Breaking News

मुंबई – नवी मुंबई

पहिली ते पाचवीपर्यंत शाळा सुरू करण्यास टास्क फोर्सचा विरोध

मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यानंतर आता राज्यात पहिलीपासूनच्या शाळा सुरू होणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. यासाठी शालेय शिक्षण विभागही अनुकूल असल्याची माहिती समोर आली होती, मात्र कोरोना टास्क फोर्स यासाठी सध्या तयार नाहीए. …

Read More »

चोरीच्या घटनांमध्ये वाढ

नवी मुंबईत दहा महिन्यांत 1282 घटना नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईत चोरीच्या घटनांत मोठी वाढ झाली असून उकल होण्याचे प्रमाणही कमी आहे. विशेष म्हणजे या घटनांत सराईत चोरट्यांचा समावेश असल्याचे प्राथमिक संशय असून यात कोरोनाकाळात कारागृहातून सोडलेल्या आरोपींवर पोलिसांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या दहा महिन्यांत नवी …

Read More »

नवी मुंबईत मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत बैठक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांचे वतीने 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमानंतर प्रसिद्ध करण्यात येणार्‍या विधानसभानिहाय मतदार यादीनुसार नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होणार असल्याने या कार्यक्रमाबाबतची माहिती देणे व जनजागृती करण्याकरिता …

Read More »

सिडकोकडून ‘नैना’साठी ‘यूडीसीपीआर’मधील तरतुदी

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळाकडून विकसित करण्यात येत असलेल्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) प्रकल्पाच्या जलद विकासासाठी, तसेच नजीकच्या काळात उदयास येणार्‍या नैना प्रदेशात व्यवसाय सुलभतेसाठी (इज ऑफ डुइंग बिझनेस) राज्य शासनाच्या एकात्मिक नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील (यूडीसीपीआर) काही मार्गदर्शक तरतुदींचा अंगीकार करण्याचा निर्णय घेण्यात आला …

Read More »

नवी मुंबई, पनवेलमध्ये कोरोना आटोक्यात

नवी मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई, पनवेलमध्ये कोरोनाची दुसरी लाट शिखरावर असताना रुग्णालयांत खाटाही उपलब्ध होत नव्हत्या. नवी मुंबईत हजारच्या आसपास दररोज रुग्ण आढळत होते. अशीच भीषण परिस्थिती पनवेलमध्येही होती, परंतु आता या आजाराचा विळखा सैल झाला आहे. दररोज 25 पेक्षा कमी नवीन रुग्णांची भर पडत आहे. नागरिकांसाठी …

Read More »

एसटी संपासंदर्भात परबांनी घेतली फडणवीसांची भेट

मुंबई : प्रतिनिधी एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी गुरुवारी (दि. 18) थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला गाठला. या वेळी त्यांनी फडणवीसांसोबत एसटी कामगारांच्या संपावर चर्चा केली. कोर्टाचे आदेश आणि एसटीची आर्थिक स्थिती यावरही या बैठकीत चर्चा झाली. या वेळी पगाराचा मुद्दा कसा सोडवायचा …

Read More »

महाराष्ट्राची जनता घोटाळेबाजांना सजा देणारच -किरीट सोमय्या

मुंबई ः प्रतिनिधी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही, धमकी कोणाला, असा सवाल करत गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्राची जनता घोटाळेबाजांना सजा देणारच, असेही त्यांनी म्हटले आहे. राज्यात एकाच वेळी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) धाडसत्र सुरू आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे …

Read More »

महाराष्ट्रात अद्याप का नाही?

देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला सवाल देशातील 25 राज्यांनी इंधनाचे भाव कमी केले! मुंबई ः प्रतिनिधी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल उत्पादन कर कमी करून ग्राहकांना दिलासा दिल्यामुळे आता राज्य सरकारनेही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व अन्य कर कमी करावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्ष सातत्याने करीत आहे. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …

Read More »

सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियानात नवी मुंबई महापालिका देशात दुसरी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियानात नवी मुंबई महापालिकेला देशात द्वितीय क्रमांकाचे मानांकन जाहीर झाले आहे. वॉटर प्लस मानांकनानंतर आणखी एक मानाचा तुरा नवी मुंबईच्या शिरपेचात खोवला गेला आहे. मॅनहोल ते मशीनहोल अर्थात सिवेज लाईन …

Read More »

‘एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी अन् आदित्य ठाकरेंची स्कॉटलँड वारी’

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी अन् आदित्य ठाकरेंची जनतेच्या पैशावर स्कॉटलँड वारी, अशी घणाघती टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे. स्कॉटलँडच्या ग्लास्गो येथील पर्यावरण बदल परिषदेच्या निमित्ताने (सिओपी-26) राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे तेथे पर्यटन करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भातखळकरांनी टीका केली आहे. एसटी कर्मचार्‍यांचा …

Read More »