अलिबाग : प्रतिनिधी गावागावात एसटी सेवा सुरू करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 12) डफली बजाव आंदोलन करण्यात आले. अलिबागमध्ये जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली निवडक उपस्थितीत हे आंदोलन झाले. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे राज्यासह जिल्ह्यातील आर्थिक घडी पूर्णतः विस्कटून गेली आहे. …
Read More »पनवेलच्या कोविड-19 रुग्णालयांतील बेड्सची माहिती आता एका क्लिकवर! भाजपच्या मागणीनुसार नागरिकांसाठी महापालिकेची लिंक
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात धावपळ होऊ नये याकरिता पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व कोविड-19 रुग्णालयांमधील दररोजच्या उपलब्ध बेड्सबाबतची माहिती नागरिकांना लिंकद्वारे मिळणार आहे. पनवेलकरांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याने तसेच महापालिका प्रभाग समिती ‘ब’चे …
Read More »ना ढाकुऽऽऽ माकूमऽऽऽ, ना शोर… मुसळधार पाऊस असूनही गोपाळकाला यंदा सुना सुना!
अलिबाग : प्रतिनिधी कोरोनामुळे पारंपरिक सणांवर पाणी फेरले जात आहे. गोपाळकालाही त्याला अपवाद ठरला नाही. ढाकुऽऽऽ माकूमऽऽऽ, मच गया शोर… गोविंदा रे गोपाळा…अशी वातावरणनिर्मिती करणारी गीते बुधवारी (दि. 12) कानावर पडली नाहीत. गोविंदांचे फिरणारे जत्थे हे चित्रही कुठे पाहायला मिळाले नाही. मंगळवारचा श्रीकृष्ण जन्मोत्सवही अगदी साधेपणात साजरा झाला. मंदिरात आणि …
Read More »श्रीकृष्ण जन्माष्टमी यंदा साधेपणाने
उरण : वार्ताहर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग नियम व सर्व मंदिरे बंद असल्याने यंदा नागरिकांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी सार्वजनिक ठिकाणी साजरी न करता आपल्या घरीच साधेपणानेच साजरी केली. आपल्या घरतील चौरंगाच्या बाजूस रांगोळी काढून चौरंगावर मधोमध पाळणा ठेऊन त्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेऊन त्याची यथासांग पूजा केली. श्रीगणेश व बाळकृष्ण …
Read More »महायुती ‘मातोश्री’वर पाठविणार पाच लाख पत्रे ; दूध दरवाढ आंदोलन
नाशिक : प्रतिनिधी दुधाची दरवाढ न केल्याच्या निषेधार्थ घरात अथवा गोठ्यांमध्ये बसून सरकारचा निषेध करायचा, अशी आंदोलनाची हाक मंगळवारी (दि. 11) महायुतीतर्फे देण्यात आली. त्याचप्रमाणे 13 ते 18 ऑगस्ट या कालावधीत दूध उत्पादकांच्या मागण्यांसंबंधी पाच लाख पत्रे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी पाठविण्यात येणार आहेत. माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत …
Read More »पोलादपूरमध्ये पारंपरिक पध्दतीने गोपाळकाला साजरा
पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर शहरातील श्रीकाळ भैरवनाथ देवस्थान उत्सव मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही खाजगी आणि सार्वजनिक दहीहंडया फोडण्याचे एक नियमबध्द नियोजन करण्यात आले असून दरवर्षी या नियोजनानुसारच दहीहंडी फोडण्याची संधी शहरातील 12 नगरांना देण्यात येत असते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीकाळभैरवनाथ जोगेश्वरी देवस्थानचे सेवेकरी स्व. सुंदरशेठ पालकर यांचे नातू शैलेश वसंत …
Read More »रेवदंडा-रोहा रस्त्यातील खड्ड्यांची आठ दिवसांत डागडुजी करा
भाजप रोहा तालुका युवा मोर्चाची मागणी रेवदंडा : प्रतिनिधी रेवदंडा-रोहा रस्त्यातील खड्डे आठ दिवसांत चांगल्या मटेरियलने भरून द्यावेत, असे निवेदन रोहा तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम खात्यास भाजपचे रोहा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष सुदर्शन गावडे यांनी दिले. रोहा-रेवदंडा रस्त्यावर चणेरा साळाव जेएसडब्लू कंपनीच्या अवजड वाहतुकीने रस्त्याची दुरवस्था झाली असून पारंगखारे चणेरा …
Read More »कोट्यवधींच्या कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी आता ‘ईडी’ करणार चौकशी
पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी आता अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चौकशी करणार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार व बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्या माध्यमातून कर्नाळा बँक कार्यरत आहे. या बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी ईडी चौकशी करणार असल्याने विवेक पाटील यांच्या अडचणींत वाढ होताना दिसत आहे. कर्नाळा बँकेत …
Read More »जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसमोर घंटागाड्यांचा मुक्काम
केगाव नागरिकांच्या आरोग्यास धोका उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण तालुक्यातील केगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या समोर जीवनावश्यक वस्तूंची विक्रीचे दुकाने व त्याचजवळ केगाव ग्रामपंचायतची घंटागाडी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका संभवत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत समोरील बाजूस वडापाव गाडी, भाजीपाला दुकान, जवळच सरकारमान्य धान्य दुकान व …
Read More »पार्थ अपरिपक्व, त्याच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही -शरद पवार
मुंबई : प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे युवा नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ हा अपरिपक्व असून, त्याच्या बोलण्याला मी कवडीचीही किंमत देत नसल्याचे म्हटले आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper