Breaking News

मुंबई – नवी मुंबई

मुंबई लोकलवर तूर्त निर्बंध लागू केले जाणार नाहीत

मुंबई : मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांवर सध्या तरी कोणतेही निर्बंध लागू केले जाणार नाहीत, असे मंत्रालयातील उच्चपदस्थांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील याला दुजोरा दिला असून मुंबईची लोकल सध्या बंद करण्याचा कोणताही विचार राज्ूय सरकारसमोर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या वेळी त्यांनी जिल्हांतर्गत बंदी …

Read More »

राज्यातील महाविद्यालये 15 फेबु्रवारीपर्यंत बंद

परीक्षा होणार ऑनलाइन मुंबई ः प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अकृषी महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी (दि. 5) केली. त्याचप्रमाणे सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णयदेखील त्यांनी जाहीर केला. महाविद्यालये आणि परीक्षांच्या बाबतीत राज्य …

Read More »

राज्यात लॉकडाऊन नाही, पण निर्बंध कठोर होणार

मुंबई : राज्यात लॉकडाऊन लागू होणार नाही, मात्र निर्बंध कठोर होणार आहेत. याबाबतचा निर्णय आढावा उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. त्याचप्रमाणे ओमायक्रॉनचाही प्रादुर्भाव झालेला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 5) मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनामध्ये बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य …

Read More »

स्वच्छतादूतांना मोफत धनुर्वात इंजेक्शन सुविधा; नगरसेविका नेत्रा पाटील यांचा उपक्रम

नवी मुंबई : बातमीदार खारघर प्रभाग 4 मध्ये स्वच्छता राखण्यासाठी नेहमी कार्यतत्पर असलेल्या स्वच्छतादूतांना डॉ. रामकृष्ण क्षार यांच्या सुमनकांता चाईल्ड व अ‍ॅडल्ट क्लिनिक यांच्या वतीने मोफत धनुर्वात (टीटी) इंजेक्शन देण्यात आले. पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 4च्या नगरसेविका नेत्रा पाटील यांनी हा उपक्रम राबवला. या वेळी जवळपास 80 स्वच्छतादूतांना ही लस …

Read More »

आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन

नवी मुंबई : बातमीदार सानपाडा नोडमधील भाजप युवा नेते पांडुरंग आमले यांनी प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयात मंगळवारी (दि. 4) करण्यात आली. दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना आमदार मंदा म्हात्रे यांनी कोरोना काळातही पांडुरंग आमले यांनी केलेल्या सामाजिक कार्याची प्रशंसा करताना त्यांनी याहीपुढे जावून आपल्या …

Read More »

नवी मुंबईत कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला; एकाच दिवसात आढळले 1072 रुग्ण, कोविड सेंटर्स पुन्हा सुरू

नवी मुंबई : बातमीदार मागील आठवड्याभरापासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत असून 26 डिसेंबरपासून रुग्णवाढीस सुरुवात झाली आहे. मंगळवारी (दि. 4) 1072 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आशा परिस्थितीत आयुक्त बांगर यांनी शहरातील सर्व कोविड सेंटर्स पुन्हा सुरू केले आहेत. कोविड सेंटर्स सुरू करताना त्यासाठी …

Read More »

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती -आमदार मंदाताई म्हात्रे

नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील विकासकामांना गती मिळावी तसेच प्रलंबित प्रश्न मार्गी लागावे, याकरिता बेलापूरच्या आमदार  मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त  अभिजित बांगर यांची भेट घेतली. या वेळी नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. रामचंद्र घरत, महामंत्री डॉ. राजेश पाटील, माजी सभापती डॉ. जयाजी नाथ, माजी नगरसेवक अशोक …

Read More »

मुंबईत पहिली ते आठवीचे वर्ग 31 जानेवारीपर्यंत बंद

मुंबई ः प्रतिनिधी कोरोनासोबतच ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी ही माहिती दिली. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. अशातच ओमायक्रॉनचेही रूग्ण वाढू लागले आहेत. वाढत्या फैलावामुळे मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा …

Read More »

आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण

मुंबई ः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे सोमवार (दि. 3)पासून 15 ते 18 या वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरण मोहिमेस प्रारंभ होत आहे. यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. नवीन वर्षात केंद्र सरकार देशातील मुलांसाठी लसीकरण सुरू करीत आहेत. सुरुवातीला 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी …

Read More »

घोटाळेबाज नेत्यांचा निकाल लावणार; किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई : प्रतिनिधी घोटाळ्यांचे आरोप करून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकारला आव्हान दिले आहे. घोटाळेमुक्त महाराष्ट्र सरकार, असा संकल्प सोमय्या यांनी नववर्षानिमित्त केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना, 2022 मधील संकल्प काय …

Read More »