मुरूड ः प्रतिनिधीसलग तीन वेळा आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक मिळवून मुरूडसह देशाचे नाव चमकवणारे कराटेपटू प्रसाद प्रकाश चौलकर आता राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेतचमकदार कामगिरी करून महाराष्ट्राचे नाव उंचावण्यासाठी सज्ज झाले आहेत. गोवा येथे 26 ते 29 ऑगस्टदरम्यान होणार्या वाको इंडिया मास्टर्स नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी त्यांनी राज्याच्या संघात निवड झाली आहे.कराटे खेळात …
Read More »जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुणतालिकेत भारतीय संघ पहिल्या स्थानी
दुबई ः वृत्तसंस्थावेस्ट इंडिज आणि पाकिस्तान कसोटी मालिका 1-1ने बरोबरीत सुटली आहे. दुसर्या सामन्यात पाकिस्तानने विंडीजचा पराभव केला. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) नवीन गुणांची आकडेवारी जाहीर केली आहे. यात भारतीय संघ पहिल्या स्थानी आला आहे.यानंतर डब्ल्यूटीसीच्या नवीन सीझनच्या पॉइंट टेबलमध्ये भारतीय संघ अव्वल आहे. …
Read More »हायमास्ट लाईट बसविण्याची मागणी
कळंबोली भाजपतर्फे सिडकोला निवेदन कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली-कामोठे जोड रस्ता व कळंबोलीतील सिंग सिटी हॉस्पिटल येथे हायमास्ट लाईट बसविण्यात यावे, अशी मागणी भाजप शहर चिटणीस संतोष गायकवाड यांनी सिडकोकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी बेलापूर येथील सिडको भवनच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. या वेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. गायकवाड …
Read More »रस्ते डागडुजीच्या कामास सुरुवात
नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा पनवेल : वार्ताहर यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रभाग क्रमांक 18मध्ये बर्याच ठिकाणी रस्त्यावरील ड्रेनेज झाकणांच्या बाजूला असलेल्या सिमेंट मटेरियल वाहून गेल्यामुळे खड्डे पडले होते. काही ठिकाणी रस्ता ही खराब झाला होता. खड्ड्यांमुळे रहदारीलादेखील अडथळा होत होता. पावसाने उसंत घेतल्यामुळे हे सर्व खड्डे बुजवण्याच्या व डागडुजीच्या कामाला …
Read More »उरणमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इमारतीचीही दुरवस्था
उरण : प्रतिनिधी उरण तहसिल कार्यालय आणि पोलीस ठाण्यालागत असलेली इमारत खंडर बनली आहे. त्यामुळे तिथे सापांचा वावर वाढल्यामुळे कामानिमित्त येणार्या जनतेच्या आणि कार्यालयामधील कामगारांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिपत्याखाली असणार्या तहसिल कार्यालगत असणार्या इमारतीमध्ये यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयाचे कामकाज सुरू होते. अनेक वर्षांपासून कार्यालयाचे …
Read More »मोरा सागरी पोलीस ठाण्याची इमारत भग्नावस्थेत
नवीन बांधकाम उद्घाटना अगोदरच समस्यांनी ग्रासले उरण : वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्त हद्दीतील मोरा सागरी पोलीस ठाण्याची नवी इमारत उद्घाटनाअगोदरच भग्नावस्थेत पडून आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे 85 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेली ही इमारत खराब झाली आहे. त्यामुळे शासनाकडून खर्च करण्यात आलेला 85 लाखांचा निधी वाया …
Read More »केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन
संगमेश्वर, महाड ः प्रतिनिधीदेशाच्या स्वातंत्र्य दिनावरील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याबाबत टीका केल्याने केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांना मंगळवारी (दि. 24) रत्नागिरी पोलिसांकडून संगमेश्वर येथे अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना रात्री महाडमध्ये आणण्यात आले. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यातील प्रक्रियेनंतर ना. राणे यांना न्यायालयात हजर …
Read More »भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी मन्सूर पटेल
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाचे नेते मन्सूर पटेल यांची भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष हाजी एजाज देशमुख व मुंबई अध्यक्ष वसीम खान यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.या नियुक्तीबद्दल मन्सूर पटेल यांनी भाजपचे उत्तर …
Read More »गव्हाणमधील कोरोना लसीकरण केंद्राचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर गव्हाण ग्रामपंचायत कार्यालयात कोरोना लसीकरण केंद्र कार्यान्वित झाले आहे. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 24) करण्यात आले.कोरोनाच्या संभाव्य तिसर्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर गव्हाण ग्रामपंचायतीच्या निधीतून कोविड लसीकरणासाठी 25 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, तर …
Read More »शेकाप कार्यकर्ते बुधवारी करणार भाजपमध्ये प्रवेश
पनवेल ः रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्षाचे ओवळे विभागातील युवा नेते सुनीलशेठ म्हात्रे, तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते गजानन म्हात्रे, तुकाराम म्हात्रे, संतोष म्हात्रे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते बुधवारी (दि. 25) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत.पनवेल शहरातील मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सकाळी 10. 30 वाजता हा पक्षप्रवेश …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper