Breaking News

मुंबई – नवी मुंबई

ई-पासचा सावळागोंधळ; नागरिकांचे तब्बल पाच लाख अर्ज नाकारले

पनवेल : बातमीदार खासगी वाहनातून जिल्ह्याबाहेर प्रवास करणार्‍यांना ई-पास अजूनही बंधनकारक आहे. मात्र अनेकांच्या पदरी निराशा पडत आहे. कागदपत्रांचा अभाव, वैद्यकीय प्रमाणपत्र नसणे, अपूर्ण माहिती यामुळे ई-पास नाकारले जात आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात आतापर्यंत सात लाख 46 हजार 142 जणांनी ई-पासची मागणी केली होती, मात्र केवळ दोन लाख …

Read More »

गौरी-गणपतींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन

नवी मुंबई : बातमीदार गणेश चतुर्थीला वाजत गाजत झालेल्या आगमनानंतर  बाप्पाला व माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौराईला निरोप देण्यात आला.  बाप्पांना व गौरींना दुपारपासूनच निरोप देण्यास सुरुवात झाली. या वेळी पालिकेचे मंडप नवी मुंबईतील प्रत्येक तलावाच्या प्रवेशद्वाराजवळ सजलेले  दिसले तसेच या मंडपात स्वयंसेवक, पालिकेचे अधिकारी व पोलीस देखील सज्ज होते. तलावात …

Read More »

मुंबईत इमारतीचा भाग कोसळला

मुंबई : प्रतिनिधी महाड येथील इमारत दुर्घटना ताजी असतानाच मुंबईतील नागपाडा परिसरात एका इमारतीचा भाग कोसळल्याची घटना गुरुवारी (दि. 27) दुपारी घडली. या ढिगार्‍याखाली चार जण अडकल्याचे वृत्त असून बचावकार्य सुरू आहे.दक्षिण मुंबईतील नागपाड्यात असलेल्या शुक्लाजी मार्गावरील तीन मजली इमारतीचा भाग गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास अचानक कोसळला. कोसळलेल्या ढिगार्‍याखाली चार …

Read More »

‘…तर मुंबईत लोकलसेवा पूर्ववत होईल’

मुंबई : लोकलसेवा नियमितपणे सुरू होण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या लाखो प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी मध्य रेल्वेने दिली आहे. लोकल कधी सुरू केली जाणार, या प्रश्नाचे उत्तर आताच मिळाले नसले तरी ते लवकरच मिळू शकते, असे संकेत मध्य रेल्वेकडून देण्यात आले आहेत. मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी लोकल सुरू …

Read More »

पाणीचिंता मिटली!

मोरबे धरणात जून 2021 पर्यंत पुरेल एवढा जलसाठा नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – गेल्या वर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात शंभर टक्के पाणीसाठा झालेल्या मोरबे धरणात या वर्षी ऑगस्ट महिना संपला तरी 82 टक्केच पाणीसाठा झाला आहे. हा साठा नवी मुंबईकरांना 7 जूनपर्यंत पुरेल इतका असल्याने पाणीचिंता मात्र मिटली आहे. मोरबे …

Read More »

फळ मार्केटकडे नागरिकांची पाठ

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – गणेशोत्सव काळात सफरचंदाची आवक घसरली असून, बाजारभाव सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये सफरचंद 140 ते 200 रुपये किलो दराने विकला जात आहे. इतर फळांचे दरही वाढले असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी उत्सव काळातही फळ मार्केटकडे पाठ फिरविली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रत्येक …

Read More »

सिंधुदुर्गातील विद्यार्थिनीला पंतप्रधानांचा मदतीचा हात

मुंबई ः प्रतिनिधीइंटरनेट कनेक्शन व पुरेशा सुविधा नसल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलीला ऑनलाइन लेक्चर्सच्या माध्यमातून शिक्षणास अडचणी येत होत्या. या संदर्भातील फोटो व्हायरल झाल्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुलीची मदत केली आहे. सिंधुदुर्गमधील दारिस्ते गावातील स्वप्नाली सुतार या मुलीचा फोटो काही दिवसांपासून व्हायरल होत होता. यात ही मुलगी एका छोट्या …

Read More »

अध्यक्ष ठरवता येत नसलेला पक्ष पुढचे निर्णय काय घेणार?

देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसला टोला मुंबई ः प्रतिनिधीमहाविकास आघाडीबद्दल काँग्रेसच्या मंत्र्यांचे काय मत आहे याकडे आम्ही लक्ष देणार नाही. ज्या पक्षाला स्वत:चा अध्यक्ष ठरवता येत नाही, तो पक्ष पुढचे निर्णय काय घेणार, असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लगावला आहे. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर फडणवीस पत्रकारांशी …

Read More »

दार उघड उद्धवाऽऽ, दार उघड..!

धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी घंटानाद मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील धार्मिक स्थळे व मंदिरे सुरू करण्यासाठी राज्यभरातील धार्मिक संघटना एकवटल्या आहेत. या धार्मिक संघटनांनी शनिवारी (दि. 29) सकाळी 11 वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे सरकारला इशारा देण्याकरिता व देवस्थाने सुरू करा, या मागणीसाठी राज्यभर दार उघड उद्धवा, दार …

Read More »

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई ः अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अमली पदार्थविरोधी ब्युरोकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून तिचा ड्रग्ज डीलर्सशी संपर्क असल्याचे नुकतेच समोर आले होते. तसेच तिने सुशांतलाही ड्रग्ज सेवनासाठी प्रवृत्त केल्याचे बोलले जाते. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात दिवसागणिक नवे खुलासे होताहेत. सुशांतची प्रेयसी …

Read More »