Breaking News

मुंबई – नवी मुंबई

रायगडातील कर्जतमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद

मुंबई ः उष्णतेच्या बाबतीत हवामान विभागाने व्यक्त केलेला अंदाज खरा ठरताना दिसतोय, कारण कोकणातील अनेक भागात उष्णतेची तीव्र लाट आली असून तापमान 40 अंशापार गेले आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये सर्वाधिक 44.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईतील काही ठिकाणांच्या स्टेशनवरील तापमानही 40 अंश सेल्सिअसवर गेले आहे. मुंबईमध्ये 1956नंतर मार्चमध्ये प्रथमच …

Read More »

शेतकर्‍यांच्या वीजतोडणीला तात्पुरती स्थगिती

भाजपच्या आक्रमक पवित्र्यानंतर ऊर्जामंत्र्यांची घोषणा मुंबई ः प्रतिनिधी राज्य विधिमंडळाचे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरत असून शेतकर्‍यांच्या वीजतोडणीवरून विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 15) सरकारला धारेवर धरले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने वीजतोडणीसंदर्भात निर्णय घेतला आहे. पीक हातात येईपर्यंत पुढील तीन महिने शेतकर्‍यांची वीजतोडणी तात्पुरती थांबवण्यात येईल, अशी घोषणा …

Read More »

कोकणात येणार उष्णतेची लाट; हवामान खात्याचा इशारा

मुंबई ः प्रतिनिधी वायव्येकडून येणार्‍या उष्ण वार्‍यांमुळे कोकणात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या काळात आकाश निरभ्र राहणार असून आर्द्रता कमी असल्याने उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होणार असल्याची शक्यता आहे. या संदर्भात हवामान खात्याने पत्रक जारी केले आहे. त्यानुसार 14, 15, 16 मार्च रोजी …

Read More »

महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच

प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या दाव्याने महाविकास आघाडीत खळबळ मुंबई ः प्रतिनिधी आगामी 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक जागा मिळवेल आणि राज्यात पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट करून केला आहे. पटोलेंच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सपशेल …

Read More »

सरकारचे घोटाळे उघड केल्यामुळेच मला नोटीस

 विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप मुंबई ः प्रतिनिधी राज्याच्या गृहविभागातील बदल्यांबाबतचा अहवाल उघड झाल्याच्या प्रकरणात रविवारी (दि. 13) पोलिसांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन त्यांची दोन तास चौकशी केली. या चौकशीचा भाजपकडून तीव्र निषेध करण्यात येत असून फडणवीस यांना आलेल्या नोटीसीची राज्यभर होळी करण्यात आली, तर …

Read More »

केएलई सोसायटीची नेरूळमध्ये नवीन शाळा आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते पायाभरणी सोहळा

नवी मुंबई : बातमीदार के. एल. ई सोसायटीच्या नवीन शाळेचा पायाभरणी समारंभ प्रमुख बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते नुकताच नेरूळ येथे झाला. या वेळी के.एल.ई सोसायटीचे प्रेसिडेंट व बेळगाव कर्नाटकचे आमदार महंतेश कौजलगी, अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, नवी मुंबईचे माजी उपमहापौर शशिकांत बिराजदार तसेच सोसायटीच्या संचालक मंडळाचे …

Read More »

देवेंद्र फडणवीसांना आलेल्या नोटीसचा नवी मुंबईतही निषेध

नवी मुंबई : बातमीदार भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्रान्स्फर घोटाळ्याची  चौकशी व्हावी म्हणून आवाज उठवला, मात्र यातील दोषीवर कार्यवाही न करता उलटपक्षी राज्यातील सत्ताधार्‍यांनी सत्येचा दुरूपयोग करीत सूडबुद्धीने फडणवीस यांच्यावर नोटीस बजावून त्रास देणे सुरू केले आहे. याचा निषेध करीत नवी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. …

Read More »

राज्य सरकारमध्ये दिवसरात्र तमाशा सुरू

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे टीकास्त्र मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन विरोधक सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत असतात. दरम्यान, रविवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस पाठवली. यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आणि राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन सुरू केले. यावरून संजय राऊतांनी भाजपवर टीका …

Read More »

स्टर्लिंग कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा

नवी मुंबई ः बातमीदार नेरूळ येथील एनसीआरडी स्टर्लिंग इनन्स्टिट्युट ऑफ फार्मसीचा वार्षिक क्रीडा दिन नुकताच झाला. यामध्ये मुला-मुलींसाठी धावणे, किकेट, व्हॉलीबॉल, थ्रोबॉल, कॅरम व टॅबल टेनिस अशा खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या वेळी संस्थेचे मुख्य प्रशासकिय अधिकारी अमरजित खराडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेश पिंगळे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. …

Read More »

एसटी कर्मचार्‍यांना हायकोर्टाकडून दिलासा

पुढील सुनावणीपर्यंत शिस्तभंगाची कारवाई न करण्याचे महामंडळाला निर्देश मुंबई ः प्रतिनिधी एसटी कर्मचार्‍यांच्या सरकारी कर्मचार्‍यांमध्ये विलीनीकरणावर 22 मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. पुढील सुनावणीत ’हो’ किंवा ’नाही’ यावर राज्य सरकारला स्पष्ट उत्तर देण्याचे निर्देशही हायकोर्टाने जारी केलेत. दरम्यान, या सुनावणीत संपकरी कर्मचार्‍यांची बाजू …

Read More »