Breaking News

मुंबई – नवी मुंबई

शिवसेनेच्या रवींद्र वायकरांची ईडीकडून चौकशी

मुंबई :प्रतिनिधी शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांची आठ तास सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करण्यात आली आहे. तब्बल आठ तास रवींद्र वायकर ईडीच्या प्रश्नांना सामोरे गेले. नेमक्या कोणत्या प्रकरणी त्यांनी ईडीने चौकशीसाठी बोलावले होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्यांची चौकशी करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. रवींद्र वायकर …

Read More »

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन : सत्ताधारी आक्रमक, विरोधक बॅकफूटवर!

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बुधवार (दि. 22)पासून सुरू होत आहे. ओबीसी आरक्षण, पेपरफुटी, परीक्षेतील विलंब, एसटी संप मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न अशा विविध मुद्द्यावर बॅकफूटवर असलेल्या महाविकास आघाडीसाठी हे अधिवेशन कसोटीचे ठरणार आहे. विरोधी पक्ष भाजपने अधिवेशनात आक्रमक होण्याचे स्पष्ट केले आहेत. त्यामुळे राज्यातील ज्वलंत प्रश्नांवर भाजप …

Read More »

खारघरमध्ये आढळल्या फुलपाखरांच्या 48 जमाती

खारघर : प्रतिनिधी खारघर शहर हे नवी मुंबई मधील निसर्ग विविधतेने नटलेले अस शहर आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, विस्तीर्ण खाडीकिनारा लाभलेल्या या शहरात झपाट्याने विकास होत आहे, मात्र नैसर्गिक विविधतेने नटलेल्या या शहराचा आणखी एक रूप एका निसर्गप्रेमी छायाचित्रकाराने समोर आणला आहे. मागील तीन वर्षांपासुन केलेल्या छायाचित्रणात खारघरमध्ये 48 जमातीचे वेगवेगळे …

Read More »

नवी मुंबई महापालिका निवडणूक : आघाडीतील सहभागाबाबत काँग्रेसची भूमिका तळ्यात मळ्यात

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली असून आघाडीकरून निवडणुका लढवण्याबाबत एकमत झाले असले तरी काँग्रेस या संदर्भात भूमिका काहीशी तळ्यात मळ्यात दिसत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर आघाडीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांची मने जुळणार का? …

Read More »

नवी मुंबई महापालिकेतर्फे ऑनलाईन स्पोर्ट्स फेस्टिव्हल

नवी मुंबई ः बातमीदार सध्याची कोव्हीड प्रभावित परिस्थिती व कोविड प्रतिबंधात्मक नियमावली लक्षात घेता नवी मुंबईकर नागरिकांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबाबत जागरूकता निर्माण करुन त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता महापालिका क्रीडा विभागाच्या वतीने अभिनव स्वरुपाच्या ऑनलाईन स्पोर्ट्स फेस्टिव्हल 2021-22चे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धांमध्ये बुद्धिबळ, योग तसेच बॉस्केटबॉल स्किल चॅलेंज, फुटबॉल स्किल चॅलेंज, …

Read More »

विरोधी पक्षनेते दरेकर आज रायगड दौर्यावर

मुंबई : प्रतिनिधी राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर रविवारी (दि. 19) रायगड जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात दरेकर नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होणार आहेत. रायगड जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. यामध्ये एकूण सहा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 21) …

Read More »

अनिल परबच गद्दार, राष्ट्रवादीला सोबत घेऊन शिवसेना संपण्याचा डाव

रामदास कदमांचा गंभीर आरोप मुंबई ः प्रतिनिधी शिवसेना नेते रामदास कदम यांनी शनिवारी (दि. 18) पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली. परब हे शिवसेना संपवायला निघाले आहेत. तेच गद्दार असून रत्नागिरीतील शिवसेना राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचा त्यांचा डाव असल्याचा गंभीर आरोप कदम यांनी या वेळी केला. …

Read More »

अंधेरी कामगार राज्य विमा रुग्णालय सुरू त्वरीत सुरू करा

भारतीय मजदूर संघाची मागणी मुंबई :प्रतिनिधी अंधेरीतील कामगार राज्य विमा रुग्णालयाला 17 डिसेंबर 2018 आग लागली होती. या आगीत 14 रुग्णांचा मृत्यू झाला होता. गेल्या तीन वर्षांपासून हे रुग्णालय बंद असून ते त्वरित सुरू करावे अशी मागणी भारतीय मजदूर संघाने केली आहे. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळाद्वारे कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांना …

Read More »

रेल्वे स्थानकांत लसीकरणाला चांगला प्रतिसाद

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त लोकल प्रवासावरील काही निर्बंध हटिवण्यात आल्यानंतर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने प्रवाशांसाठी श्गहरातील पाच रेल्वे स्थानकांवर लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. शहरातील इतर केंद्रांवर लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसला तरी या केंद्रांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या केंद्रांवर 11,120 लसमात्रा देण्यात आल्या असून यात दुसरी लस …

Read More »

नवी मुंबईतील ‘त्या’ कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांमध्ये वाढ

आकडा 18 वर, पालकांनी घेतली धास्ती! नवी मुंबई : रामप्रहर वृत्त राज्य सरकारने डिसेंबरपासून इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता राज्यातील शाळा तब्बल दोन वर्षांनी सुरू झाल्या आहेत, मात्र अजूनही कोरोना आणि ओमायक्रॉनचे संकट आहेच. सरकारने शाळा सुरू करण्याच्या अगोदर नियमावलीदेखील जारी केली होती, मात्र …

Read More »