावे, नोड आणि विविध प्रकल्पांना या …
Read More »‘मूठभर शेतकर्यांच्या मदतीने दिल्ली व देश वेठीस धरण्याचा प्रयत्न’
मुंबई : प्रतिनिधी सहा महिन्यांपूर्वी हे तीन कृषी सुधारणा कायदे झाले असताना, आता विरोधकांना जाग आली आहे व ते म्हणत आहेत की हे कायदे शेतकर्यांचे नुकसान करणारे आहेत, म्हणजे सहा महिने काय ते झोपा काढत होते का? एका राज्यातील मूठभर शेतकर्यांच्या मदतीने गेल्या 40 दिवसांपासून प्रामुख्याने दिल्ली व देश वेठीस …
Read More »महाराष्ट्रात शुक्रवारी लसीकरणाची व्यापक ड्राय रन
मुंबई : केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शुक्रवारी (दि. 8) महाराष्ट्रातील 30 जिल्हे व 25 महानगरपालिका क्षेत्रांत कोरोना लसीकरण ड्राय रन मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात तीन आरोग्य संस्था व प्रत्येक महानगरपालिकेत एक आरोग्य संस्था या ठिकाणी ड्राय रन घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिली. क्षेत्रीय स्तरावर …
Read More »राज्य सरकारच्या दिरंगाईमुळे शेतकर्यांचे नुकसान; रावसाहेब दानवे यांनी केली टीका
मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारकडून मका आणि ज्वारीच्या आणखी खरेदीच्या परवानगीसाठी राज्य सरकार आवश्यक ती माहिती केंद्र सरकारला पुरवत नाही. त्यामुळे राज्यातील शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. एकीकडे मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करायचा आणि दुसरीकडे मका, ज्वारीच्या खरेदीबाबत हलगर्जीपणा दाखवणार्या महाआघाडी सरकारचा दुटप्पी चेहराच यातून उघड झाला आहे, अशी …
Read More »काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जाणार बिगर मराठा नेत्याकडे?
मुंबई : प्रतिनिधीकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश नेतृत्व बदलाचे संकेत मिळत आहे. नव्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत बुधवारी (दि. 6) मुंबईत झालेल्या बैठकीत राज्य प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडून चाचपणी करण्यात आली. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जागी बिगर मराठा नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत प्रभारी एच. के. पाटील यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper