Breaking News

मुंबई – नवी मुंबई

दुर्घटनाग्रस्त नागरिकांची वास्तव्यासाठी फरफट

नवी मुंबईत संक्रमण शिबिराचा अभाव नवी मुंबई : रामप्रहर वृत्त तुटलेल्या भिंती, तडे गेलेले स्लॅब, पायर्‍या चढताना हलणारा जिना, कधीही कोसळेल अशा स्थितीतील सिडकोनिर्मित इमारती असताना आता खासगी इमारतींनीही अवस्थाही तशीच झाली आहे. 1990 मध्ये बांधण्यात आलेली इमारती कुचकामी ठरल्यामुळे शहरातील नागरिकांवर भितीखाली वावरत आहेत. नवी मुंबईत संक्रमण शिबिरे नसल्यामुळे …

Read More »

शिवसेनेविरोधात भूमिका घेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ‘दिबां’च्या नावाचा काँग्रेसकडून ठराव

उरण : बातमीदार, वार्ताहर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने रविवारी (दि. 12) राज्यस्तरीय मंथन शिबिराचे आयोजन उलवे नोडमध्ये करण्यात आले होते. या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या शिबिरात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, असा ठराव करण्यात …

Read More »

उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफीसाठी रेडिऑलीजिस्ट पद भरण्याची मागणी

खारघर : प्रतिनिधी पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी मशीनसाठी रेडिऑलीजिस्ट पद भरण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. रेडिऑलीजिस्टच नसल्याने उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी येणार्‍या महिलांना सोनोग्राफीसाठी खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. 120 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात 20 खाटांचे ट्रॉमा सेंटर, 100 खाटांचे रुग्णालय आहे. या व्यतिरिक्त शवागार, शवविच्छेदनगृह या रुग्णालयात असणार …

Read More »

नवी मुंबईत हॅपी स्ट्रीट उत्साहात

शिवराज्याभिषेक ठरला आकर्षक नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार आमदार मंदाताई म्हात्रे व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नेरूळ पामबीच मार्ग येथे आयोजित करण्यात आलेला हॅपी स्ट्रीट उत्साहात झाला. या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, हॅपी स्ट्रीट  सारखे पहाटे तसेच नयनरम्य वातावरणात होणारे कायर्क्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर …

Read More »

नवी मुंबईतील इमारत दुर्घटनेत एकाचा मृत्यू

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नेरूळ येथील सेक्टर 17 मध्ये शनिवारी (दि. 11) दुपारी भीषण दुर्घटना घडली. जिमी पार्क इमारतीच्या ए विंगमधील 6 व्या मजल्यापासून सर्व घरांच्या हॉलचा स्लॅब पहिल्या माळ्यापर्यंत पत्त्याप्रमाणे कोसळला. यात एक 29 वर्षीय तरूण ठार तर सात रहिवाशी गंभीर जखमी झाले. आचानक घडलेल्या या प्रकारामुळे इमारतीमधील …

Read More »

नवी मुंबईत कर्णकर्कश 82 सायलेन्सर जप्त

वाहतूक पोलिसांची बुलडोझरद्वारे कारवाई नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाहनांमधील सायलेन्सरमध्ये अनावश्यक बदल करीत शहरांत विविध कर्णकर्कश आवाज करणार्‍या वाहनांची संख्या वाढली असल्याने ध्वनी आणि वायू प्रदूषण वाढले आहे. यामुळे नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाई करीत सायलेन्सर जप्त केले होते. अशा 82 सायलेन्सरवर बुलडोझरद्वारे शुक्रवारी (दि. 10) एकाचवेळी …

Read More »

नेरूळमध्ये स्लॅब कोसळून सात जण जखमी

नवी मुंबई : प्रतिनिधी नेरूळ सेक्टर 17मधील जिम्मी टॉवर 1 इमारतीत स्लॅब कोसळून सात जण जखमी झाल्याची दुर्घटना शनिवारी (दि. 11) घडली. जखमींवर उपचार सुरू आहेत. नवी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचाव व मदतकार्य सुरू करण्यात आले. जिम्मी टॉवर 1 या आठ मजली इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील 601 क्रमांकाच्या फ्लॅटच्या दुरुस्तीचे …

Read More »

महाविकास आघाडीला मोठा धक्का

विधान परिषद निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी मुंबई : प्रतिनिधी राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. त्यामुळे भाजपचे तीन, तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक सदस्य …

Read More »

आनंदवार्ता! मान्सून कोकणात दाखल

हवामान विभागाकडून महाराष्ट्र प्रवेश जाहीर मुंबई : प्रतिनिधी प्रतिकूल वातावरणामुळे आगेकूच करू न शकलेल्या नैर्ऋत्य मोसमी पावसाने अखेर दक्षिण कोकणातून महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी (10 जून) त्याचा प्रवेश जाहीर केला. यासोबतच कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. मोसमी …

Read More »

राज्यातील कोरोना रुग्णसंख्या तीन हजार पार

मुंबई : राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होतेय. चिंताजनक बाब म्हणजे राज्यात शुक्रवारी (दि. 10) कोरोना रुग्णसंख्या तीन हजार पार गेली आहे, तर एकट्या मुंबईतील कोविड रुग्णांचा आकडा दोन हजारच्या नजीक येऊन ठेपला आहे. त्याचबरोबर सक्रीय रुग्णांचाही संख्या वाढली आहे. राज्यात शुक्रवारी तीन हजार 81 …

Read More »